नृसिंह जयंती देशांतील विविध भागात साजरी केली जाते. या खास दिवशी नैवेद्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तयार केले गेले तरी देखील, पारंपरिक 'पनकम' प्रसादाशिवाय (Panakam Recipe) नैवेद्य पूर्ण होऊच शकत नाही. उन्हाळ्याच्या (Narasimha Chaturdashi Special Panakam Dink) दिवसांत गूळ, पाणी, वेलची आणि थोडा मिरी पूड यांचे मिश्रण असलेले हे पेय शरीराला थंडावा देणारे असून, उन्हाळ्यात असे पेय पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते(Narasimha Jayanti Special 'Panakam', drink).
वेगवेगळ्या प्रकारच्या नैवेद्यांमधील पदार्थांमध्ये पनकामला विशेष महत्व आहे. नृसिंह जयंती उन्हाळा ऋतूंत येत असल्याने, अशावेळी 'पनकम' प्यायल्याने हे पेय शरीराला थंडावा देणारे, पचनास हलके आणि शरीरातील ऊर्जा टिकवून ठेवण्यास मदत करते. असे हे बहुगुणी 'पनकम' पेय प्रसाद म्हणून आणि उन्हाळ्यात शरीराला पोषक आणि थंडावा देणारे म्हणून देखील आपण पिऊ शकतो. गूळ शरीरात ऊर्जा तयार करण्यास मदत करते, मिरी आणि सुंठ पचन सुधारतात, तर वेलचीच्या सुगंधाने ताजेपणा येतो त्यामुळेच ‘पनकम’ हे एक आरोग्यवर्धक पेय आहे. उन्हाळ्यात थंड पेय म्हणून नियमित ‘पनकम’ प्यायल्यास उष्णतेपासून होणाऱ्या त्रासांपासूनही बचाव करता येतो. असे हे बहुगुणी 'पनकम' कसे करायचे याची रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. पाणी - २ ते ३ कप
२. गूळ - १/२ कप
३. मीठ - चवीनुसार
४. काळीमिरी पूड - १/२ टेबलस्पून
५. सुंठ पावडर - १/२ टेबलस्पून
६. लिंबाचा रस - २ टेबलस्पून
५. तुळशीचे पानं - २ ते ३ पानं
उन्हाळ्यात उकाड्याने दुपारचे जेवण नकोसे वाटते? खा 'हे' ७ पदार्थ, हलकेफुलके पण पौष्टिक पदार्थ...
कृती :-
१. सगळ्यात आधी एका मोठ्या टोपात पाणी घेऊन त्यात गूळ किसून घालावा.
२. आता चमच्याच्या मदतीने पाणी आणि गुळाचे मिश्रण हलवून गूळ पाण्यांत संपूर्णपणे विरघळवून घ्यावा.
३. गूळ पाण्यांत संपूर्णपणे विरघळल्यानंतर यात चवीनुसार मीठ घालावे. आपण सैंधव मीठ देखील घालू शकता.
फक्त आमरसच नाही तर करा आंबापोळी! ताज्या - पिवळ्याधमक आंब्यांची आंबापोळी - उन्हाळ्यातील गोड आठवण...
फक्त १० मिनिटांत करा कुकरमध्ये कैरीचे लोणचे, पाहा लोणच्याची फक्कड रेसिपी...
४. याच पाण्यांत काळीमिरी पूड, सुंठ पावडर, लिंबाचा रस घालून सगळे जिन्नस चमच्याने व्यवस्थित हलवून पाण्यांत मिसळून घ्यावे.
५. तयार पनकम ग्लासात ओतून वर तुळशीचे पानं ठेवून पिण्यासाठी सर्व्ह करावे.
भगवान विष्णूंच्या नैवेद्यासाठी केले जाणारे बहुगुणी 'पनकम' पेय पिण्यासाठी तयार आहे.