'लसूण' हा भारतीय स्वयंपाक घरातील सर्वात महत्वाचा आणि जास्त वापरला जाणारा पदार्थ आहे. आपल्याकडील बऱ्याचशा पदार्थांमध्ये लसूण हा वापरला जातोच. भाजी, आमटीला फोडणी देण्यासाठी लसूण (How to Use Garlic in Cooking) लागतोच. खाद्यपदार्थांची चव वाढण्यासाठी लसूण हमखास वापरतात. लसूण (Proper Method Of Using Garlic In Cooking) खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. लसणामध्ये, व्हिटॅमिन बी३, व्हिटॅमिन सी, झिंक, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फोलेट मुबलक प्रमाणात असतात. याचबरोबर यात असलेल्या अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते(10 minutes rule about garlic).
लसूणाची खमंग, कडकडीत फोडणी एखाद्या पदार्थाला घातली की त्या पदार्थाची चव, स्वाद सगळंच कसं खुलून येतं. त्यामुळे आपल्या रोजच्या स्वयंपाकात तर बऱ्याचदा लसूण असतोच. आता एखाद्या पदार्थात जेव्हा लसूण घालायचा असतो तेव्हा आपण तो सोलून घेतो, चिरतो आणि मग लगेच फोडणीत किंवा अन्य पदार्थांमध्ये घालतो. परंतु न्यूट्रिशनिस्ट दीपशिखा जैन यांच्या म्हणण्यानुसार लसूण खाण्याची ही योग्य पद्धत नाही. कोणत्याही पदार्थांत लसणाचा वापर करण्याची एक योग्य पद्धत असते, जी ९० % लोकांना माहीतच नाही. चुकीच्या पद्धतीने लसूण खाल्ल्यास आपल्याला त्याचे संपूर्ण फायदे आणि त्यातील आवश्यक पोषक घटक मिळत नाहीत. यासाठी लसूण सोलल्यानंतर तो कोणत्याही पदार्थांत घालण्यापूर्वी लसूणाचा '10 minute rule' फॉलो कराच. लसूणाचा '10 minute rule' म्हणजे नेमकं काय आहे ते पाहूयात.
स्वयंपाकात लसूण वापरण्याची योग्य पद्धत...
स्वयंपाक करताना लसूण नेमका कोणत्या पद्धतीने वापरावा, याविषयीचा एक व्हिडिओ न्यूट्रिशनिस्ट दीपशिखा जैन यांनी त्यांच्या fries.to.fit या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी लसूणाच्या '10 minute rule' विषयी माहिती दिली आहे.
न्यूट्रिशनिस्ट दीपशिखा जैन यांच्या मते, लसूणामध्ये ॲलिसीन (Allicin) नावाचं एक कम्पाउंड असतं. लसूण खाल्ल्याने शरीराला जे फायदे मिळतात, ते बहुतांश फायदे त्यातील ॲलिसीन या घटकामुळेच मिळतात.
वेटलॉससाठी तुम्हीसुद्धा 'हे' ६ शॉर्टकट वापरत असाल तर थांबा! वजन कणभर कमी होणार नाही, कारण...
लसूणामधलं ॲलिसीन ॲक्टीवेट होण्यासाठी काही मिनिटांची गरज असते. म्हणजेच आपण लसूण चिरतो तेव्हा त्यानंतर काही मिनिटांनी ॲलिसीन ॲक्टीव्हेट होतं आणि ते ॲक्टीवेट झाल्यानंतरच लसूण खाल्ल्याने शरीराला त्याचे फायदे मिळतात.
ब्रेडचे ‘हे’ ६ पदार्थ म्हणजे मेजवानीच! नाश्ता ते स्वीट डिश, ब्रेड है मुमकीन है!
यंदा वाळवणात करा वर्षभर टिकणारी दही मिरची, तोंडी लावायला खास चमचमीत पदार्थ...
पण आपण जेव्हा लसूण चिरून लगेच तो फोडणीला घालतो, तेव्हा ॲलिसीन डिॲक्टीव्हेट होतं आणि लसूण खाण्याचा म्हणावा तसा फायदा आपल्या शरीराला होत नाही. त्यामुळे लसूण चिरल्यानंतर किमान १० मिनिटे थांबा. तो लगेच फोडणीत घालण्याची घाई करू नका.
हवं तर त्यासाठी थोडं आधीच नियोजन करून ठेवा. पण लसूण चिरून तो काही तास तसांच फ्रिजमध्ये ठेवायचा आणि त्यानंतर तो वापरायचा असं मात्र करू नका. कारण यामुळे लसूण खाण्यायोग्य राहात नाही.