सकाळच्या घाई - गडबडीत पौष्टिक आणि चविष्ट नाश्ता तयार करणे हे एक मोठे कठीण काम असते. अशावेळी पोह्यांपासून तयार केलेला ढोकळा हा एक 'स्मार्ट चॉईस' ठरू शकतो. कमी तेलकट, पचायला हलका आणि दिसायला अगदी पांढराशुभ्र असणारा हा ढोकळा चवीला अप्रतिम लागतो. नेहमीच्या बेसन ढोकळ्यापेक्षा काहीतरी वेगळं आणि चटपटीत ट्राय करायचं असेल, तर ही पोह्यांच्या ढोकळ्याची रेसिपी खूप खास आहे(Poha Suji Dhokla Recipe).
फक्त १५ ते २० मिनिटांत तयार होणारा 'पोह्यांचा पांढराशुभ्र ढोकळा' तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. दिसायला अतिशय सुंदर आणि चवीला कापसासारखा मऊ लागणारा हा ढोकळा लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच नक्की आवडेल. डाळ - तांदूळ भिजवण्याचे टेन्शन नाही की, फरमेंटेशनची वाट पाहण्याची गरज नाही. अगदी मोजक्या साहित्यात ( soft poha suji dhokla recipe) आणि कमी वेळेत तयार होणारा हा इन्स्टंट पोहा ढोकळा कसा (poha rava dhokla at home) करायचा याची रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. पोहे - १ कप (पातळ/मध्यम)२. बारीक रवा - १/२ कप ३. दही - १/२ कप४. पाणी - गरजेनुसार५. मीठ - चवीप्रमाणेच ६. साखर - १ टेबलस्पून ७. हळद - १/४ टेबलस्पून ८. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ मिरच्या९. आलं - १/२ इंचाचा छोटा तुकडा१०. लिंबाचा रस - १ टेबलस्पून१२. तेल - २ ते ३ टेबलस्पून १३. मोहरी - १ टेबलस्पून १४. पांढरे तीळ - १ टेबलस्पून १५. कडीपत्ता - १० ते १२ पाने १६. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)१७. खोबर - २ टेबलस्पून (किसलेले)
ना कांदेपोहे ना मटारपोहे ना तर्रीपोहे आता खा चटणी पोहे! चमचमीत चवीचे असे पोहे एकदा खा-रोज कराल...
कांद्याच्या पातीची भाजी नाही भजी करा, कांदाभजींपेक्षा भारी कुरकुरीत भजी-थंडीत तर खायलाच हवीत!
कृती :-
१. सर्वात आधी पोहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हलकेसे फिरवून घ्या आणि थोडेसे बारीक करून घ्या. अगदी पीठसारखे नाही, पण साधारण रवा/भरड अशा टेक्स्चरचे झाले तरी चालते. यामुळे ढोकळ्याला छान मऊपणा आणि जाळीदारपणा येतो.२. बारीक केलेल्या पोह्यांची भरड, रवा, दही, मीठ, साखर, हळद हे सर्व एकत्र करा. नंतर गरजेप्रमाणे पाणी घालून इडलीच्या बॅटरसारखे मध्यम घट्ट बॅटर बनवा. बॅटर फार पातळ झाला तर ढोकळा बसतो, आणि फार घट्ट झाला तर मऊ होत नाही.३. हे बॅटर १० मिनिटे झाकून ठेवा. रवा आणि पोहे थोडेसे फूलतात आणि ढोकळा अधिक स्पॉंजी होतो. आले- हिरव्या मिरचीची पेस्ट, लिंबाचा रस, तेल घालून बॅटर २ ते ३ मिनिटे छान फेटा. फेटल्यामुळे बॅटरमध्ये हवा मिसळते आणि इनो/ सोड्याशिवाय सुद्धा ढोकळा फुगतो.
प्रेशर कुकरचा स्फोट होण्यापूर्वी हमखास दिसतात ६ लक्षणं, ९०% लोक करतात एक चूक...
४. कुकर/इडलीपात्रात १ ग्लास पाणी गरम करा. ढोकळा बनवायच्या ट्रेमध्ये/थाळीत तेल लावा. नंतर बॅटर त्यात ओता आणि कुकरमध्ये शिट्टी न लावतामध्यम आचेवर १२ ते १५ मिनिटे वाफवा. टुथपिक/सुरीने तपासा स्वच्छ बाहेर आली तर ढोकळा तयार!५. ढोकळा थोडा थंड झाल्यावर कापून घ्या. एका छोट्या पॅनमध्ये तेल गरम करा. मोहरी टाका, तडतडल्यावर पांढरे तीळ, कडीपत्ता, हिरव्या मिरच्या घाला. नंतर ३ ते ४ टेबलस्पून पाणी १ टेबलस्पून साखर घाला आणि ही फोडणी ढोकळ्यावर ओता. या पाण्यामुळे ढोकळा आणखी रसाळ आणि मऊ होतो आणि फोडणी पूर्ण आतपर्यंत जाते.
हा ढोकळा हिरवी चटणी, टोमॅटो सॉस, किंवा गोड चटणीसोबत खायला एकदम परफेक्ट...
परफेक्ट जाळीदार ढोकळ्यासाठी...
१. बॅटर कमीतकमी १० मिनिटे सेट होऊ द्या.२. बॅटर जास्त फेटा म्हणजेच हवा मिसळते.३. वाफवताना गॅसची आच मध्यम ठेवा.४. ढोकळा कापण्याआधी ५ मिनिटे थंड होऊ द्या.
Web Summary : Make delicious Poha Dhokla in minutes! This quick recipe uses readily available ingredients like poha and rava for a soft, fluffy, and healthy snack. Perfect for busy mornings, it's a delightful twist on traditional dhokla.
Web Summary : मिनटों में स्वादिष्ट पोहा ढोकला बनाएं! यह त्वरित रेसिपी पोहा और रवा जैसी आसानी से उपलब्ध सामग्री का उपयोग करके एक नरम, फूला हुआ और स्वस्थ नाश्ता बनाती है। व्यस्त सुबह के लिए बिल्कुल सही, यह पारंपरिक ढोकला पर एक रमणीय मोड़ है।