Lokmat Sakhi >Food > पावसाळ्यात पापड सादळतात- चिवडा वातड होतो? ३ टिप्स - सादळण्याची चिंताच सोडा कायमची

पावसाळ्यात पापड सादळतात- चिवडा वातड होतो? ३ टिप्स - सादळण्याची चिंताच सोडा कायमची

Monsoon food storage tips: Keep papads crispy in monsoon: How to prevent soggy snacks: आपणही केलेले पापड-चिवडा वातड होत असतील तर या टिप्स लक्षात ठेवा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2025 19:05 IST2025-07-09T19:00:00+5:302025-07-09T19:05:01+5:30

Monsoon food storage tips: Keep papads crispy in monsoon: How to prevent soggy snacks: आपणही केलेले पापड-चिवडा वातड होत असतील तर या टिप्स लक्षात ठेवा.

Papads go soggy during the monsoon Chivda loses its crunch 3 simple food storage tips | पावसाळ्यात पापड सादळतात- चिवडा वातड होतो? ३ टिप्स - सादळण्याची चिंताच सोडा कायमची

पावसाळ्यात पापड सादळतात- चिवडा वातड होतो? ३ टिप्स - सादळण्याची चिंताच सोडा कायमची

पावसाळ्यात दमट हवा, आर्द्रता आणि सतत पावसामुळे घरातल्या सुकवलेल्या, कुरकुरीत खाद्यपदार्थांची तारांबळ उडते.(Monsoon kitchen hacks) विशेषतः पापड, कुरडया, चिवडा, भेळ, फरसाण असे पदार्थ हवेतल्या ओलाव्यामुळे सादळतात.त्यांची कुरकुरीतता निघून जाते आणि चवही बिघडते.(Monsoon food storage tips)
उन्हाळ्यात आपण साठवणीचे पदार्थ तयार करतो.(Keep papads crispy in monsoon) यामध्ये तांदळाचे, ज्वारीचे, उडदाचे पापड हमखास केले जातात.(How to prevent soggy snacks) मुलांना आवडणारा चिवडा देखील बनवला जातो.(Chivda stays crunchy tips) परंतु वर्षभर साठवले जाणारे हे पदार्थ पावासातील आर्द्रतेमुळे लगेच खराब होतात. त्यांच्यातील कुरकुरीतपणा नाहीसा होतो. (Food stays fresh in rainy season)

monsoon food : पावसाळ्यात करा गरमागरम कुरकुरीत मिरची भजी, संध्याकाळच्या चहासोबतचा मस्त बेत- पाहा रेसिपी

वातावरणातील दमटपणामुळे पापड सादळतात, चिवडा वातड होतो. पापड तळताना तो कडक होत नाही, ज्यामुळे चावताना अधिक त्रास होतो. अशावेळी पापड-चिवडा फेकण्याऐवजी आपल्याकडे आणखी पर्याय नसतो. पदार्थ वाया जाऊ नयेत. त्यांचा कुरकुरीतपणा पावसाळ्यातही राहवा यासाठी काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. आपणही केलेले पापड-चिवडा वातड होत असतील तर या टिप्स लक्षात ठेवा. 

1. पापड कुरकुरीत राहावे यासाठी आपण ते एअर टाईट डब्यात किंवा स्टीलच्या डब्यात ठेवायला हवे. पापड डब्यात ठेवण्याआधी ते एका पिशवीत लॉक करुन मगच ठेवा. त्यानंतर पिशवीमध्येच पापडांवर तांदूळ परसरवून ठेवा. हवाबंद डब्यामध्ये मग पापड ठेवा. यामुळे पापडांमध्ये दमटपणा येणार नाही आणि पापड कुरकुरीत राहतील. 

2. पोह्याचा किंवा मुरमुऱ्याचा चिवडा लवकर खराब किंवा वातड होऊ नये यासाठी प्लास्टिकच्या पिशवीत भरुन ठेवा. ही पिशवी नंतर स्टीलच्या किंवा हवाबंद डब्यात ठेवा. चिवडा ठेवण्यापूर्वी डब्यात त्या पिशवीच्या आजूबाजूला तांदूळ ठेवा. 

3. चिवडा घेताना आपण चमच्याचा वापर करतो. परंतु तो ओलसर असेल तर चिवडा सादळू लागतो किंवा नरम होतो. त्यामुळे चिवड्याच्या डब्यात वेगळा चमचा ठेवा. तसेच डबा हवेत ठेवू नका, ज्यामुळे तो नरम पडेल. 
 

Web Title: Papads go soggy during the monsoon Chivda loses its crunch 3 simple food storage tips

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.