Lokmat Sakhi >Food > मुलांना पिझ्झा आवडतो ना, करा हट्ट पूर्ण! पाहा पौष्टिक ओट्स पिझ्झा - खाऊ द्या पोटभर...

मुलांना पिझ्झा आवडतो ना, करा हट्ट पूर्ण! पाहा पौष्टिक ओट्स पिझ्झा - खाऊ द्या पोटभर...

Quick Oats Pizza Recipe : No Oven, No Yeast, No Maida OATS PIZZA Healthy Pizza : Healthy Oats pizza recipe cheesy Otas pizza : घरच्याघरीच उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून हेल्दी पिझ्झा बेस तयार करून झटपट करा पौष्टिक पिझ्झा रेसिपी..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2025 18:22 IST2025-06-02T18:22:10+5:302025-06-02T18:22:55+5:30

Quick Oats Pizza Recipe : No Oven, No Yeast, No Maida OATS PIZZA Healthy Pizza : Healthy Oats pizza recipe cheesy Otas pizza : घरच्याघरीच उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून हेल्दी पिझ्झा बेस तयार करून झटपट करा पौष्टिक पिझ्झा रेसिपी..

Quick Oats Pizza Recipe No Oven, No Yeast, No Maida OATS PIZZA Healthy Pizza Healthy Oats pizza recipe cheesy Otas pizza | मुलांना पिझ्झा आवडतो ना, करा हट्ट पूर्ण! पाहा पौष्टिक ओट्स पिझ्झा - खाऊ द्या पोटभर...

मुलांना पिझ्झा आवडतो ना, करा हट्ट पूर्ण! पाहा पौष्टिक ओट्स पिझ्झा - खाऊ द्या पोटभर...

'पिझ्झा' नुसतं नाव जरी काढलं तरी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटत. लहान मुलांना पिझ्झा फारच आवडतो. मुलं बाहेर गेल्यावर पिझ्झा (Quick Oats Pizza Recipe) खाण्यासाठी हमखास पालकांकडे हट्ट करतात. परंतु विकतच्या पिझ्झाचा, पिझ्झा बेस हा मैद्याचा असतो त्यामुळे बरेचसे पालक मुलांना बाहेरचा पिझ्झा (No Oven, No Yeast, No Maida OATS PIZZA Healthy Pizza) खायला देत नाही. अशा परिस्थितीत, आपण मुलांसाठी खास घरच्याघरीच उपलब्ध असणाऱ्या साहित्यातून हेल्दी पिझ्झा बेस तयार करून पौष्टिक असा पिझ्झा ( Healthy Oats pizza recipe cheesy Otas pizza) तयार करु शकतो. खरंतर, ओट्स आणि बारीक रवा यांच्या एकत्रित मिश्रणापासून आपण हेल्दी आणि पौष्टिक असा घरगुती पिझ्झा बेस अगदी झटपट तयार करू शकतो.

या पिझ्झा बेसवर मुलांच्या आवडीच्या भाज्या व भरपूर चीझ किसून घातले तर मुलं अगदी आवडीने हा पिझ्झा पोटभर खाऊ शकतात. ओट्समध्ये फायबर, प्रोटीन आणि आवश्यक पोषकतत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, जी मुलांच्या वाढीसाठी उपयुक्त असतात आणि पिझ्झा खाण्याचा आनंदही मिळतो, आणि आरोग्याची काळजीही घेतली जाते. यासाठी, जर मुलांनी पिझ्झा खाण्याचा हट्ट केलाच तर आपण अशाप्रकारे हेल्दी पिझ्झा बेस असलेला पौष्टिक असा पिझ्झा घरच्याघरीच झटपट करु शकतो. हा पिझ्झा कसा करायचा याची सोपी रेसिपी पाहूयात. 

साहित्य :- 

१. ओट्स - १ कप 
२. बारीक रवा - १ कप 
३. मीठ - चवीनुसार 
४. बेकिंग सोडा - चिमूटभर
५. तेल - २ ते ३ टेबलस्पून 
६. पिझ्झा सॉस - २ ते ३ टेबलस्पून
७. ढोबळी मिरची - १/२ कप 
८. कांदा - १/२ कप 
९. मक्याचे दाणे - १/२ कप 
१०. मिक्स हर्ब्स - १/२ टेबलस्पून
११. चिली फ्लेक्स - १/२ टेबलस्पून
१२. चीझ - १ ते २ क्युब्स 

पाऊस स्पेशल बेत: गरमागरम टोमॅटो सार आणि वाफाळता भात! पाहा टोमॅटो सारची पारंपरिक रेसिपी...


कृती :- 

१. सगळ्यात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये ओटस आणि बारीक रवा एकत्रित घेऊन त्यात थोडे पाणी घालावे. आता हे मिश्रण अर्धा तास तसेच भिजत ठेवावे. 
२. ओट्स आणि बारीक रवा व्यवस्थित भिजल्यानंतर हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यात घालून व्यवस्थित पेस्ट होईपर्यंत वाटून घ्यावे. 
३. एका पॅनला तेल लावून त्यावर हे तयार मिश्रण ओतून, ते व्यवस्थित पसरवून त्याचा गोलाकार डोशाप्रमाणे पिझ्झा बेस तयार करून घ्यावा. हा ओटसचा पिझ्झा बेस दोन्ही बाजुंनी अगदी व्यवस्थित खरपूस भाजून घ्यावा. 

सिझन संपला तरी घ्या आंब्याचा आस्वाद! आंब्याच्या फोडी, आमरस स्टोअर करण्याची पद्धत - खा मनसोक्त...

शिळ्या पोळ्यांची करा मस्त गोड खीर! चवीला उत्तम आणि पौष्टिक पदार्थ - चव एकदा चाखून तर पाहा...

४. आता ओट्स आणि बारीक रव्याच्या मिश्रणाचा पिझ्झा बेस तयार झाल्यावर त्यावर चमचाभर पिझ्झा सॉस व्यवस्थित पसरवून लावावा. मग त्यावर आपल्या आवडीप्रमाणे कच्च्या भाज्या घालाव्यात. आपण ढोबळी मिरची, कांदा, मक्याचे दाणे अशा आपल्या आवडीनुसार वेगवेगळ्या भाज्या घालू शकता. 
५. मग सगळ्यात शेवटी पिझ्झावर चीझ किसून घालावे. आता यावर झाकण ठेवून चीझ वितळेपर्यंत पिझ्झा मध्यम आचेवर ठेवून भाजून घ्यावा. 
६. चीझ संपूर्णपणे वितळल्यानंतर पिझ्झा पॅनवरून काढून खाण्यासाठी सर्व्ह करावा. 

पौष्टिक असा ओट्स व बारीक रव्याचा पिझ्झा बेस घरच्याघरीच तयार करून, आपण मुलांसाठी हेल्दी असा पिझ्झा तयार करु शकतो. पिझ्झा सॉस किंवा टोमॅटो सॉस सोबत हा पिझ्झा खाल्ला तर त्याची चव अधिकच चांगली लागते.

Web Title: Quick Oats Pizza Recipe No Oven, No Yeast, No Maida OATS PIZZA Healthy Pizza Healthy Oats pizza recipe cheesy Otas pizza

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.