आपल्या जेवणाची चव मिठाशिवाय अपूर्ण आहे. सध्या बाजारात गुलाबी मिठाची चर्चा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. त्याचे गुणधर्म देखील वेगळे आहेत. पण आहारात नेमकं कोणते मीठ खावं असा प्रश्न अनेकांना पडतो.(Pandhare mith ki saindhav) आयुर्वेदानुसार, गुलाबी मीठ हे पांढऱ्या मिठापेक्षा श्रेष्ठ मानले जाते, कारण त्यात फक्त सोडियमच नाही, तर लोह, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखी अनेक खनिजेही असतात, जी शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया पार पाडण्यास मदत करतात.(Saindhav mithache fayde)
आजकाल घरोघरी पांढऱ्या मिठाचा वापर वाढला आहे, पण त्याचसोबत हाय बीपी, थायरॉईड आणि पोटाच्या तक्रारीही वाढल्या आहेत.(Saindhav mithache fayde) अशा वेळी आयुर्वेदाने सर्वश्रेष्ठ मानलेले 'पांढरं मीठ' किंवा 'गुलाबी मीठ' पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. अनेकांना वाटते की मीठ तर मीठच आहे, त्यात काय फरक पडणार? पण हाच छोटासा बदल आपल्या आरोग्यावर चांगला- वाईट परिणाम घडवू शकतो. पाहूया आहारात कोणते मीठ खायला हवं.
७ दिवसांत घरच्या छोट्या कुंडीत वाढेल हिरवीगार कोथिंबीर, खास ट्रिक- चमचाभर धणे पेरण्याची सोपी पद्धत
1. पांढरे मीठ हे समुद्राच्या पाण्यापासून तयार केले जाते. ते शुद्ध करण्यासाठी त्यावर अनेक रासायनिक प्रक्रिया देखील केल्या जातात. हे मीठ मोकळे आणि ओलसर होऊ नये यामुळे त्यात अँटी- केकिंग एजंट मिसळले जातात. जे आरोग्यासाठी घातक असतात. तर गुलाबी मीठ हे खाणीतून मिळते. ते नैसर्गिक असते आणि त्यावर कोणतीही रासायनिक प्रक्रिया केली जात नाही.
2. रिफाइंड पांढऱ्या मिठात केवळ सोडियम आणि क्लोराईड असते. पण सैंधव मिठात लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि कॅल्शियम यांसारखी ८४ पेक्षा जास्त नैसर्गिक खनिजे असतात. ही खनिजे शरीरातील पेशींच्या वाढीसाठी आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी अत्यंत महत्त्वाची असतात.
3. पांढर्या मिठात सोडियमचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे शरीरात पाणी साचून राहते आणि रक्तदाब वाढतो. सैंधव मिठात सोडियमचे प्रमाण संतुलित असते आणि पोटॅशियम जास्त असते. त्यामुळे ते रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि हृदयावर ताण येत नाही.
4. अनेकांना जेवल्यानंतर गॅस, ॲसिडिटी किंवा पोट फुगण्याचा त्रास होतो. पांढरे मीठ पचायला जड असते. पण आयुर्वेदानुसार सैंधव मीठ पाचक आहे. ते शरीरातील पाचक रसांना उत्तेजित करते, ज्यामुळे अन्नाचे पचन नीट होते आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होतात.
5. आपण आपल्या स्वयंपाकघरात पांढऱ्या मिठाऐवजी सैंधव मीठ वापरु शकता. याची चव थोडी वेगळी लागते. पण आरोग्याच्यादृष्टीने हे अत्यंत फायदेशीर आहे. पण मीठाचे प्रमाण आहारात मर्यादित असायला हवे. गुलाबी मीठ पचायला सोपे असते आणि सूज कमी करण्यासही मदत करते, तर पांढऱ्या मिठात सोडियमचे प्रमाण जास्त असल्यामुळे सूज येते आणि स्नायूंमध्ये पाणी साचण्याचा धोकाही असतो.
