'चहा' म्हणजे भारतीयांसाठी फक्त एक पेय नाही, तर एक भावना आहे. अगदी सकाळच्या वाफाळत्या चहाच्या पहिल्या घोटापासून ते दिवसाच्या कामातील थकवा घालवण्यापर्यंत चहाची भूमिका खूप मोठी असते. चहाचे एक नाही तर अनेक प्रकार आपल्याला पहायला मिळतात. चहा हा जरी एक पदार्थ असला तयारी (Pahaadi Masala Chai Recipe) तो तयार करण्याची रेसिपी मात्र प्रत्येकाची अशी वेगळी असते. काहीजण चहा तयार करताना तो हेल्दी किंवा अधिक चविष्ट व्हावा, यासाठी त्यात अनेक प्रकारचे पदार्थ घालतात(How To Make Pahaadi Masala Chai At Home).
चहा तयार करताना त्यात आलं, साखर, चहा पावडर, दूध असे आपले नेहमीचे पदार्थ तर घालतोच. यसोबतच चहाला चव येण्यासाठी त्यात चहा मसाला देखील घालतो. असाच एक चहाचा वेगळा प्रकार म्हणजे, पहाडी मसाला चहा. हिमालयाच्या थंड, स्वच्छ हवेत आणि सुपीक मातीमध्ये उगवणाऱ्या वनस्पतींपासून तयार होणारा हा चहा केवळ चवीनेच नाही तर आरोग्यदायी गुणांनीही समृद्ध असतो. पहाडी चहामध्ये पुदिना, तुळस, दालचिनी, आल्याचे तुकडे आणि इतरही औषधी वनस्पतींचा समावेश असतो, जे शरीराला उर्जा देतात, रोगप्रतिकारशक्ती वाढवतात आणि थकवा घालवतात. पहाडी चहा हा केवळ शरीराला ऊब देणारा नसून, अनेक औषधी वनस्पती, मसाले अशा घटकांमुळे तो एक शक्तिशाली आरोग्य बूस्टर म्हणूनही ओळखला जातो. हिमालयाच्या कुशीत मिळणारा हा 'पहाडी मसाला चहा' घरच्याघरी करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. पुदिना - १/२ कप २. तुळशीची पाने - १/२ कप ३. आलं - २ ते ३ तुकडे ४. काळीमिरी - १ टेबलस्पून ५. दालचिनी - १ छोटा तुकडा६. लवंग - ४ ते ५ काड्या ७. चहा पावडर - गरजेनुसार ८. पाणी - २ ते ३ कप ९. दूध - गरजेनुसार१०. साखर - चवीनुसार
कृती :-
१. सगळ्यात आधी खलबत्त्यात पुदिना, तुळशीची पाने, आलं, काळीमिरी, दालचिनी, लवंग असे सगळे जिन्नस एकत्रित घेऊन ते कुटून त्याची जाडसर भरड होईल अशी पेस्ट तयार करुन घ्यावी. २. एका भांड्यात पाणी घेऊन ते व्यवस्थित उकळवून गरम करुन घ्यावे. ३. पाणी उकळल्यावर त्यात खलबत्त्यातील कुटून तयार केलेला मसाला घालावा आणि एक हलकी उकळी येऊ दयावी.
मस्त गरमागरम, वाफाळता पहाडी चहा पिण्यासाठी तयार आहे. हा गरमागरम चहा मस्त फुरके मारत आनंदाने प्या.
पहाडी मसाला चहा पिण्याचे कायदे...
१. आले आणि मिरी घशातील सूज कमी करून श्वसनास मदत करतात.२. दालचिनी आणि वेलची पचनसंस्थेचे कार्य सुरळीत ठेवतात.३. गरम मसाल्यांचा सुगंध आणि चव फ्रेश व ताजेतवाने करतात.४. चहातील गरम मसाले रक्तप्रवाह वाढवून शरीराला उर्जा देतात.
Web Summary : Pahadi Masala Chai, from the Himalayas, boosts immunity and energy. It includes mint, basil, cinnamon, and ginger. This tea warms the body and acts as a health booster with medicinal herbs and spices. A simple recipe to make it at home is provided.
Web Summary : हिमालय से पहाड़ी मसाला चाय प्रतिरक्षा और ऊर्जा को बढ़ाती है। इसमें पुदीना, तुलसी, दालचीनी और अदरक शामिल हैं। यह चाय शरीर को गर्म करती है और औषधीय जड़ी-बूटियों और मसालों के साथ स्वास्थ्य बूस्टर के रूप में कार्य करती है। इसे घर पर बनाने के लिए एक सरल नुस्खा दिया गया है।