वाढत्या उन्हाळ्यामुळे जीवाची काहिली होते. उन्हाळा ऋतू सगळ्यांनाच नकोसा वाटतो. उन्हाळ्यात गरमी आणि वातावरणातील उष्णतेमुळे सतत काही ना काही थंडगार खाण्या - पिण्याची इच्छा होतेच. यासाठी उन्हाळ्यात (Nimbu Pudina Sharbat Primix Powder) आपण वेगवेगळ्या प्रकारचे सरबत, फळांचे रस अशा वेगवेगळ्या थंडगार पदार्थांचा मनमुराद आस्वाद घेतो. उन्हाळ्यात शरीराला आतून थंडगार ठेवण्यासाठी आपण काही विशेष पदार्थांचा रोजच्या आहारात समावेश करतो, हिरवागार पुदिना हा त्यापैकीच एक(How to make pudina sharbat premix powder at home).
उन्हाळ्यात पुदिना खाणे अतिशय फायदेशीर मानले जाते. यासाठीच आपण उन्हाळ्यात वेगवेगळी सरबतं, चटणी, कोशिंबीर, रायतं अशा पदार्थांमध्ये पुदिन्याची पानं आवर्जून घालतोच. उन्हाळ्यात फार मोठ्या प्रमाणावर मिळणाऱ्या हिरव्यागार पुदिन्याच्या पानांच्या सरबताचे प्रिमिक्स देखील आपण घरच्याघरीच तयार करु शकतो. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी पुदिन्याच्या पानांचे सरबतं कसं करायचं याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. पुदिना - १ कप
२. बडीशेप - १/२ कप
३. काळीमिरी - १ टेबल्स्पून
४. वेलची - १० ते १२ लहान वेलची
५. जिरे - १ टेबलस्पून (भाजलेलं जिरं)
६. खडीसाखर - १/२ कप
७. काळे मीठ - १ टेबलस्पून
८. तुळशीच्या बिया किंवा सब्जा - १ टेबलस्पून
साजूक तूप करण्याची पाहा नवी पद्धत, घरचे तूप होईल झटपट आणि छान रवाळ...
कृती :-
१. सगळ्यात आधी पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून घ्यावीत. एका डिशमध्ये ही पानं पसरवून २ ते ३ दिवस उन्हांत ठेवून वाळवून घ्यावीत. पानं संपूर्णपणे वाळवून घ्यावीत.
२. पानं वाळल्यानंतर हाताने हलकेच दाब देत पानांचा चुरा करून घ्यावा.
३. आता एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यात पुदिन्याच्या पानांचा चुरा, बडीशेप, काळीमिरी, वेलची, भाजलेलं जिरं, खडीसाखर असे सगळे जिन्नस एकत्रित घेऊन मिक्सर फिरवून त्याची बारीक पावडर करून घ्यावी. या तयार पावडरमध्ये, चवीनुसार काळे मीठ घालावे.
फक्त १० मिनिटांत करा आंब्याचा मऊ - लुसलुशीत शिरा, एकदा कराल टेस्ट तर म्हणाल बेस्ट...
४. पावडर तयार झाल्यावर गाळणीच्या मदतीने ही पावडर चाळून घ्यावी.
५. चाळून घेतलेली पावडर एका एअर टाईट कंटेनरमध्ये भरुन स्टोअर करावी. सगळ्यांत शेवटी या तयार पावडरमध्ये आपल्या आवडीप्रमाणे तुळशीच्या किंवा सब्जाचे बी घालावे.
सरबत कसे करायचे ?
एका ग्लासात तयार प्रिमिक्स १ टेबलस्पून घ्यावे. त्यानंतर त्यात आपल्या आवडीनुसार थंड पाणी आणि बर्फाचे खडे घालावेत. आपण यात लिंबाचा रस देखील आवडीनुसार घालू शकता. अशाप्रकारे आपण वर्षभर टिकणारे हे पुदिन्याच्या पानांच्या सरबताचे प्रिमिक्स एकदाच तयार करून ठेवू शकता. उन्हाळ्यात आपल्याला हवे तेव्हा आपण हे सरबत पिऊ शकता.