टम्म फुगलेली, मऊसूत, खुसखुशीत पुरी म्हणजे घरांतील सगळ्यांचा वीक पॉईंट. गरमागरम पुरी म्हटलं की प्रत्येकाच्याच तोंडाला पाणी सुटतं. पुरी आपण सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत कधीही खाऊ शकतो. हलक्या भुकेसाठी (Poha Masala Puri Recipe) काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत खायची इच्छा झाली की, आपल्याला (Poha Masala Puri) पटकन पुरी आठवते. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या पुऱ्या तर करतोच त्यापैकीच पोहा मसाला पुरी हा त्यातलाच एक खास प्रकार. नेहमीच्या नाश्त्याला पोहे, पोह्यांचे पॅटिस - कटलेट खाऊन कंटाळा आला असेल तर 'पोहा मसाला पुरी' हा नवीन चविष्ट पदार्थ नाश्त्यासाठी बेस्ट पर्याय आहे(How To Make Poha Masala Puri).
पोहे, गव्हाचे पीठ व मसाले वापरुन तयार केलेली पुरी, पारंपरिक पुरीपेक्षा अधिक चविष्ट, कुरकुरीत आणि पौष्टिक असते. या पुरीमध्ये मसाल्याचा तिखटपणा आणि पोह्याचा कुरकुरीतपणा आल्यामुळे, पुरीचा प्रत्येक घास एक वेगळी चव देतो. साध्या पुरीला एक नवा ट्विस्ट देणारी ही पोहा मसाला पुरी झटपट कशी करायची याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. पोहे - १ कप २. पिवळी मुगाची डाळ - १ कप (४ ते ५ तास पाण्यांत भिजवलेली)३. आलं - लसूण पेस्ट - १ टेबलस्पून ४. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ ५. पाणी - गरजेनुसार ६. बारीक रवा - १/२ कप ७. हळद - १ टेबलस्पून ८. धणेजिरेपूड - १/२ टेबलस्पून ९. ओवा - १/२ टेबलस्पून १०.चिलीफ्लेक्स - १ टेबलस्पून ११. मीठ - चवीनुसार१२. कोथिंबीर - १/२ कप (बारीक चिरलेली)१३. गव्हाचे पीठ - २ कप
कृती :-
१. पोह्यात थोडे पाणी घालून ते भिजवून घ्यावेत. पिवळी मूग डाळ देखील पाणी घालून ४ ते ५ तास भिजवून घ्यावी. २. आता एका मिक्सरच्या भांड्यात भिजवून घेतलेली पिवळी मूग डाळ घेऊन ती बारीक वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्यावी. मग त्याच मिक्सरच्या भांड्यात भिजवलेले पोहे घेऊन ते देखील बारीक वाटून त्यांची पेस्ट तयार करून घ्यावी. ३. आता एक मोठ्या बाऊलमध्ये वाटून घेतलेलं मिश्रण काढून ते एकत्रित मिसळून घ्यावे.
वाटीभर साबुदाण्याचे गोड लाडू! तोंडात टाकताच विरघळणाऱ्या लाडूची चवचन्यारी - उपवास होईल खास...
४. मग या मिश्रणात बारीक रवा, हळद, धणेजिरेपूड, ओवा, चिलीफ्लेक्स, चवीनुसार मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. हे सगळे मिश्रण एकत्रित कालवून घ्यावे. मग या मिश्रणात गव्हाचे पीठ घालून पुऱ्यांसाठीचे पीठ मळून घ्यावे. मळून घेतलेल पीठ १० मिनिटे झाकून ठेवावं. ५. नंतर या पिठाचे छोटे गोळे तयार करून पुऱ्या लाटून घ्याव्यात. ६. कढईत तेल गरम करून पुऱ्या हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्याव्यात.
मस्त खमंग अशा गरमागरम टम्म फुगलेल्या खुसखुशीत पोहा मसाला पुरी खाण्यासाठी तयार आहेत. या पुऱ्या आपण नाश्त्याला किंवा जेवणासाठी काहीतरी वेगळं म्हणून देखील करु शकता. दही किंवा हिरव्या चटणी सोबत या पुऱ्या खायला अधिकच चविष्ट लागतात.
Web Summary : Make crispy Poha Masala Puri for a tasty breakfast or snack. This recipe uses poha, wheat flour, and spices for a unique, flavorful twist on traditional puri. Enjoy it with yogurt or chutney.
Web Summary : कुरकुरा पोहा मसाला पूरी एक स्वादिष्ट नाश्ता या स्नैक के लिए बनाएं। यह रेसिपी पारंपरिक पूरी पर एक अनोखा, स्वादिष्ट ट्विस्ट के लिए पोहा, गेहूं का आटा और मसालों का उपयोग करती है। इसे दही या चटनी के साथ परोसें।