भारतीय स्वयंपाकात प्रत्येक राज्याची स्वतःची वेगळी ओळख आहे आणि त्यात राजस्थानचा नंबर खास मानला जातो. कमी पाण्यात, साध्या पण ताकदवान घटकांपासून बनणारे राजस्थानी पदार्थ चवीला जितके झणझणीत असतात, तितकेच पोषणमूल्यांनीही समृद्ध असतात.(Rajasthani Panchratna Dal) अशाच पारंपरिक आणि लोकप्रिय पदार्थांपैकी एक म्हणजे राजस्थान स्टाइल पंचरत्न डाळ.(Panchratna Dal recipe) नावातच पंचरत्न असण्याचं कारण म्हणजे पाच वेगवेगळ्या डाळींचा एकत्रित वापर, ज्यामुळे या डाळीला चव, घट्टपणा आणि पौष्टिकता मिळते. यामध्ये मूग डाळ, मसूर डाळ, तूर डाळ, चणा डाळ आणि उडीद डाळ या पाचही डाळी एकत्र शिजवल्या जातात.(Rajasthani dal with rice) प्रत्येक डाळीची चव आणि गुणधर्म वेगळा असतो, पण एकत्र आल्यावर त्या डाळींचं रूपांतर एका समृद्ध आणि भरगच्च पदार्थात होतं. ही डाळ कशी करायची पाहूया.
डाएटवाल्यांसाठी जॅकपॉट! रात्रीच्या जेवणात करा पालक-मटार खिचडी, मिळेल भरपूर प्रोटीन- पाहा झटपट रेसिपी
साहित्य
तूर डाळ - १/४ कप मसूर डाळ - १/४ कप चना डाळ - १/४ कप उडीद डाळ - १/४ कप हिरव्या मुगाची डाळ - १/४ कप मीठ - चवीनुसार हळद - २ चमचे पाणी - आवश्यकतेनुसार तूप - २ चमचे जिरे - १ चमाबारीक चिरलेला लसूण - १ चमचा बारीक चिरलेले आले - १ चमचा बारीक चिरलेले हिरवी मिरची - २ हिंग - अर्धा चमचा बारीक चिरलेला कांदा - १लाल मिरची पावडर - २ चमचे धने पावडर - १ चमचा बारीक चिरलेला टोमॅटो - १गरम पाणी - आवश्यकेतनुसार गरम मसाला - १/४ चमचा कसुरी मेथी - १ चमचा कोथिंबीर
कृती
1. सगळ्यात आधी सर्व डाळी मिक्स करुन स्वच्छ धुवून घ्या. नंतर २ ते ३ तास पाण्यात भिजवा. त्यानंतर कुकरमध्ये तूप, मीठ, हळदी, डाळ आणि पाणी घालून शिजवून घ्या.
2. आता कढईमध्ये तूप घालून त्यात जिरे, लाल मिरची, आलं-लसूण , हिरव्या मिरच्या, हिंग घालून परतवून घ्या.
3. नंतर कांदा घालून चांगले फ्राय करुन घ्या. वरुन मीठ, हळद आणि इतर मसाले घालून शिजवून घ्या. नंतर त्यात गरम पाणी घालून उकळी येऊ द्या. तयार शिजवलेली डाळ, गरम मसाला, कसुरी मेथी आणि कोथिंबीर घाला. डाळीला पुन्हा उकळी आल्यानंतर गरमा गरम भातासोबत खा.
Web Summary : Rajasthani Panchratna Dal, a flavorful blend of five lentils, offers a nutritious and delicious meal. This recipe combines moong, masoor, toor, chana, and urad dals, creating a protein-rich dish perfect with rice. Simple steps ensure an easy and tasty culinary experience.
Web Summary : राजस्थानी पंचरत्न दाल, पाँच दालों का एक स्वादिष्ट मिश्रण, एक पौष्टिक और स्वादिष्ट भोजन प्रदान करता है। इस रेसिपी में मूंग, मसूर, तूर, चना और उड़द दाल को मिलाया गया है, जिससे चावल के साथ परोसने के लिए एक प्रोटीन युक्त व्यंजन बनता है। आसान चरण एक आसान और स्वादिष्ट पाक अनुभव सुनिश्चित करते हैं।