काहीही गोड खायचं म्हटलं की सगळ्यांत आधी डोळ्यांसमोर चॉकलेटचं येत. घरातील लहान - थोरांना चॉकलेट खूपच आवडतं. काहीवेळा जेवणानंतर काहीतरी गोडधोड खाण्याची इच्छा (no sugar added chocolate fudge) अनेकदा होतेच. अशावेळी मस्त, गोड चवीचं, क्रिमी, चॉकलेटी असं काहीतरी खावंसं वाटत. गोड खायचं म्हटलं तर चॉकलेट (high protein chocolate fudge) तर आपण वरचेवर खातोच पण याच चॉकलेटचे वेगवेगळे पदार्थ खायला मिळाले तर मग विचारुच नका... असाच एक खास लोणावळ्याच्या सुप्रसिद्ध पदार्थ म्हणजे चॉकलेट फज(NO SUGAR ADDED HIGH PROTEIN CHOCOLATE FUDGE).
आपल्यापैकी बऱ्याचजणांनी हे चॉकलेट फज खाल्लं देखील असेल, पण ते घरच्याघरी देखील तयार करता येऊ शकते. बाजारात मिळणाऱ्या फजमध्ये साखरेचं प्रमाण खूप जास्त असतं, जे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. गोडधोड खाण्याच्या क्रेविंग्स पूर्ण करताना आरोग्याचीही तितकीच काळजी घेणं देखील आवश्यक असतं. यासाठीच, साखरेशिवाय (healthy chocolate fudge recipe) देखील तयार होणारा, पण चविष्ट आणि लोणावळा स्पेशल चवीचा होममेड चॉकलेटी फज घरच्याघरीच करण्याची सोपी रेसिपी पाहूयात. मऊसर, रसरशीत आणि प्रत्येक घासात चॉकलेटची मजा देणारा पण तितकाच पौष्टिक चॉकलेटी फज खाण्याचा आनंद लुटा.
साहित्य :-
१. अक्रोड - १ कप
२. खजूर - १/२ कप (बिया काढून कोमट पाण्यांत भिजवून घेतलेले खजूर)
३. पनीर - १५० ग्रॅम
४. कॉफी पावडर - १/२ टेबलस्पून
५. व्हॅनिला इसेंन्स - १/२ टेबलस्पून
६. डार्क कोको पावडर - २ टेबलस्पून
७. डार्क चॉकलेट बार - ७५ ते १०० ग्रॅम
८. मीठ - चवीनुसार
कृती :-
१. सगळ्यातआधी एका पॅनमध्ये अक्रोड घेऊन गॅसच्या मंद आचेवर कोरडेच भाजून घ्यावेत. त्यानंतर हे भाजून घेतलेले अक्रोड थोडे थंड होऊ द्यावेत. थंड झाल्यावर सुरीच्या मदतीने कापून त्याचे छोटे तुकडे करून घ्यावेत.
२. आता एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यात भाजून बारीक तुकडे केलेले अक्रोड, कोमट पाण्यांत भिजवून घेतलेले खजूर, पनीर, व्हॅनिला इसेंन्स, कॉफी पावडर, कोको पावडर असे सगळे जिन्नस एकत्रित घालून वाटून घ्यावेत. त्याची मऊसूत पण थोडी रवाळ अशी पेस्ट तयार करुन घ्यावी.
Cake : तूप कढवून बेरी फेकून देता, करा बेरीचा मावा केक! मुलांनाही आवडेल, बेकरीपेक्षाही भारी चव...
साजूक तूप कढवताना बिघडते? लोण्यात २ पदार्थ मिसळा - तूप होईल रवाळ रंगही येईल मस्त...
३. मिक्सरमधील वाटून घेतलेले मिश्रण एका मोठ्या बाऊलमध्ये भरुन व्यवस्थित चमच्याच्या मदतीने बाऊलमध्ये सेट करून घ्यावे. त्यानंतर २ ते ३ तासांसाठी हा बाऊल फ्रिजमध्ये ठेवून फज व्यवस्थित सेट करुन घ्यावे.
४. ३ तासानंतर फ्रिजमध्ये ठेवून सेट झालेले फज बाहेर काढून त्यावर वितळवून घेतलेलं डार्क चॉकलेट आपल्या आवडीनुसार घालावे. मग त्यावर चवीनुसार हलकेसे मीठ भुरभुरवून घालावे. सगळ्यात शेवटी यावर अक्रोडाचे बारीक तुकडे देखील घालावे.
फज खाण्यासाठी तयार आहे. आपण हे मस्त थंडगार, चॉकलेटी फज जेवणानंतर स्वीट डिश म्हणून अगदी आवडीने खाऊ शकता. घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच जिभेचे गोड चोचले पुरवणार हे चॉकलेटी फज सगळ्यांनाच आवडेल.