Join us  

पोळ्या कडक होतात, कणिक मळताना गणित बिघडतं? शेफ पंकज भदौरिया सांगतात १ ट्रिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2024 5:34 PM

Pankaj Ke Nuskhe I How to make Softer Rotis : पोळी पचत नाही? कणिक भिजवताना त्यात १ पदार्थ घालायला विसरू नका

रोजच्या आहारात आपण चपाती आवर्जून खातो (Roti Making). चपात्या नसतील तर, आपली भूक अर्धीच राहते. पोळ्या खाल्ल्याने पोट तर भरते, शिवाय याचे फायदे आरोग्याला होतात (Cooking Tips). पण चपात्या प्रत्येकवेळी परफेक्ट बनतील असे नाही. पोळ्या कधी कडक तर कधी अधिक जाड होतात. पोळ्या करण्याचं गणित कणकेवर असतं. कणिक योग्य पद्धतीने भिजवली गेली तरच, पोळ्या मऊ होतात.

अन्यथा रात्रीपर्यंत कडक आणि चिवट होतात. त्यामुळे चपातीसाठी पीठ नक्की कसे मळायचे? असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल? जर चपात्या अधिक वेळ मऊ राहाव्या असं वाटत असेल तर, शेफ पंकज भदौरिया यांनी शेअर केलेल्या काही टिप्स फॉलो करा. चपाती परफेक्ट बनतील(Pankaj Ke Nuskhe I How to make Softer Rotis).

पोळ्या तयार करताना लक्षात ठेवा खास टिप्स

- पोळ्या करण्यासाठी कणिक नीट भिजवणं गरजेचं. कणिक मळताना आपण शक्यतो थंड पाण्याचा वापर करतो. पण थंड पाण्याचा वापर न करता, आपण कोमट पाण्याचा वापर करू शकता.

ना लाटणे- ना तेलाचा एक थेंब, तिप्पट फुलणारे मैद्याचे पापड करण्याची सोपी कृती; टिकतील महिनाभर

- कोमट पाण्याने कणिक मळून झाल्यानंतर, आपण दुधाचा देखील वापर करू शकता. दुधामुळे कणिक छान मळून तयार होईल.

- कणिक मळून झाल्यानंतर त्यात एक चमचा तेल घाला. तेलामुळे कणिक कडक होणार नाही.

- कणिक मळून झाल्यानंतर कणकेला झाकून ठेवा. २० मिनिटानंतर त्याच्या चपात्या तयार करा. जेणेकरून पोळ्या छान मऊ होतील.

न वाफवता करा क्रिस्पी अळूवडी, गुजराथी पद्धतीच्या आंबट-गोड अळूवडीची खास पारंपरिक रेसिप

- चपात्या मध्यम आचेवर शेकून घ्या. यामुळे चपात्या छान फुलतील.

- जर पोळ्या खाल्ल्यानंतर आपल्याला पचत नसेल तर, आपण त्यात ओवा घालू शकता. ओव्यातील पौष्टीक घटकामुळे पोटाचे विकार दूर राहतील, शिवाय पोळ्या पचतील.

टॅग्स :अन्नकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.किचन टिप्स