Lokmat Sakhi >Food > ना गुळ-साखर, ना गॅसचा वापर; कपभर सुक्या खोबऱ्याचे करा पौष्टीक लाडू - तब्येत सुधारेल..

ना गुळ-साखर, ना गॅसचा वापर; कपभर सुक्या खोबऱ्याचे करा पौष्टीक लाडू - तब्येत सुधारेल..

No Sugar No Jaggery Healthy Dry Fruits Coconut Laddu Recipe : रक्ताची कमतरता ते वेट लॉस! सुक्या खोबऱ्याचे लाडू खाण्याचे फायदे तर पाहा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2024 19:15 IST2024-05-12T19:06:55+5:302024-05-12T19:15:44+5:30

No Sugar No Jaggery Healthy Dry Fruits Coconut Laddu Recipe : रक्ताची कमतरता ते वेट लॉस! सुक्या खोबऱ्याचे लाडू खाण्याचे फायदे तर पाहा..

No Sugar No Jaggery Healthy Dry Fruits Coconut Laddu Recipe | ना गुळ-साखर, ना गॅसचा वापर; कपभर सुक्या खोबऱ्याचे करा पौष्टीक लाडू - तब्येत सुधारेल..

ना गुळ-साखर, ना गॅसचा वापर; कपभर सुक्या खोबऱ्याचे करा पौष्टीक लाडू - तब्येत सुधारेल..

ओलं नारळ खाण्यास सगळ्यांनाच आवडतं. पण सुकं खोबरं (Dry Coconut) खायला मात्र जिवावर येतं. ओलं नारळ खाण्याचे जसे फायदे आहेत तसेच सुकं खोबरं खाण्याचे फायदे आहेत. सुकं खोबरं हे प्रामुख्यानं हदय, मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. सुक्या खोबर्‍यात प्रथिनं, जीवनसत्त्वं, लोह, कॅल्शिअम, मॅग्नीज, सेलिनियम हे घटक मोठ्या प्रमाणात असतात (Food). थोडं सुकं खोबरं रोज चावून खाण्याची सवय लावली तर, आपली रोगप्रतिकाराशक्ती मजबूत होऊ शकते (Health).

सुकं खोबरं रोज खाल्ल्यानं संसर्गजन्य आजार दूर राहातात. त्वचेचा पोतही चांगला होतो. जर आपल्या सुकं खोबऱ्याचा तुकडा खायला आवडत नसेल तर, आपण सुकं खोबऱ्याचा लाडू करून खाऊ शकता. सुकं खोबऱ्याचे लाडू आपण कोणत्याही ऋतूत खाऊ शकता. हे लाडू बनवायला सोपे आणि आरोग्यासाठी हेल्दी असतात(No Sugar No Jaggery Healthy Dry Fruits Coconut Laddu Recipe).

सुकं खोबऱ्याचे लाडू करण्यासाठी लागणारं साहित्य

सुकं खोबरं

अक्रोड

रोज फोडणीचा भात कशाला? भात उरला तर करा भाताचा ढोकळा झटपट; नाश्ता स्पेशल खास रेसिपी

काजू

बदाम

मनुके

कृती

सर्वप्रथम, २ सुकं खोबऱ्याचे तुकडे करा. मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घ्या. जर आपल्याला सुकं खोबऱ्याचा किस करायचा नसेल तर, आपण मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेऊ शकता. वाटलेलं सुकं खोबरं एका बाऊलमध्ये काढून घ्या. त्यात एक कप अक्रोड, काजू, बदाम, अर्धा कप मनुके घालून वाटून घ्या. बारीक केलेले ड्रायफ्रुट्स बाऊलमध्ये काढून घ्या.

आता एका मोठा बाऊल घ्या. त्यात वाटलेलं सुकं खोबरं, बारीक केलेले ड्रायफ्रुट्स, एक चमचा वेलची पावडर घालून मिक्स करा. तयार थोडं मिश्रण हातवार घ्या, व लाडू वळवून घ्या. अशा प्रकारे सुक्या खोबऱ्याचे लाडू खाण्यासाठी रेडी. आपण हे लाडू हवाबंद डब्यात साठवून ठेऊ शकता.

सुकं खोबरं खाण्याचे फायदे

वेट लॉस बेस्ट

शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी सुकं खोबरं मदत करू शकते. यामध्ये असलेले फायबर शरीरातील अतिरिक्त चरबी बर्न करते. शिवाय पचनक्रियाही सुधारण्यास मदत करते.

लोहाची कमतरता दूर करते

गुलाबी साडी आणि लालीलाल..अवघ्या ५०० रुपयात आईसाठी घ्या ट्रेण्डी सुंदर गुलाबी साडी!

भारतातल्या महिलांमधे लोहाची कमतरता मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे महिलांनी सुकं खोबरं खायलाच हवे. सुक्या खोबर्‍यात लोहाचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळे दिवसभरात मधून मधून थोडं सुकं खोबरं चावून खाल्ल्यानं रक्तातील हिमोग्लोबिन वाढायला मदत होते. आपण गुळ खोबरं देखील खाऊ शकता.

पोट करते साफ

ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, त्यांनी रोज एक सुक्या खोबऱ्याचा लाडू खावा.  नारळात असलेले उच्च फायबर बद्धकोष्ठता लवकर दूर करते. ज्यामुळे खाल्लेलं व्यवस्थित पचते.

Web Title: No Sugar No Jaggery Healthy Dry Fruits Coconut Laddu Recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.