Join us

सॅलेडसाठी चमचमीत मस्त आणि पौष्टिक ड्रेसिंग हवंय? घ्या ३ कृती, खाऊन पोट भरेल मन नाही..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2025 20:11 IST

nutritious dressings for your salad. Try these 3 recipes : सॅलेड होईल अगदी चविष्ट. हेल्दि आणि टेस्टी.

आपल्याला वाटतं कोशिंबीर आणि सॅलेड दोन्ही एकच आहे. मराठीत कोशिंबीर आणि इंग्रजीत सॅलेड. फक्त नावंच तर वेगळी आहेत. पण तसं नाही आहे. दोन्ही पदार्थांमध्ये बऱ्यापैकी साम्य असलं तरी दोन्ही वेगवेगळे पदार्थ आहेत.(nutritious dressings for your salad. Try these 3 recipes) जशा आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कोशिंबीर तयार करतो. त्याच प्रकारे सॅलेडचेही अनेक प्रकार आहेत. सध्या तरुण पिढी भरपूर प्रमाणात सॅलेड खाते. ते स्वास्थ्यासाठी चांगलं असतं हे एक कारण झालं. पण आजकाल नवनव्या सॅलेड रेसीपी आल्या आहेत. ज्यामुळे ते चवीला खूपच रूचकर लागतं. सॅलेड तर सारखंच असतं पण त्यावर ड्रेसिंग वेगवेगळं असतं. (nutritious dressings for your salad. Try these 3 recipes)सॅलेड ड्रेसिंग म्हणजे सॅलेडवर घालायची चटणी किंवा  सॉस असं आपण म्हणू शकतो.

तीन फार चविष्ट सॅलेड ड्रेसिंगच्या रेसीपी आहेत. त्या नक्कीच करून बघा.

सॅलेड तुमच्या आवडीनुसार तयार करा.. काकडी, कांदा, कोबी, सिमला मिरची, पनीर, मशरूम, टोमॅटो, ब्रोकोली, आदी. तुम्हाला जे वापरावेसे वाटेल ते वापरा.(nutritious dressings for your salad. Try these 3 recipes)

१. पनीर ड्रेसिंग  एका मिक्सरच्या भांड्यात लो फॅट पनीर घ्या. त्यात थोडी कोथिंबीर घाला. लसूण तुमच्या आवडीनुसार घाला. थोडंसं जीरं घाला. आता त्यात पुदीन्याची ताजी पाने घाला. थोडंसं पाणी घालून वाटून घ्या. तुमच्या आवडत्या सॅलेडवर घाला. चवीला मस्तच लागतं आणि पौष्टिकही आहे.

२. काबुली चण्याचे ड्रेसिंग  काबुली चणे शिजवून घ्या. गार झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात काबुली चणे, लसूण, जीरं, मिरची सगळं घ्या. आणि थोडंसं पाणीही घ्या. आता सगळं वाटून घ्या. चविला फारच छान लागतं. काबुली चणे अशा पद्धतीने तुम्ही नक्कीच कधी खाल्ले नसतील.

३. दही ड्रेसिंग  हा प्रकार जवळपास आपल्या दह्यातल्या कोशिंबिरीसारखाच आहे.  गोड दही, थोडंसं मध, पनीर, लाल मिरची, कोथिंबीर असं सगळं एकत्र वाटून घ्या. सॅलेडवर घाला आणि खा.

कोणतंही सॅलेड अतिपातळ होणार नाही याची काळजी घ्या. सॅलेडमध्ये शिजवलेली कडधान्ये सुद्धा वापरू शकता. सोयाबीन, मखाना सारखे पदार्थ वापरून सॅलेड अजून लो फॅट होऊ शकतं.

टॅग्स :अन्नआहार योजना