Join us

Pitru Paksh 2025 : कापसासारखे मऊ दही वडे करण्याची एकदम सोपी रेसिपी; दहीवडा होईल परफेक्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2025 14:21 IST

Pitru Paksh 2025 How To Make Dahi Vada (Dahi vade kase kartat) : डाळी आणि दह्याचा वापर करून तयार केला जाणारा हा पदार्थ चवीला उत्तम असून आरोग्याच्या दृष्टीनंही फायदेशीर ठरतो. (Soft Dahi Vada Recipe)

पितृपक्षात (Pitru Paksh 2025) वेगेवगळ्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यात प्रामुख्यानं घराघरांत केला जाणारा पदार्थ म्हणजे दही वडे. दही वडे चवीला गोड आंबट असे असून अनेकांना खायला खूपच आवडतात. पण घरात केले जाणारे दही वडे विकतच्या वड्यांसारखे वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट होत नाही अशी अनेकांची तक्रार असते. दही वडे करण्याची सोपी रेसिपी पाहूया(How To Make Dahi Vada). यात उडीदाच्या डाळीचा वापर केला जातो. डाळी आणि दह्याचा वापर करून तयार केला जाणारा हा पदार्थ चवीला उत्तम असून आरोग्याच्या दृष्टीनंही फायदेशीर ठरतो. (Soft Dahi Vada Recipe)

दही वडे करण्यासाठी लागणारं साहित्य

उडीद डाळ- १ कप

आले-मिरची पेस्ट- १ चमचा

मीठ- चवीनुसार

तेल- तळण्यासाठी

दही- २ कप (घट्ट आणि आंबट नसलेले)

साखर- २ चमचे

चाट मसाला- १ चमचा

लाल तिखट - १/२ चमचा

जिरे पूड- १/२ चमचा

चिंचेची चटणी- २ चमचे

हिरवी चटणी- १ चमचा

बारीक शेव किंवा डाळिंबाचे दाणे- सजावटीसाठी

दही वडे करण्याची सोपी कृती

सर्वप्रथम उडीद डाळ स्वच्छ धुऊन कमीत कमी ५-६ तास किंवा रात्रभर भिजत ठेवा. डाळीतील पाणी पूर्णपणे काढून टाका. आता डाळ मिक्सरमध्ये अगदी थोडं पाणी घालून बारीक वाटून घ्या. डाळीचे पीठ एकदम मऊ आणि फुललेलं असावं.

वाटलेल्या डाळीच्या पिठात आलं-मिरची पेस्ट आणि चवीनुसार मीठ घालून चांगले फेटून घ्या. पीठ एकाच दिशेने साधारण १०-१५ मिनिटे फेटल्याने त्यात हवा भरते आणि वडे मऊ होतात. पिठाची कन्सिस्टन्सी तपासण्यासाठी एका वाटीत पाणी घेऊन त्यात थोडं पीठ टाका. जर ते तरंगले तर पीठ तयार आहे.

एका कढईत तेल गरम करा. तेल गरम झाल्यावर मध्यम आचेवर वडे तळण्यासाठी सोयीस्कर होईल. हाताला थोडं पाणी लावून पिठाचा छोटा गोळा घेऊन त्याला वड्याचा आकार द्या आणि गरम तेलात सोडा. वडे सोनेरी रंगावर तळून घ्या.

तळलेले गरम वडे लगेचच कोमट पाण्यात टाका. वडे साधारण १०-१५ मिनिटे पाण्यात राहू द्या. असे केल्याने ते नरम होतात आणि त्यातील जास्तीचे तेल निघून जाते.

दुसऱ्या एका भांड्यात दही घेऊन त्यात साखर आणि थोडं मीठ घालून चांगले फेटून घ्या. दही एकदम गुळगुळीत झालं पाहिजे. पाण्यात भिजलेले वडे हाताने हलके दाबून त्यातील पाणी काढून टाका. एका प्लेटमध्ये वडे ठेवून त्यावर तयार केलेले गोड दही घाला.

आता वरून जिरे पूड, लाल तिखट आणि चाट मसाला,तुम्हाला आवडत असल्यास चिंचेची चटणी आणि हिरवी चटणी घाला. बारीक शेव किंवा डाळिंबाच्या दाण्यांनी सजवून लगेचच सर्व्ह करा.

टॅग्स :अन्नपितृपक्ष