बहुतेकांच्या घरी सकाळी नाश्तात इडली, सांबार, मेदू वडा यांसारखे साऊथ इंडियन पदार्थांची चव चाखायला मिळते.(Authentic South Indian Sambar Recipe) अनेकदा इडली, मेदूवडा परफेक्ट बनतो परंतु, सांबारची चव बिघडते.(How to Make Sambar in 10 Minutes) विकतचे आणलेले सांबार आणि घरी बनवलेल्या सांबारमध्ये फरक वाटतो. सांबार बनवताना डाळीपासून मसाल्यांपर्यंत अनेक छोट्या गोष्टींची काळजी घ्यावी लागते. सांबारशिवाय इडली आणि डोशाची चव अपूर्ण आहे. (Perfect Sambar Mix for 2 Months)
घाईच्या वेळी किंवा गडबडीत सांबार बनवले की, तो चुकते. अनेकदा इडली-डोशाचे पीठ विकतचे मिळते पण सांबार बनवताना प्रमाण चुकते.(Homemade Sambar Powder for Authentic Flavor) आपल्यापैकी अनेकांकडे इतका वेळ नसतो. म्हणूनच आता सांबार मिक्स कसं तयार करायचं ते पाहा.(Best Sambar Mix for Quick and Easy Preparation) हे पीठ २ महिने अगदी चांगलं टिकते. १० मिनिटांत बनेल साऊथ इंडियन स्टाईलचा पर्फेक्ट सांबार. सांबार प्रिमिक्स करण्याची सोपी पद्धत पाहा.
साहित्य
तुरीची डाळ - १ कप
मुगाची डाळ - १/२ कप
उडदाची डाळ - १/४ कप
मसुरची डाळ - १/४ कप
तांदूळ - २ चमचे
धणे - २ चमचे
जिरे - २ चमचे
काळी मिरी - १ चमचा
सुक्या खोबऱ्याचा किस - ३ चमचे
सुक्या लाल मिरच्या - ६
मेथी दाणे - १/४ चमचा
कडीपत्त्याची पाने
लाल मिरची पावडर - ३ ते ४ चमचे
हळद - १ चमचा
मीठ - २ चमचे
हिंग - १/२ चमचा
सांबार मसाला - ३ चमचे
कृती
1. सगळ्यात आधी सगळ्या डाळी आणि तांदूळ स्वच्छ करुन घ्या. पॅनमध्ये चांगल्या भाजून घ्या.
2. यानंतर धणे, जिरे, काळीमिरी, खोबऱ्याचा किस, लालमिरच्या, मेथी दाणे कढईत चांगले भाजून घ्या.
3. भाजलेल्या डाळीमध्ये कढईत भाजलेला मसाला घाला. त्यात लाल मिरची पावडर, हळद मीठ , हिंग आणि सांबार मसाला घालून खालीवर करा.
4. आता सर्व मिश्रण मिक्समध्ये वाटून त्याची पावडर तयार करा. ही पावडर हवा बंद डब्यात भरुन ठेवा.
5. सांबार बनवताना कांदा, टोमॅटो, राईची फोडणी देऊन त्यात हव्या त्या भाज्या घालता येतील.
6. सांबार प्रीमिक्स बनवताना वाटीमध्ये २ चमचे घेऊन त्याची पातळ पेस्ट तयार करा. भाज्या शिजल्यानंतर ते कढईत टाका.
7. उकळी आल्यानंतर वरुन कोकम-गूळ घालून सर्व्ह करा. साऊथ इंडियन स्टाईल परफेक्ट सांबार