Join us

ना गूळ ना साखर, बाप्पांसाठी करा मखाण्यांचे मोदक! खा मनसोक्त पौष्टिक आणि सण साजरा करा आनंदात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2025 15:35 IST

Sugar-free Makhana Modak : No jaggery Makhana Modak : Healthy Modak recipe : Makhana Modak for Ganesh Chaturthi : Makhana Modak Recipe : मखाण्यांचे पौष्टिक मोदक फक्त चविष्टच नाही तर प्रसाद म्हणून आरोग्यदायी असा उत्तम पदार्थ आहे.

गणपती बाप्पाच्या आगमनाची चाहूल आता सगळ्यांनाच लागली आहे आणि त्यांच्या स्वागतासाठी घराघरात तयारी सुरू झाली आहे. बाप्पाला सर्वात प्रिय असणारा पदार्थ म्हणजे मोदक. मोदकांशिवाय गणपती बाप्पाचा प्रसाद, नैवेद्य अधुरेच आहे. गणपती बापाला मोदक आवडतात म्हणून आपण दरवर्षी वेगवेगळ्या (Makhana Modak for Ganesh Chaturthi) प्रकारचे मोदक करतोच. आपल्याकडे पारंपरिक पद्धतीचे उकडीचे मोदक तसेच तळणीचे असे दोन मुख्य प्रकार फार मोठ्या प्रमाणावर केले जातात(Makhana Modak Recipe).

सध्याच्या काळात प्रत्येकजण आपल्या आरोग्याची काळजी घेतोच, यासाठी आरोग्यदायी आणि पौष्टिक पर्याय म्हणून आपण मखाण्यांचे मोदक देखील घरच्याघरीच तयार करु शकतो. यावर्षी पारंपरिक मोदकांसोबत काहीतरी वेगळं आणि आरोग्यदायी व पौष्टिक मोदक तयार करायचे असतील तर मखाण्यांचे पौष्टिक मोदक हा एक उत्तम पर्याय आहे. मखाणे जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जातात. कमी कॅलरी, भरपूर प्रथिने आणि आवश्यक खनिजे यांचा साठा असलेले मखाणे उपवासासाठी आणि लहान मुलांसाठीही भरपूर पौष्टिक असतात. मखाणे हे प्रोटीन, फायबर आणि अँटिऑक्सिडंट्सने भरलेले असल्याने हे मोदक केवळ चविष्टच नाहीत तर प्रसाद म्हणून आरोग्यदायीही ठरतात. यंदाच्या गणेश चतुर्थीला बाप्पाच्या नैवेद्यासाठी आरोग्यदायी व पौष्टिक मोदकांचा नैवेद्य दाखवून सण आनंदाने साजरा करूयात.

साहित्य :- 

१. मखाणे - ३० ग्रॅम २. साजूक तूप - २ ते ३ टेबलस्पून ३. बदाम - १/४ कप ४. वेगवेगळ्या प्रकारच्या सीड्स - १/२ कप (सूर्यफुलाच्या, भोपळ्याच्या बिया)५. पांढरे तीळ - १ टेबलस्पून ६. सुकं खोबरं - १/४ कप ७. खसखस - १/२ टेबलस्पून ८. खजूर - १० ते १२ टेबलस्पून ९. कोको पावडर - १ टेबलस्पून 

Ganesh Utsav 2025 : पूजेसाठी घरच्या विड्याची पानं हवीत? नागवेलीसाठी ‘हा’ पदार्थ खास खत, वेल होईल हिरवीगार...

उकडीच्या मोदकांसाठी गूळखोबऱ्याचं सारण कधी सैल होतं कधी कडक? सारण परफेक्ट करण्यासाठी ५ टिप्स...

कृती :- 

१. एका मोठ्या कढईत साजूक तूप घेऊन त्यात बदाम, सूर्यफुलाच्या बिया, भोपळ्याच्या बिया, पांढरे तीळ, सुकं खोबरं, खसखस असे सगळे जिन्नस एकत्रित घेऊन हलकेच भाजून घ्यावेत. सगळे जिन्नस भाजून झाल्यावर एका डिशमध्ये काढून थोडे थंड होऊ द्यावेत. २. त्यानंतर त्याच कढईत मखाणे देखील हलकेच भाजून घ्यावेत. भाजलेले मखाणे देखील एका बाऊलमध्ये काढून थोडे थंड करून घ्यावेत. ३. आता मिक्सरच्या भांड्यात भाजलेले मखाणे व इतर भाजून घेतलेले साहित्य असे एकत्रित वाटून घ्यावे. 

साचा न वापरताच करा उकडीचे कळीदार मोदक, पाहा सोपी पद्धत-सुंदर मोदक करा सहज...

४. पॅनमध्ये थोडे साजूक तूप घालूंन त्यात बिया काढून घेतलेले खजूर हलकेच परतवून घ्यावेत. मग यात कोको पावडर घालावी. आता हे सगळे मिश्रण हलकेच तुपात परतवून घ्यावे. खजूर आणि कोको पावडरचे मिश्रण परतवून, मिक्सरमधून वाटून घेतलेल्या मिश्रणात घालून हाताने हलकेच दाब देत कालवून घ्यावे. ५. मोदकाच्या साच्याला थोडे तूप लावून त्यात हे तयार मिश्रण भरुन मोदक तयार करून घ्यावेत.  

गूळ किंवा साखरेचा वापर न करता पौष्टिक असे मखाण्यांचे मोदक खाण्यासाठी तयार आहेत. हे मोदक १५ दिवस चांगले टिकतात. आपण बाप्पाच्या प्रसादाला किंवा नैवेद्यासाठी म्हणून असे हेल्दी मोदक नक्की घरच्याघरीच झटपट तयार करु शकता.

टॅग्स :अन्नपाककृतीगणेश चतुर्थीगणेश चतुर्थी रेसिपीगणपती उत्सव २०२५