बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्र तिच्या फिटनेस आणि अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते. नुकताच परिणीतीने एका मुलाखतीत खुलासा केला की, प्रेग्नन्सीच्या काळात तिला विशिष्ट पदार्थाचे डोहाळे लागले होते, आणि तो पदार्थ म्हणजे चमचमीत गाजर आणि मुळ्याचे लोणचे! मसालेदार, आंबट आणि चटपटीत लोणचे खाण्याची तीव्र इच्छा होणे हे गरोदरपणात सामान्य असले तरी, परिणीतीला आवडलेले हे लोणचे आरोग्याच्या दृष्टीनेही खूप फायदेशीर आहे(Pareeniti Chopra Like Carrot & Raddish Pickle During Pregnancy).
तिखट, खमंग आणि कुरकुरीत असा हा पारंपरिक लोणच्याचा स्वाद तिचा फेव्हरेट असल्याचे ती सांगते. हिवाळ्यात मिळणाऱ्या ताज्या मुळा आणि गाजरापासून बनवलेले हे लोणचं फक्त चविष्टच नाही तर पोटासाठीही हलके आणि आरोग्यदायी मानले जाते. हिवाळ्यात मिळणाऱ्या ताज्या, रसरशीत गाजर - मुळ्याचे लोणचे म्हणजे चवीला अप्रतिमच... जर आपल्याला देखील (pareeniti chopra pregnancy craving pickle) नेहमीचे तेच ते कैरीचे, लिंबाचे, आवळ्याचे लोणचे खाऊन कंटाळा आला असेल तर यंदाच्या हिवाळ्यात या लोणच्याचा बेत नक्की करून पाहा...परिणीती चोप्राला आवडणाऱ्या या गाजर - मुळ्याच्या चटपटीत इन्स्टंट लोणच्याची रेसिपी पाहूयात...
साहित्य :-
१. मोहरी - १ टेबलस्पून २. धणे - १ टेबलस्पून ३. जिरे - १ टेबलस्पून ४. मेथीदाणे - १/२ टेबलस्पून ५. काळीमिरी - १ टेबलस्पून६. बडीशेप - १ टेबलस्पून७. तेल - २ ते ४ टेबलस्पून ८. लसूण पाकळ्या - १० ते १५ पाकळ्या९. हिरव्या मिरच्या - १० ते १२१०. हळद - १ टेबलस्पून ११. लाल तिखट मसाला - १ टेबलस्पून १२. मीठ - चवीनुसार १३. हिंग - १/२ टेबलस्पून १४. आमचूर पावडर - १ टेबलस्पून
हिवाळ्यातील ताज्या-रसरशीत आवळ्याचा करा मुखवास! एकदा करा वर्षभर खा - पाचक, चटपटीत मुखवास रेसिपी...
ढाब्याहून भारी कुलचा करा घरी, तंदूर नको की भट्टी नको! पाहा १ ट्रिक-तव्यावर करा मस्त कुलचा...
कृती :-
१. गाजर आणि मुळा स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घ्यावीत. त्यानंतर गाजर व मुळा त्यांचे लांब बारीक तुकडे करून घ्यावेत. २. मग दुसरीकडे एका पॅनमध्ये, मोहरी, धणे, जिरे ,मेथीदाणे, काळीमिरी, बडीशेप असे सगळे जिन्नस एकत्रित घेऊन ते मध्यम आचेवर कोरडे भाजून घ्यावेत. मग हे मिश्रण भाजून झाल्यावर एका डिशमध्ये काढून हलकेच थंड होण्यासाठी ठेवावं. ३. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून त्याची जाडसर भरड पावडर तयार करून घ्यावी. ४. एका कढईमध्ये तेल घेऊन त्यात लसूण पाकळ्या, हिरव्या मिरच्या घालून त्या २ ते ३ मिनिटे खमंग, तेलात परतून घ्याव्यात.
५. मग या मिश्रणात हळद, लाल तिखट मसाला, हिंग घालावे. त्यानंतर या मिश्रणात चिरून घेतलेलं गाजर आणि मुळ्याचे छोटे तुकडे घालावेत. ६. सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. ७. मग यात मिक्सरमध्ये वाटून घेतलेला लोणचं मसाला, चवीनुसार मीठ, आमचूर पावडर घालावी सगळे मिश्रण चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावे. मध्यम आचेवर २ ते ४ मिनिटे परतवून घ्यावे. ८. मग गॅस बंद करावा. एका वेगळ्या भांड्यात थोडं तेल घेऊन ते गरम करावे, गरम तेल तयार लोणच्यात ओतून कालवून घ्यावे.
ताज्या रसरशीत गाजर, मुळ्याचे चविष्ट, चटपटीत, मसालेदार लोणचं खाण्यासाठी तयार आहे. हे तयार लोणचं एका हवाबंद बरणीत भरून स्टोअर करून ठेवावं.
Web Summary : Parineeti Chopra craved carrot and radish pickle during pregnancy. This winter, try this healthy pickle! The article includes a recipe with ingredients like mustard seeds, coriander, cumin, fenugreek, black peppercorns, fennel, oil, garlic, green chilies, turmeric, red chili powder, salt, asafoetida, and amchur powder.
Web Summary : परिणीति चोपड़ा को गर्भावस्था के दौरान गाजर और मूली का अचार खाने की तीव्र इच्छा हुई। इस सर्दी में, इस स्वस्थ अचार को आजमाएं! लेख में सरसों के बीज, धनिया, जीरा, मेथी, काली मिर्च, सौंफ, तेल, लहसुन, हरी मिर्च, हल्दी, लाल मिर्च पाउडर, नमक, हींग और अमचूर पाउडर जैसी सामग्री के साथ एक रेसिपी शामिल है।