Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > झटपट करा वाटीभर चणाडाळीचा हलवा, १० मिनिटांत होणारा सोपा-हेल्दी पदार्थ, चव पुरणपोळीची पण...

झटपट करा वाटीभर चणाडाळीचा हलवा, १० मिनिटांत होणारा सोपा-हेल्दी पदार्थ, चव पुरणपोळीची पण...

chana dal halwa: quick halwa recipe: healthy Indian dessert: चणाडाळीचा हलवा कसा बनवायचा पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2025 17:10 IST2025-12-28T17:08:38+5:302025-12-28T17:10:15+5:30

chana dal halwa: quick halwa recipe: healthy Indian dessert: चणाडाळीचा हलवा कसा बनवायचा पाहूया.

quick chana dal halwa recipe in 10 minutes healthy chana dal sweet recipe at Home easy Indian dessert without baking chana dal halwa with puran poli taste | झटपट करा वाटीभर चणाडाळीचा हलवा, १० मिनिटांत होणारा सोपा-हेल्दी पदार्थ, चव पुरणपोळीची पण...

झटपट करा वाटीभर चणाडाळीचा हलवा, १० मिनिटांत होणारा सोपा-हेल्दी पदार्थ, चव पुरणपोळीची पण...

सणसमारंभ म्हटलं की आपण पुरणपोळी हमखास बनवतो. गूळ, तूप आणि डाळीचा गोडसर सुगंध घरभर पसरतो. पण प्रत्येक वेळी पुरणपोळी करायला वेळ, मेहनत आणि तयारी लागतेच.(chana dal halwa) रोजच्या धावपळीच्या जीवनात अचानक गोड खाण्याची इच्छा झाली तर पुरणपोळीपेक्षा सोप, झटपट आणि तितकाच पौष्टिक पदार्थ आपण ट्राय करु शकतो.(healthy Indian dessert) अशावेळी वाटीभर चणाडाळीचा हलवा एक परफेक्ट पर्याय ठरतो. अवघ्या १० मिनिटांत होणारा हा पदार्थ चवीला अप्रतिम तर असतोच, शिवाय आरोग्याच्याही दृष्टीने फायदेशीर ठरतो.(instant sweet recipe)
चणाडाळीचा हलवा हा आपल्या पारंपरिक स्वयंपाकघरातला विसरलेला खजिनाच. चणाडाळ म्हणजे प्रथिने, फायबर आणि ऊर्जा देणाऱ्या घटकांचा उत्तम स्रोत. त्यामुळे हा हलवा खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखं वाटतं आणि उगाचच गोडासाठी बाहेरचे पदार्थ खायची गरज राहत नाही. विशेषतः लहान मुलं, वयस्कर मंडळी किंवा कामाच्या थकव्याने वैतागलेल्या लोकांसाठी हा हलवा पटकन ऊर्जा देणारा ठरतो. पाहूया हा हलवा कसा बनवायचा. 

आईने लावलेली सवय भारी की घातक? रात्री केसांना तेल लावून झोपणं चांगलं की केसांचं वाटोळं..

साहित्य 

चणा डाळ - दीड कप 
दूध - २ आणि अर्धा कप 
वेलची - ४
शुद्ध तूप - ३/४ कप 
साखर - १ कप 
केशर दूध - १ छोटी वाटी
ड्रायफ्रुट्स 

कृती 

1. सगळ्यात आधी चणाडाळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. नंतर तासभर भिजत ठेवा. त्यानंतर एक कढई घेऊन त्यात भिजवलेली चणाडाळ आणि दूध घालून मंद आचेवर शिजू द्या. 

2. डाळ व्यवस्थित शिजल्यानंतर चाळणीने गाळून घ्या. थोडी थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात वाटून घ्या. 

3. आता कढईत तूप घालून वाटलेली डाळ चांगले परतवून घ्या. नंतर पुन्हा चमचाभर तूप घालून त्यात ड्रायफ्रुट्स घालून परतवून घ्या. वरुन साखर घालून व्यवस्थित मिक्स करा. 

4. यात गाळून घेतलेले डाळीचे दूध, केशर दूध घालून पुन्हा मिक्सर करुन घ्या. हलव्याच्या रंग बदलल्यानंतर त्यात वेलची पूड घाला. वरुन ड्रायफ्रुट्स घाला, तयार होईल चणाडाळीचा पौष्टिक हलवा. 



Web Title : झटपट चना दाल हलवा रेसिपी: 10 मिनट में हेल्दी, स्वादिष्ट भारतीय मिठाई

Web Summary : कुछ मीठा खाने का मन है? इस झटपट और हेल्दी चना दाल हलवा को आजमाएं, जो सिर्फ 10 मिनट में तैयार हो जाता है! यह पारंपरिक मिठाइयों का एक पौष्टिक विकल्प है, जो प्रोटीन और फाइबर से भरपूर है, जो त्वरित ऊर्जा के लिए एकदम सही है।

Web Title : Quick chickpea halwa recipe: 10-minute healthy, delicious Indian dessert

Web Summary : Craving something sweet? Try this quick and healthy chickpea halwa, ready in just 10 minutes! It's a nutritious alternative to traditional sweets, packed with protein and fiber, perfect for a quick energy boost.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.