Join us  

तेलाचा एकही थेंब न वापरता करा पोह्याचे मेदू वडे, चमचमीत रेसिपी-वेटलॉससाठीही उपयोगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2023 11:10 AM

Poha Suji Naasta | Healthy Steam Vada Perfect Breakfast Meal : डाळीचे तळलेले मेदू वडे आपण खातोच, आता पोह्याचे वाफवलेले मेदू वडे खाऊन पाहा..

नाश्त्यामध्ये अनेक जणांना पोहे (Pohe) खायला आवडतात. पोहे, उपमा, साऊथ इंडियन पदार्थ आवडीने खाल्ले जातात. पोहे अनेक प्रकारचे केले जातात. कांदे पोहे, तर्री पोहे यासह पोह्याचा डोसा, इडली देखील केली जाते. शिवाय पोह्याचा वापर अनेक पदार्थांमध्ये देखील होतो. पण आपण कधी पोह्याचा स्टीम मेदू वडा खाऊन पाहिलं आहे का?

जर आपल्याला मेदू वडा खाण्याची इच्छा झाली असेल, पण तेलकट मेदू वडा खायचं नसेल तर, एकदा पोह्याचा स्टीम मेदू वडा करून पाहा. जे लोकं फिटनेस फ्रिक आहेत, त्यांना ही रेसिपी नक्कीच आवडेल शिवाय करायलाही सोपी आहे (Cooking Tips). चला तर, खायला पौष्टीक करायला सोपी ही रेसिपी नक्की कशी करायची पाहूयात(Poha Suji Naasta | Healthy Steam Vada Perfect Breakfast Meal).

पोह्याचा हेल्दी मेदू वडा करण्यासाठी लागणारं साहित्य

पोहे

रवा

दही

मीठ

हिरवी मिरची

कडीपत्ता

वाफाळलेल्या भाज्या खाऊन कंटाळलात? खाऊन पाहा चटकदार वेट लॉस चाट, वजन होईल कमी-पोटही होईल सपाट

लाल सुकी मिरची

कोथिंबीर

कृती

सर्वप्रथम, ज्याप्रमाणे आपण कांदे पोहे तयार करण्यासाठी पोहे भिजवून घेतो, त्याप्रमाणे पोहे भिजवून घ्या. नंतर मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले पोहे, एक कप रवा, एक कप दही, चवीनुसार मीठ, आलं, हिरवी मिरची, कडीपत्ता घालून गुळगुळीत पेस्ट तयार करा. तयार पेस्ट एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात बारीक चिरलेली लाल सुकी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा. त्यावर १० मिनिटांसाठी झाकण ठेवा.

हिवाळ्यात खा कणकेचे पौष्टिक लाडू, पंजाबी पिन्नीचा पाहा भन्नाट प्रकार, लाडू टिकतील महिनाभर

स्टीमरमध्ये पाणी घालून गरम करण्यासाठी ठेवा. हाताला पाणी लावून पिठाला वड्याचा आकार द्या, व इडली पात्रात ठेऊन वाफवून घ्या. तयार वडे वाफवून घेतल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्या. अशा प्रकारे पोह्याचे वाफवलेले वडे खाण्यासाठी रेडी. 

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स