Join us
Daily Top 2Weekly Top 5

कुरमुऱ्याची भेळ नाही करा इन्स्टंट उत्तप्पा! ना पीठ आंबवण्याची कटकट, ना डाळ - तांदूळ वाटण्याची झंझट - चविष्ट रेसिपी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2026 15:21 IST

Puffed Rice Uttappa Recipe : घरच्याघरीच उडपी स्टाईल कुरमुऱ्यांचा इन्स्टंट उत्तप्पा कसा करायचा याची रेसिपी...

सकाळच्या घाईगडबडीत नाश्त्याला काय करायचं, हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला पडतो. सहसा उत्तप्पा किंवा डोसा करायचा म्हटलं की आदल्या दिवशी डाळ-तांदूळ भिजवणे आणि ते पीठ आंबवणे आलेच. पण जर तुमच्याकडे वेळ नसेल आणि काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा असेल, तर 'कुरमुऱ्यांचा इन्स्टंट उत्तप्पा' हा एक उत्तम पर्याय आहे. पारंपरिक पद्धतीने उत्तप्पा (Puffed Rice Uttappa Recipe) करण्यासाठी डाळ-तांदूळ भिजवणे, वाटणे आणि पीठ आंबवण्यासाठी तासंतास वाट पाहावी लागते. पण जर हे सगळं टाळून अगदी काही मिनिटांत मऊ, चवदार आणि हेल्दी उत्तप्पा तयार झाला तर? कुरमुऱ्यांपासून बनणारा इन्स्टंट उत्तप्पा हा त्यासाठी परफेक्ट पर्याय ठरतो.

ना भिजवण्याची गरज, ना आंबवण्याचा त्रास - कमी साहित्य आणि झटपट तयार होणारी ही रेसिपी घाई - गडबडीच्या वेळी अगदी योग्य आहे. ज्या कुरमुऱ्यांचा वापर आपण भेळ बनवण्यासाठी करतो, त्यापासून हॉटेलसारखा मऊ आणि जाळीदार उत्तप्पा तयार होऊ शकतो. हा पदार्थ केवळ चविष्टच नाही, तर पचायलाही हलका आहे. विशेषतः ज्यांना 'वेट लॉस' करायचे (quick breakfast recipe with puffed rice) आहे किंवा तेलकट पदार्थ टाळायचे आहेत, त्यांच्यासाठी हा नाश्ता म्हणजे बेस्ट पदार्थ...घरच्याघरीच उडपी स्टाईल कुरमुऱ्यांचा इन्स्टंट उत्तप्पा कसा करायचा याची रेसिपी पाहूयात.   

साहित्य :- 

१. कुरमुरे - २ कप २. बारीक रवा - १ कप ३. दही - १ कप ४. पाणी - गरजेनुसार५. गाजर - १/२ कप (किसलेलं गाजर)६. कोथिंबीर - २ ते ३ टेबलस्पून७. कांदा - १/२ कप (बारीक चिरलेला)८. टोमॅटो -  १/२ कप (बारीक चिरलेला)९. ढोबळी मिरची -  १/२ कप (बारीक चिरलेली)१०. मीठ - चवीनुसार११. बेकिंग सोडा - चिमूटभर१२. तेल - ४ ते ५ टेबलस्पून१३. सांबार मसाला / पुडी मसाला - चिमूटभर

‘मूगडाळ कोळीवाडा’ हा तुम्ही खाल्लाच नाही अजून, घ्या रेसिपी-मूगभजी विसराल असा झणझणीत पदार्थ...

अश्विनी काळसेकरांच्या घरी केलं जातं शेवग्याच्या शेंगांचं पारंपरिक लोणचं! जेवणाची चव वाढवणारी सुपरहिट रेसिपी... 

कृती :- 

१. मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यात कुरमुरे, बारीक रवा, दही असे सगळे जिन्नस एकत्रित घेऊन ते एकत्रित वाटून त्याचे बॅटर तयार करून घ्यावे. २. गरजेनुसार या बॅटरमध्ये थोडं - थोडं पाणी घालून पुन्हा एकदा चमच्याने कालवून एकजीव करुन मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे. ३. मिक्सरमधून वाटून घेतलेलं बॅटर एका बाऊलमध्ये काढून त्यात आपल्या आवडीनुसार बारीक चिरलेल्या भाज्या घालाव्यात. आपण किसलेलं गाजर, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची घालावी. 

४. सगळ्यात शेवटी सगळे जिन्नस घालून झाल्यावर बाऊलवर झाकण ठेवून १० ते १५ मिनिटे झाकून ठेवावं. ५. त्यानंतर मिश्रणात चवीनुसार मीठ आणि बेकिंग सोडा घालून चमच्याने कालवून बॅटर तयार करून घ्यावे. ६. पॅन व्यवस्थित गरम करून पॅनला तेल लावून तयार बॅटर पॅनवर गोलाकार पद्धतीने पसरवून उत्तपा तयार करून घ्यावा. आपल्या आवडीनुसार वरूनसांबार मसाला भुरभुरवून घ्यावा. 

गरमागरम, मऊसूत, लुसलुशीत असा कुरमुऱ्याचा उत्तपा खाण्यासाठी तयार आहे. हिरवी चटणी किंवा सांबर सोबत हा उत्तपा खायला अधिकच चविष्ट लागतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Instant Puffed Rice Uttapam: Quick, easy, and delicious breakfast recipe!

Web Summary : Skip the soaking and grinding! Make instant puffed rice uttapam for a quick, healthy, and delicious breakfast. It's easy, light, and perfect for weight loss.
टॅग्स :अन्नपाककृती