Join us
Daily Top 2Weekly Top 5

२ कप चहासाठी दूध आणि पाण्याचे प्रमाण किती? अस्सल टपरी स्टाईल फक्कड चहाची सिक्रेट ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2026 14:41 IST

How to make tapari style ginger tea at home: Authentic Marathi Masala Chai recipe: टपरीसारखा फक्कड चहा घरीच करायचा असेल तर पाहा सिक्रेट ट्रिक.

भारतात चहा हे फक्त पेय नसून त्या अनेकांच्या भावना, सुखद क्षण आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत अनेकांना चहा पिण्याची सवय असते.(Chai making tips) थकवा, डोकेदुखी, मूड फ्रेश करण्यासाठी अनेकजण चहाचे घोट घेत असतात. पण अनेकदा घरी बनवलेला चहा आणि बाहेर टपरीवर मिळणारा चहा यांच्या चवीत खूप फरक जाणवतो. टपरीवरचा चहा अधिक दाट, चविष्ट आणि कडक असतो, जो पिऊन मनाला वेगळीच तरतरी येते.(Perfect tea recipe) बरेचदा तर टपरीवर मिळणारा चहा हा कितीवेळा जरी प्यायलो तरी मन काही भरत नाही. आपण घरी कितीही प्रयत्न केला तरी तशी चव का येत नाही? याचं कारण म्हणजे दूध, पाण्याचे प्रमाण आणि चहा उकळण्याची खास पद्धत. (How to make tapari style ginger tea at home)अनेकांचा प्रश्न असतो की नेमका किती कप चहासाठी किती पाणी आणि दूध असायला हवे. टपरीवर चहा बनवताना अनेक खास गोष्टींचा वापर केला जातो. ज्यामुळे चहाचा रंग आणि स्वाद दोन्हीही परफेक्ट येतात. योग्य वेळी आले, वेलची आणि साखरेचा वापर केल्यास चहाची चव द्विगुणित होते. जर आपल्यालाही टपरीसारखा फक्कड चहा घरीच करायचा असेल तर पाहा सिक्रेट ट्रिक. (Authentic Marathi Masala Chai recipe)

अस्सल कोकणी चव! नारळाच्या दुधाचा करा झटपट खरवस, मुलांसाठी उन्हाळ्यातला गोडगोड खाऊ, सोपी रेसिपी

साहित्य 

पाणी - १ कप दूध - दीड कप चहा पावडर - २ छोटे चमचेसाखर - २ ते अडीच चमचेआले - १ इंच हिरवी वेलची - २ 

कृती 

1. सगळ्यात आधी एका भांड्यात १ कप पाणी घालून ते चांगले उकळून घ्या. पाणी उकळल्याशिवाय त्या चहा पावडर घालू नका. 

2. पाणी उकळायला लागले की त्यात ठेचलेले आले आणि वेलची घाला. यामुळे मसल्यांचा अर्क पाण्यात नीट उतरेल. आता त्यात चहा पावडर घालून १ ते २ मिनिटे मध्यम आचेवर उकळू द्या. 

3. चहाच्या पाण्याला गडद रंग आला की त्यात दीड कप दूध आणि साखर घाला. चहा उकळताना त्यात २ ते ३ मिनिटे पळीने वर-खाली फेसाळा. यामुळे चहा दाट होतो आणि त्याला वेगळीच क्रीमी चव यते. 

4. चहा २ ते ३ वेळा वरपर्यंत उकळून खाली वर करा. चहाचा रंग बदलल्यानंतर गॅस बंद करा. तयार होईल टपरीसारखा फक्कड चहा तेही घरी. 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Perfect Tapri-Style Tea: Milk-Water Ratio and Secret Trick Revealed!

Web Summary : Craving authentic tapri-style tea? The secret lies in the milk-water ratio and brewing technique. Use 1 cup water, 1.5 cups milk, and boil with ginger and cardamom for that perfect, strong flavor. Stir vigorously while brewing.
टॅग्स :अन्नपाककृती