Join us

भोपळ्याच्या बियांची चटणी, वेटलॉससाठी पंपकिन सीड्स खाण्याचा पारंपरिक चटकदार मार्ग-पाहा इन्स्टंट रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2025 13:20 IST

Pumpkin Seeds Dry Chatney Recipe : How To Make Pumpkin Seeds Dry Chatney At Home : भोपळ्याच्या बियांची करा तोंडी लावण्यासाठी कुरकुरीत, आंबट - तिखट चटणी, चव इतकी भारी की...

आजकाल आरोग्य आणि फिटनेसबद्दलची जागरूकता वाढल्यामुळे आपल्या आहारात सुपरफूड्स आणि पौष्टिक बियांचा समावेश करण्यावर भर दिला जातो.  अशाच पौष्टिक बियांमध्ये भोपळ्याच्या बिया या हेल्दी आणि आरोग्यासाठी फायदेशीर मानल्या जातात. भोपळ्याच्या बियांमध्ये प्रथिने, गुड फॅट्स, मॅग्नेशियम आणि झिंक यांसारख्या आवश्यक पोषक तत्वांचे प्रमाण खूप जास्त असते, ज्या हृदयाचे आरोग्य, रोगप्रतिकारशक्ती आणि हाडांच्या बळकटीसाठी अत्यंत उपयुक्त असतात. पण, रोज या बिया नुसत्या खाणे कंटाळवाणे वाटू शकते. म्हणूनच, या आरोग्यदायी बियांचा आहारात समावेश करण्याचा एक उत्तम आणि (How To Make Pumpkin Seeds Dry Chatney At Home) चविष्ट मार्ग म्हणजे त्यांची सुकी चटणी तयार करणे...

ही चटणी म्हणजे पोषक घटक आणि अस्सल पारंपरिक चव यांचा सुंदर मिलाफ... साध्या भाकरीसोबत, गरमागरम इडली - डोशासोबत किंवा नुसती तोंडी लावण्यासाठी ही कुरकुरीत आणि तिखट-आंबट चटणी तुमचा जेवणाची चव अधिकच लज्जतदार करेल. भोपळा जितका आरोग्यासाठी फायदेशीर आहे तितक्याच त्याच्या बियाही पौष्टिक असतात. अनेकजण या बिया फेकून देतात, पण या छोट्या बियांमध्ये लपलेले पोषक घटक शरीराला फायदेशीर ठरतात. भोपळ्याच्या बियांपासून सुकी चटणी (Pumpkin Seeds Dry Chatney Recipe) झटपट तयार करण्याची रेसिपी पाहूयात... 

साहित्य :- 

१. भोपळ्याच्या बिया - १ कप २. लसूण पाकळ्या - ३ ते ४ ३. कडीपत्ता - ६ ते ७ पाने  ४. सुकं खोबरं - ३ ते ४ टेबलस्पून (किसलेलं)५. लाल सुक्या मिरच्या - २६. मीठ - चवीनुसार ७.लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून ८. गूळ पावडर - १ टेबलस्पून

नागपुरी संत्रा बर्फी घरीच करा आता सहज, पाहा मस्त रेसिपी आणि करा १० दिवस टिकणारी रसाळ ताज्या संत्र्यांची बर्फी...

मिक्सरमध्ये वाटल्यासारखं ‘असं’ फिरवा ढोकळ्याचं पीठ, कापसाहून हलका जाळीदार ढोकळा करण्याची सोपी ट्रिक...

कृती :- 

१. एका कढईत भोपळ्याच्या बिया घेऊन त्या २ ते ५ मिनिटे मंद आचेवर व्यवस्थित खरपूस कोरड्या भाजून घ्याव्यात. २. बिया भाजून झाल्यावर त्यात लसूण पाकळ्या व कडीपत्ता देखील घालावा मंद आचेवर भाजल्यावर त्यात सुकं खोबरं आणि लाल सुक्या मिरच्या देखील घालाव्यात. 

३. सगळे मिश्रण एकत्रित खरपूस भाजून झाल्यावर एका डिशमध्ये काढून थोडे थंड होऊ द्यावे. ४. हे थंड झालेलं मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यात भरून त्यात चवीनुसार मीठ, लाल तिखट मसाला, गूळ पावडर घालावी. हे सगळे जिन्नस एकत्रित मिक्सरमध्ये वाटून त्याची थोडी जाडसर अशी भरड तयार करून घ्यावी. 

भोपळ्याच्या बियांची सुकी चटणी खाण्यासाठी तयार आहे. ही तयार चटणी आपण एका एअर टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. भोपळ्याच्या बियांची चटणी आपण चपाती, भाकरी किंवा भातासोबत तोंडी लावायला म्हणून चवीने खाऊ शकता.

टॅग्स :अन्नपाककृती