Join us

सकाळच्या घाईत डब्यासाठी काय करायचं? झटपट होणारी मोड आलेली मसूरची उसळ, चमचमीत- झणझणीत रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2025 17:25 IST

protein-rich lunchbox dish: Maharashtrian usal recipe: जास्त प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे सकाळच्या डब्यासाठी किंवा जेवणासाठी हा चांगला पर्याय आहे.

मोड आलेली मसूरची उसळ ही महाराष्ट्रातील कोकण, पुणे, मुंबई आणि विदर्भात नियमितपणे खाल्ला जाणारा पदार्थ आहे.(Lunch Box recipe idea) ही भाजी पारंपरिक आणि आरोग्यदायी म्हटली जाते. ही उसळ अगदी कमी आणि साध्या साहित्यात केली जाते. (Maharashtrain Usal Recipe) यात जास्त प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे सकाळच्या डब्यासाठी किंवा जेवणासाठी हा चांगला पर्याय आहे. (quick lunchbox)

मोड आलेले मसूर हे प्रोटीन, फायबर आणि मिनरल्सचा उत्तम स्त्रोत आहे. (nutritious recipes for kids’ tiffin) ही भाजी पचनासाठी चांगली असते. सकाळच्या डब्याला काय करायचा असा प्रश्न पडला असेल तर मोड आलेल्या मसूरची उसळ करुन पाहा. एकदम चमचमीत आणि झणझणीत रेसिपी आहे. (sprouted masoor usal recipe) यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.

Konkan Food : कोकणातला पारंपरिक पदार्थ नारळाच्या दुधाचा हलवा, मुलांच्या आवडीचा खास पदार्थ, सोपी रेसिपी

साहित्य

मोड आलेले मसूर - १ कपकांदा - १ मोठाओल्या नारळाचे कापआले - १ इंचलसूण - ४ ते ५कोथिंबीर - आवश्यकतेनुसारहिंग - १ चमचाहळद - १ चमचामिरची पावडर- १ चमचाकांदा लसूण मसाला - १ चमचादाण्याचा कूट - १ ते २ चमचे

 

कृती

1. सगळ्यात आधी बाऊलमध्ये अख्खा मसूर धुवून घ्या. त्यात पाणी घालून ७ ते ८ तास भिजत घाला. त्यानंतर सुती कापडात मोड येण्यासाठी ठेवा.

2. गॅसवर कढई ठेवून त्यात तेल घाला. तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा परतवून घ्या. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ओल्या नारळाचे काप, आले, लसूण, कोथिंबीर वाटून त्याची पेस्ट तयार करा.

3. तयार वाटण लालसर झालेल्या कांद्यामध्ये परतवून घ्या. त्यात हळद घालून परतवून घ्या. आता यामध्ये मोड आलेली मसूर घाला. त्यात मीठ घालून झाकण ठेवा. झाकणावर पाणी घाला, ज्यामुळे भाजी लवकर शिजण्यास मदत होईल.

4. भाजी शिजल्यानंतर ताटातील गरम झालेले पाणी त्यात घाला. वरुन घरगुती मसाले, लाल तिखट, हिंग, कांदा-लसूण मसाला आणि दाण्याचा कूट घालून परतवून घ्या. वरुन कोथिंबीर घालून सर्व्ह करा मोड आलेल्या मसूरची उसळ.

 

टॅग्स :अन्नपाककृती