Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > चिवडा खा- वजन घटवा! फक्त १० मिनिटांत करा कुरकुरीत राजगिऱ्याचा चिवडा; डाएट करण्यासाठी सोपी रेसिपी

चिवडा खा- वजन घटवा! फक्त १० मिनिटांत करा कुरकुरीत राजगिऱ्याचा चिवडा; डाएट करण्यासाठी सोपी रेसिपी

Weight loss snacks: Healthy Indian snacks: Rajgira recipes: Diet snack recipe: डाएट फ्री राजगिऱ्याचा चिवडा कसा करायचा पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2026 18:00 IST2026-02-23T18:00:00+5:302026-02-23T18:00:03+5:30

Weight loss snacks: Healthy Indian snacks: Rajgira recipes: Diet snack recipe: डाएट फ्री राजगिऱ्याचा चिवडा कसा करायचा पाहूया.

Rajgira chivda recipe for weight loss How to make healthy chivda at Home 10 minute healthy snack recipe for diet Low calorie Indian snack for evening Gluten free Indian weight loss snack | चिवडा खा- वजन घटवा! फक्त १० मिनिटांत करा कुरकुरीत राजगिऱ्याचा चिवडा; डाएट करण्यासाठी सोपी रेसिपी

चिवडा खा- वजन घटवा! फक्त १० मिनिटांत करा कुरकुरीत राजगिऱ्याचा चिवडा; डाएट करण्यासाठी सोपी रेसिपी

संध्याकाळच्या वेळी आपल्याला भूक लागते. अशावेळी काहीतरी चविष्ट खाण्याची इच्छा सगळ्यांना होते. पण डाएटवर असलेल्या लोकांसाठी चिवडा किंवा तळलेले पदार्थ खाणं म्हणजे वजन वाढण्याचे आमंत्रणच.(Weight loss snacks) अशावेळी काय खावं हा प्रश्न सर्वांनाच पडतो. बाजारात मिळणारा चिवडा हा तेलकट आणि भरपूर मीठ घातलेला असतो. पण हा चिवडा खाल्ल्याने आपले वजन कमी होण्यास मदत होईल. (Healthy Indian snacks)
राजगिरा हे एक सुपरफूड मानले जाते. यात कॅल्शियम, लोह आणि फायबर असते. हा चिवडा तयार करण्यासाठी फक्त १० मिनिटे लागतात आणि तो चवीला खूप टेस्टी लागतो, ज्यामुळे मुलेही आवडीने खातात.(Rajgira recipes) वजन घटवण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा देण्यासाठी हा गिल्ट फ्री स्नॅक्सचा पर्याय आहे. राजगिऱ्यामध्ये कॅलरीज खूप कमी असतात.(Diet snack recipe) ज्यामुळे आपले पोट भरलेले राहते पण वजन वाढत नाही. फायबरमुळे पचनसंस्था सुधारते आणि पोट साफ राहण्यास मदत होते. हा चिवडा ग्लुटेन फ्री आणि पचायला हलका असतो. हा कुरकुरीत चिवडा कसा करायचा पाहूया. जाणून घ्या यासाठी लागणारे साहित्य आणि कृती. 

कोकणच्या पाहुणचाराची शान, चमचमीत मालवणी डाळ! पाहा डाळ करण्याची पारंपरिक अचूक रेसिपी..

साहित्य 

२ टेबलस्पून- तेल
२ टेबलस्पून- शेंगदाणे
२ टेबलस्पून- नारळाचे काप / किस
२ टेबलस्पून- काजू–बदाम (मिक्स)
१०–१२ - कढीपत्त्याची पानं
१ टेबलस्पून- मनुका
२ कप- राजगिरा (puffed / roasted)
१ टीस्पून- काळी मिरी पावडर
१ टीस्पून- जिरे पावडर
चवीनुसार- मीठ

कृती 

1. सगळ्यात आधी पॅनमध्ये २ चमचे तेल गरम करुन घ्या. त्यात शेंगदाणे घालून परतवून घ्या. आता त्यात नारळाचे काप किंवा किस घालून थोडेसे खरपूस भाजा. 

2. यामध्ये आता काजू-बदाम घालून हलकेसे परतवून घ्या. यात कढीपत्त्याची पानं घालून छान कुरकुरीत करा. 

3. त्यात मनुके घालून मिक्स करा. कढईमध्ये राजगिरा हलक्या हाताने भाजून घ्या. ज्यामुळे तो फुलण्यास मदत होईल. आता गॅस कमी करुन २ कप राजगिरा घाला आणि हलक्या हाताने मिक्स करा. वरुन काळी मिरी पावडर, जिरे पावडर आणि चवीनुसार मीठ घालून ढवळून घ्या. गॅस बंद करा. तयार होईल हेल्दी, डाएट फ्री राजगिऱ्याचा चिवडा. 


Web Title : चिवड़ा खाएं, वजन घटाएं! झटपट और आसान राजगिरा रेसिपी

Web Summary : राजगिरा चिवड़ा एक स्वस्थ, ग्लूटेन-मुक्त नाश्ता है जो वजन घटाने में मदद करता है। 10 मिनट में तैयार, यह फाइबर, कैल्शियम और आयरन से भरपूर होता है, जो पाचन को बढ़ावा देता है और बिना अतिरिक्त कैलोरी के निरंतर ऊर्जा प्रदान करता है।

Web Title : Eat Chivda, Lose Weight! Quick & Easy Rajgira Recipe

Web Summary : Rajgira chivda is a healthy, gluten-free snack that aids weight loss. Ready in 10 minutes, it's rich in fiber, calcium, and iron, promoting digestion and providing sustained energy without added calories.