सकाळी नाश्ता करणं हे अधिक महत्त्वाचं असतं. अनेकजण सकाळचा नाश्ता करत नाही, त्यामुळे त्याचा थेट संपूर्ण आरोग्यावर परिणाम होतो.(jowar pulao recipe) बरेचदा डॉक्टरही आपल्याला सकाळी ऊर्जा मिळणारे पदार्थ खाण्यास सांगतात. घाईगडबडीत आपण नाश्ता स्किप करतो किंवा तेलकट, झटपट पदार्थ खातो. अशावेळी एक सोपा, पौष्टिक आणि पोटभरीचा पदार्थ ज्वारीचा पुलाव.(healthy breakfast recipe)
ज्वारीचा पुलावमध्ये कोणत्याही प्रकारचा तांदुळ वापरला जात नाही. विविध भाज्या घालून याची चव वाढवली जाते. रोज पोहे, उपमा किंवा तेच ते पदार्थ खाऊन वैतागला असाल तर ज्वारीचा पुलाव नक्की ट्राय करुन बघा.(jowar recipe for weight loss) ज्वारी ही अत्यंत पौष्टिक धान्यांपैकी एक आहे. यात फायबर, प्रोटीन, लोह आणि मॅग्नेशियमचे प्रमाण भरपूर असते.(jowar for weight loss) त्यामुळे हा पदार्थ पोटभरण्यासाठीच नाही तर पचनक्रिया सुधारण्यास देखील मदत करतात.(high fiber breakfast food) वजन कमी करण्याचा किंवा शुगर कंट्रोल करणाऱ्यांसाठी ज्वारीचा पुलाव हा उत्तम पर्याय आहे. ही रेसिपी कशी बनवायची? यासाठी लागणारे साहित्य आणि कृती बघूया.
Diwali Faral: ना जास्त तेल लागते, ना लागतो वेळ- दिवाळीसाठी घरच्याघरी करा हलकीफुलकी नमकीन मठरी
साहित्य
ज्वारी - दीड कप
पाणी - अडीच कप
हळद - १ चमचे
मीठ - चवीनुसार
तूप - १ मोठा चमचा
हिंग - १ चमचा
मोहरी - १ चमचा
जीरे - १ चमचा
बारीक चिरलेला लसूण - १ चमचा
हिरवी मिरची - २ ते ३
कढीपत्ता पाने
काळी मिरी
बारीक चिरलेला गाजर - १
मटार - १ वाटी
मक्याच दाणे -१ वाटी
बारीक चिरलेला कांदा - १
लाल शिमला मिरची - १
धने पावडर - १ चमचा
पाव भाजी मसाला - १ चमचा
लाल मिरची पावडर - १ चमचा
लिंबाचा रस - १ छोटा चमचा
कोथिंबीर - आवश्यकतेनुसार
तळलेले काजू - आवडीनुसार
शेंगदाणे
कृती
1. सगळ्यात आधी आपल्याला ज्वारी दोन पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यावी लागेल. आता त्यात दीड कप पाणी घालून किमान ८ तास किंवा १ पूर्ण दिवस भिजत ठेवा. आता कुकरमध्ये पाणी घालून त्यात हळद, मीठ आणि भिजवलेली ज्वारी घालून १० मिनिटे शिजवून घ्या. ज्यामुळे ते नरम होतील
2. कढईत तूप घालून त्यात जिरे, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली मिरची घालून चांगले परतवून घ्या. आता यात काळीमिरी, कांदा, गाजार, मक्याचे दाणे, मटार आणि शिमला मिरची घालून चांगले परतवून घ्या. यामध्ये मसाले घालून पुन्हा चांगले परतवून घ्या. झाकण झाकून भाज्यांना शिजू द्या.
3. यात आता शिजवलेली ज्वारी घालून एकजीव करा. शिजल्यानंतर त्यात लिंबाचा रस, कोथिंबीर, शेंगदाणे आणि तळलेले काजू घाला. पुन्हा परतवून घ्या. तयार होईल टेस्टी आणि हेल्दी ज्वारीचा पुलाव. चवीला मस्त आणि वजनही कमी करणारा...
