Join us

Pateti Special : फ्राईड बनाना! चवीला मस्त आणि हटके असा हा पदार्थ, रेसिपी सोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 15:50 IST

फेस्टिव्ह सिझन म्हणजे खाण्यापिण्याची चंगळ आणि प्रत्येक सणाचा एक विशिष्ट पारंपरिक पदार्थ. पतेतीसाठी देखील पारशी बांधवांच्या घरी असाच एक ट्रॅडिशनल पदार्थ बनवला जातो 'फ्राईड बनाना'.

ठळक मुद्देकरायला अतिशय सोपा असणारा हा पदार्थ साईड डीश म्हणून चवीने खाल्ला जातो.

फ्राईड बनाना हा एक अतिशय चटपटीत आणि मस्त पदार्थ. शिवाय करायला तर अतिशय सोपा. कोणत्याही डिशसोबत तोंडी लावायला फ्राईड बनाना घेतला जातो. त्यामुळे पतेतीच्या दिवशी स्वयंपाक  कोणताही करा, तोंडी लावायला फ्राईड बनाना असले म्हणजे जेवणाची रंगत अधिक वाढते, असे पारशी कुटूंबात समजले जाते. तरेला केरा या नावानेही फ्राईड बनाना ओळखले जाते. पतेती स्पेशल असणारा हा एक चवदार पदार्थ आपण एरवीही अगदी आवर्जून बनवू शकतो. विदेशात देखील हा पदार्थ अतिशय फेमस असून लहान मुलांना तर तो अतिशय आवडणारा आहे. 

 

फ्राईड बनाना बनविण्यासाठी लागणारे साहित्यपिकलेली केळी आणि तूप 

कसे करायचे फ्राईड बनाना?- फ्राईड बनाना बनविण्यासाठी अवघे दोन पदार्थ लागतात. यावरूनच फ्राईड बनाना बनविणे किती सोपे आहे, हे लक्षात येते. पदार्थ बनविण्यास सोपा असला तरी तो नजाकतीने करावा लागतो एवढे मात्र नक्की. - सगळ्यात आधी तर तुम्हाला हवी तेवढी दोन- तीन पिकलेली केळी घ्या. या केळयांचे उभे किंवा गोलाकार असे आपल्या आवडीनुसार काप करून घ्यावेत. 

- केळीचे काप खूप मोठे पण नको आणि खूपच लहान पण नकोत. मध्यम आकाराचे काप असल्यास पदार्थ चांगला हाेतो.- केळीचे काप केल्यानंतर एका कढईत तूप टाकून गरम करावे. - तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये केळीचे काप टाकावे आणि डीप फ्राय करून घ्यावे. एका वेळेला दोन ते तीन फोडी टाकाव्या. तळताना फोडी एकमेकांना चिकटणार नाहीत याची काळजी घ्यावी.

- जेव्हा केळीच्या फोडींचा रंग बदलून लालसर होऊ लागतो, तेव्हा ते कढईतून काढून घ्यावेत आणि त्यातले तूप निथळण्यासाठी नॅपकीनवर ठेवावेत.- करायला अतिशय सोपा असणारा हा पदार्थ साईड डीश म्हणून चवीने खाल्ला जातो.

 

टॅग्स :अन्नपाककृती