Lokmat Sakhi >Food > लालचुटूक टोमॅटोचे भरीत एकदा खाऊन पाहा, चव लय भारी! पाहा टोमॅटोच्या भरीताची मस्त रेसिपी...

लालचुटूक टोमॅटोचे भरीत एकदा खाऊन पाहा, चव लय भारी! पाहा टोमॅटोच्या भरीताची मस्त रेसिपी...

Quick Tomato Bharta Recipe : EASIEST Tomato Bharta : Tomato Bharta Recipe : Tamatar Ka Bharta : Creamy Rich Tomato Bharta : टोमॅटोची आंबटगोड चव आणि फोडणीचा घमघमाट असे चविष्ट टोमॅटोचे भरीत करण्याची सोपी रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2025 13:16 IST2025-06-21T13:02:12+5:302025-06-21T13:16:22+5:30

Quick Tomato Bharta Recipe : EASIEST Tomato Bharta : Tomato Bharta Recipe : Tamatar Ka Bharta : Creamy Rich Tomato Bharta : टोमॅटोची आंबटगोड चव आणि फोडणीचा घमघमाट असे चविष्ट टोमॅटोचे भरीत करण्याची सोपी रेसिपी...

Quick Tomato Bharta Recipe EASIEST Tomato Bharta Tomato Bharta Recipe Tamatar Ka Bharta Creamy Rich Tomato Bharta | लालचुटूक टोमॅटोचे भरीत एकदा खाऊन पाहा, चव लय भारी! पाहा टोमॅटोच्या भरीताची मस्त रेसिपी...

लालचुटूक टोमॅटोचे भरीत एकदा खाऊन पाहा, चव लय भारी! पाहा टोमॅटोच्या भरीताची मस्त रेसिपी...

आपल्याकडील भारतीय पारंपरिक पदार्थ हे फारच चविष्ट आणि रुचकर लागतात. यापैकीच, महाराष्ट्रातील एक खास पारंपरिक आणि चविष्ट प्रकार म्हणजे भरीत. मस्त झणझणीत, गरमागरम भरीत खाण्याची मज्जा काही औरच असते. गरमागरम भात किंवा भाकरीसोबत भरीत खायला अधिकच (Quick Tomato Bharta Recipe) चविष्ट लागत. भरीत म्हटलं की आपल्या (EASIEST Tomato Bharta) डोळ्यांसमोर सगळ्यांत आधी वांग्याचेच भरीत येते. परंतु नेहमी तेच वांग्याचे भरीत खाण्यापेक्षा आपण लालचुटुक टोमॅटोचे देखील तितकेच टेस्टी भरीत करु शकतो(Tomato Bharta Recipe).

टोमॅटोच्या आंबट - गोड चवीला जिरे, लसूण, मिरची आणि मोहरीची फोडणी दिल्यामुळे अप्रतिम स्वाद येतो. जेव्हा टोमॅटो भरपूर प्रमाणात मिळतात, तेव्हा अशा प्रकारचे भरीत तयार करण्याचा बेत किमान एकदा तर झालाच पाहिजे. टोमॅटोचा वापर केवळ रस्सा, आमटी किंवा कोशिंबीरपुरता मर्यादित नाही तर आपण लालचुटुक - आंबट गोड टोमॅटोचे भरीत (Tamatar Ka Bharta) देखील करु शकतो. जेवणात थोडंसं झणझणीत, चटकदार हवं असेल तर टोमॅटोचे भरीत उत्तम पर्याय आहे. फारशा मेहेनतीशिवाय, अगदी थोड्याच मसाल्यांमध्ये आणि ताटाला सजवणारा, चवदार असा हा प्रकार आहे. टोमॅटोची आंबटगोड चव आणि फोडणीचा घमघमाट असे हे चविष्ट टोमॅटोचे भरीत करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.    

साहित्य :- 

१. टोमॅटो - ४ ते ५ टोमॅटो
२. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ हिरव्या मिरच्या 
४. लसूण पाकळ्या - ६ ते ८ पाकळ्या 
५. कोथिंबीरीचे देठ - १/२ कप 
६. मीठ - चवीनुसार 
७. साखर - १/२ टेबलस्पून 
८. तेल - २ टेबलस्पून 
९. जिरे - १ टेबलस्पून 
१०. मोहरी - १ टेबलस्पून 
११. कडीपत्ता - १० ते १२ पाने 
१२. कांदा - १ कप (बारीक चिरलेला)  
१३. हळद - १/२ टेबलस्पून 
१४. लाल मिरची पावडर - १/२ टेबलस्पून 
१५. गरम मसाला - १/२ टेबलस्पून 
१६. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)

बटाटे उकडताना फुटतात, लगदा होतो? ८ टिप्स - बटाटे उकडण्याची परफेक्ट पद्धत, काम होईल झटपट...


फक्त तोंडी लावायला ठेचा कशाला आता करा झणझणीत पनीर ठेचा पराठा- मुलांनाही आवडेल..

कृती :-

१. सगळ्यात आधी टोमॅटो स्वच्छ धुवून, पुसून त्यांना थोडे तेल लावून थेट गॅसच्या मध्यम आचेवर ठेवून भाजून घ्यावे. टोमॅटोचा रंग बदलून हलकासा काळा होत नाही तोपर्यंत हे टोमॅटो व्यवस्थित भाजून घ्यावेत. 
२. आता एका पॅनमध्ये हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, कोथिंबीरीचे देठ हे तिन्ही जिन्नस एकत्रित करून कोरडे भाजून घ्यावे. भाजून झाल्यानंतर थोडे थंड होऊ द्यावेत, मग मिक्सरमध्ये फिरवून त्याची बारीक पेस्ट तयार करून घ्यावी. 
३. भाजलेले टोमॅटो एका बाऊलमध्ये काढून ते ५ मिनिटांसाठी झाकून ठेवून द्यावेत. ५ मिनिटानंतर टोमॅटोची साल काढून घेऊन टोमॅटो बारीक चिरून घ्यावेत. 

चुकूनही ‘या’ ७ भाज्या शिजतांना पाणी घालू नका, करा वाफेवर! नाहीतर भाजी होईल बेचव...

५. एका पॅनमध्ये तेल घेऊन त्यात जिरे, मोहरी, कडीपत्ता, मिक्सरमधून वाटून घेतलेली हिरव्या मिरच्यांची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा असे सगळे जिन्नस घालून खमंग फोडणी तयार करावी. कांदा परतल्यानंतर त्यात हळद, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ घालावे. त्यानंतर यात भाजून घेतलेले टोमॅटो घालावेत. आता सगळे मिश्रण चमच्याने हलवून घ्यावे. २ ते ३ मिनिटे हे टोमॅटोचे भरीत व्यवस्थित शिजवून घ्यावे. 
६. सगळ्यात शेवटी यात थोडा गरम मसाला, साखर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी.   

मस्त चमचमीत लालचुटुक टोमॅटोचे चटपटीत भरीत खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम भात किंवा भाकरीसोबत हे भरीत खालील अधिकच चविष्ट लागते.

Web Title: Quick Tomato Bharta Recipe EASIEST Tomato Bharta Tomato Bharta Recipe Tamatar Ka Bharta Creamy Rich Tomato Bharta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.