Join us

Rakshabandhan Special : नारळाचं पुरण घातलेली खा ओल्या नारळाची टम्म फुगलेली नारळपोळी, मऊ लुसलुशीत पारंपरिक पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2025 16:31 IST

Homemade Naral Poli with jaggery filling for festive occasions: Rakshabandhan sweet: ओल्या नारळाची मऊ- लुसलुशीत पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.

श्रावण महिना सुरु झाला की, वेध लागतात ते सणांचे.(rakshabandhan sweet) श्रावणातील सगळ्यांचा आवडता सण नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन.(Maharashtrian sweets) या दिवशी घरात अगदी गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. श्रावण हा महिना सणांचा असल्यामुळे सगळीकडे आनंदी वातावरण असतं.(Traditional Indian festive food) नारळी पौर्णिमेला समुद्राला नारळ अर्पण करुन कोळी बांधव खास नारळाच्या पदार्थांचा बेत करतात. या दिवशी ओल्या नारळापासून वडी, खीर, बर्फी, नारळी भात, कढी , पुरणपोळी असे विविध पदार्थ बनवतात. पण खास पदार्थ असतो तो ओल्या नारळाची पुरणपोळीचा. (Rakhi dessert ideas)ओल्या नारळाची पुरणपोळी हा पदार्थ पारंपरिक असून खास करुन नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन या सणांमध्ये बनवला जातो.(Soft poli recipe) यात नारळाचा किस आणि गुळाचा वापर करुन पोळी तयार केली जाते. अनेकदा ही पोळी बनवताना फुटते किंवा सारण बाहेर येऊ लागते.(Rakshabandhan special recipe) पण काही खास ट्रिक्स लक्षात ठेवल्या तर ही रेसिपी अगदी छान जमेल. ओल्या नारळाची मऊ- लुसलुशीत पुरणपोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. 

कोकणातला पारंपरिक पदार्थ काकडी पोहे, पचायला हलका- सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट रेसिपी

साहित्य 

बेसन - १ कप ओल्या खोबऱ्याचा किस - २ कप गूळ - १ कप दूध पावडर - २ चमचे तूप - २ चमचे वेलची पावडर - १ चमचा जायफळ - १ चमचा कणिक 

कृती 

1. सगळ्यात आधी कढईमध्ये बेसन चांगेल भाजून घ्या. त्याचा रंग बदलला की, काढून घ्या. आता त्याच कढईत चमचाभर तूप घाला. ओल्या नारळाचा किस घालून चांगले परतवून घ्या. त्यात गूळ घालून वितळवून घ्या. गूळ वितळल्यानंतर नारळाचा रंग बदलेल. त्यात भाजलेल्या बेसनाचे पीठ आणि दूध पावडर घाला. मिश्रण चांगले एकजीव करुन ताटात काढा. 

2. आता या मिश्रणात वेलची पावडर आणि वरुन किसलेली जायफळ घाला. मिश्रण पुन्हा एकदा एकजीव करा.मैद्याचे पीठ मळताना त्यात थोडे तेल आणि हळद घाला. ज्यामुळे पीठाचा रंग पिवळा होईल. आता पीठाचे गोळे तयार करुन घ्या.

3. पीठाचा गोळा घेऊन त्यात तयार नारळाचे सारण भरा. चपातीसारखे लाटून घ्या. गॅसवर तवा ठेवून मंद आचेवर पोळी भाजून घ्या. दोन्ही बाजूने तूप लावून भाजा. तयार होईल मस्त ओल्या नारळाची खमंग-खुसखुशीत पुरणपोळी. 

टॅग्स :अन्नपाककृतीरक्षाबंधन