आज डब्यात काय असं आपल्याला रोजच विचारलं जातं.(Office lunch okra recipe) डब्यात भेंडी असेल तर काहीचे नाक खाण्याआधीच मुरडले जाते. भेंडी ही मुळातच चिकट भाजी असते.(Stuffed okra tiffin recipe) परंतु, यात कितीही तेल, मीठ किंवा मिरच्या घातल्या तरी देखील ती चिकट किंवा गिळगिळी बनते ज्यामुळे ती खाण्याची इच्छा होत नाही.(Tiffin box bharli bhendi) ऑफिसच्या डब्याला रोज काय बनवाव असा प्रश्न प्रत्येकाला पडतो. अशावेळी आपण भरली भे़ंडी ट्राय करु शकतो. (Easy bharli bhendi for office lunch)
भरली भेंडी बनवताना आपण काही चुका टाळल्या तर ती चिकट होणार नाही.(How to make stuffed okra non sticky) इतकेच नाही तर चपातीसोबत खाण्याऐवजी आपण तिला स्टार्टर म्हणून देखील खाऊ शकतो.(Step-by-step bharli bhendi recipe for tiffin) भरली भेंडी कशी बनवायची? त्यात कोणता मसाला घालायचा पाहूया सोपी रेसिपी.
शेंगदाण्याचे दूध करून 'असं' लावा विरजण, वजन राहिल नियंत्रणात, पोटाला मिळेल थंडावा, पाहा रेसिपी
साहित्य
भेंडी- २०० ग्रॅम
भाजलेले शेंगदाणे- १/२ कप
भाजलेले सुके खोबरे- १/४ कप
लसूण पाकळ्या- ७ ते ८
भाजलेले पांढरे तीळ- २ टेबलस्पून
भाजलेले जिरे पूड -१ टीस्पून
बेडगी मिरची पावडर- १ टीस्पून
धने पूड- १ टीस्पून
लिंबाचा रस - २ चमचे
गरम मसाला पावडर- १/२ टीस्पून
हळद- १/४ टीस्पून
मीठ - चवीनुसार
तेल -१ चमचा
फोडणीसाठी
तेल- २ चमचे
मोहरी- १/२ टीस्पून
हिंग- १/४ टीस्पून
मीठ- चवीनुसार
कढीपत्ता
मॅगी मसाला ए मॅजिक- १ पॅकेट
कृती
1. सगळ्यात आधी भेंडी धुवून ती नीट पुसून घ्या, कोरडी झाल्यानंतर त्याचे उभे काप करा.
2. मसाला बनवण्यासाी शेंगदाणे भाजून घ्या. त्यात पांढरे तीळ आणि खोबरे देखील मंद आचेवर भाजा. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घाला.
3. त्यात आले लसूण घालून बारीक वाटून घ्या. एका प्लेटमध्ये वाटलेले वाटण, हळद, लाल तिखट, धने पावडर, जिरेपूड, गरम मसाला, लिंबाचा रस, मीठ आणि चिरलेली कोथिंबीर घाला आणि स्टफिंग तयार करा.
4. तयार मसाला चिरलेल्या भेंडीच्या तुकड्यांमध्ये भरा.
5. कढईत तेल गरम करुन त्यात मोहरी, जिरे, हिंग आणि कढीपत्ता घाला. कढईत भरलेली भेंडी घाला. मंद आचेवर एका बाजूने भाजू द्या.
6. 2-3 मिनिटांनंतर, भेंडी हलक्या हाताने पलटी करा आणि सर्व बाजूंनी शिजवा.
7. भेंडीवर थोडेसे पाणी शिंपडा आणि झाकणाने झाकून सुमारे 2 मिनिटे वाफ येऊ द्या. नंतर झाकण उघडून एकदा परतवून घ्या.
8. यामध्ये आता वरुन मॅगी मसाल्याचे पॅकेट घाला, चांगले परतवून घ्या आणि २ मिनिटे झाकून ठेवा.
9. वरुन कोथिंबीर घालून गॅस बंद करा. तयार होईल ऑफिसचा चमचमीत डबा