भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चहाचे चहाते तर आहेतच, पण त्यांना कॉफी देखील तितकीच आवडते. ओडिशाच्या कोरापुट (Koraput) जिल्ह्यातील खास ओळख असलेल्या कोरापुट कॉफीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही लक्ष वेधून घेतले आहे. त्यांनी आपल्या 'मन की बात' कार्यक्रमात या कॉफीचे विशेष कौतुक केले आणि तिचे फायदे देखील सांगितले. कोरापुट कॉफी आपल्या अनोख्या चवीच्या आणि सुगंधाच्या जोरावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील आपली ओळख निर्माण करत आहे(pm Narendra Modi Praised Koraput Coffee In Mann Ki Baat Know Its Benefits).
कोरापुट कॉफी म्हणजे काय ?
कोरापुट हा ओडिशा राज्यातील डोंगराळ, आदिवासी प्रदेश आहे. येथील सुपीक जमीन, थंड हवामान आणि मुबलक पाऊस हे कॉफी शेतीसाठी उत्तम वातावरण तयार करतात. या भागात अरबिका (Arabica) जातीची कॉफी प्रामुख्याने पिकवली जाते, जी अत्यंत हलकी, सुगंधी आणि कमी कडवट चवीची असते. फार उंचीवर आणि थंड हवामानामुळे कॉफीचे दाणे हळूहळू पिकतात( pm narendra modi koraput coffee).
हिवाळ्यात घशाची खवखव- सर्दी - खोकल्यावर नागवेलीच्या पानांचा रामबाण उपाय - एकदाच करा मिळेल आराम...
कॉफीचे दाणे हळूहळू पिकल्यामुळे दाण्यांमध्ये अधिक सुंदर आणि उत्तम दर्जाची चव नैसर्गिकरित्या आपोआप तयार होते. ही कॉफी पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने तयार केली जाते म्हणजेच रासायनिक खतांचा किंवा कीटकनाशकांचा वापर केला जात नाही. त्यामुळे ती आरोग्यासाठी सुरक्षित आणि मुळातच नैसर्गिकरित्या चवदार असते.
कोरापुट कॉफी तिच्या खास चव आणि सुगंधासाठी ओळखली जाते, जी तिला इतर भारतीय कॉफीच्या प्रकारापेक्षा वेगळी असल्याचे सांगते. या कॉफीमध्ये फळांचा, चॉकलेटचा आणि हलक्या मसाल्याचा अनोखा आणि उत्तम सुगंध असतो. या कॉफीच्या लागवडीत स्थानिक आदिवासी महिलांचा मोठा सहभाग असतो. त्यांनी पारंपरिक आणि सेंद्रिय पद्धतीने लागवड केल्यामुळे या कॉफीला एक नैसर्गिक चव मिळते.
तमन्ना भाटियाचा फिटनेस ट्रेनर सांगतो, वर्कआऊट करताना करताय ७ चुका म्हणून होत नाही वजन कमी...
कोरापुट कॉफी पिण्याचे आरोग्यदायी फायदे...
कोरापुट कॉफीला तिच्या उच्च पोषणमूल्यांमुळे आरोग्यदायी मानले जाते. या कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण सर्वात जास्त असते. हे घटक आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर असतात, याचबरोबर या कॉफीतील पौष्टिक घटकांमुळे वय वाढण्याची प्रक्रिया मंदावते. अरेबिका कॉफीमध्ये सामान्यतः चांगल्या प्रमाणात व्हिटॅमिन, मिनरल्स आणि पोटॅशियम असते. इतर कॉफीप्रमाणेच, यातील कॅफिनसुद्धा शारीरिक ऊर्जा वाढवते, ज्यामुळे कामामध्ये अधिक लक्ष केंद्रित करण्यास मदत मिळते. नियमित आणि योग्य प्रमाणात कॉफी प्यायल्यास चयापचय क्रिया सुधारते, जे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
Web Summary : PM Modi praised Koraput coffee from Odisha in 'Mann Ki Baat'. Grown in Koraput's hills, this Arabica coffee is known for its unique flavor, aroma, organic production and health benefits. It supports local tribal women and boosts energy.
Web Summary : पीएम मोदी ने 'मन की बात' में ओडिशा की कोरापुट कॉफी की प्रशंसा की। कोरापुट की पहाड़ियों में उगाई जाने वाली यह अरेबिका कॉफी अपने अनूठे स्वाद, सुगंध, जैविक उत्पादन और स्वास्थ्य लाभों के लिए जानी जाती है। यह स्थानीय आदिवासी महिलाओं का समर्थन करती है और ऊर्जा बढ़ाती है।