Join us

Navratri Special Recipe : एकदाच करा, ९ दिवस निवांत! उपवासाचा करा ‘असा’ परफेक्ट चिवडा, घरचेही मागतील रोज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2025 13:21 IST

Navratri Special Recipe: Make it once, for 9 days! Make this perfect Chivda for fasting, your family will love it : उपासाचा असा चिवडा नक्की करा. एकदम सोपी रेसिपी.

नवरात्रीसाठी खास चिवडा तयार करा. नवरात्रीचे नऊ दिवस म्हणजे अनेकांचे उपवास. उपवासाच्या काळात शरीराला ऊर्जा देणारा असा हा चिवडा नक्की खा. तसेच पचायलाही तसा हलकाच असतो. ही रेसिपी तुपात, साजूक तुपात किंवा तुमच्या आवडत्या तेलात तयार करु शकता. (Navratri Special Recipe: Make it once, for 9 days! Make this perfect Chivda for fasting, your family will  love it )यात शेंगदाणे, सुकामेवा किंवा साबुदाणा यांसारखे पौष्टिक घटक असल्याने शरीराला आवश्यक पोषणसत्वे मिळतात. उपवासातही चव, पौष्टिकता आणि ऊर्जा टिकवून ठेवणारा हा चिवडा नवरात्रीच्या दिवसांमध्ये पाहुण्यांना खायला द्यायलाही मस्त आहे.  

साहित्य नायलॉन साबुदाणा, शेंगदाणे, कडीपत्ता, बटाटा, मीठ, लाल तिखट(चालत असेल तर), हिरवी मिरची, पाणी, काजू, तेल

कृती१. बटाटा सोलून घ्या. सगळ्या पदार्थांचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्यायचे. बटाटा सोलून झाल्यावर बारीक किसायचा. बटाट्याचा किस पाण्यात बुडवायचा. स्वच्छ धुवायचा. काही वेळासाठी भिजवायचा. नंतर हाताने त्याचे पाणी काढून टाकायचे. तसेच एका कॉटनच्या कापडावर तो पसरवायचा. वरतून दुसऱ्या कॉटनच्या कापडाने पाणी शोषून घ्यायचे. 

२. किस जरा कोरडा झाला की तळायचा. पंख्याखालीही वाळवू शकता. एका कढईत तेल तापवायचे. तेल मस्त गरम झाल्यावर त्यात थोडाथोडा करुन किस तळून घ्यायचा. मस्त कुरकुरीत तळायचा आणि बाजूला ठेवायचा. नंतर त्याच तेलात कडीपत्ता तळून घ्यायचा. तसेच शेंगदाणे तळायचे. नायलॉन साबुदाणा तळायचा. तो तळल्यावर फुलतो. काजूचे तुकडे तळून घ्यायचे. हिरव्या मिरचीचे तुकडे तळायचे. सारे पदार्थ तळून घ्यायचे. 

३. एका खोलगट पातेल्यात किंवा परातीत बटाट्याचा तळलेला किस घ्यायचा. त्यात शेंगदाणे घालायचे. तसेच तळलेले काजू घाला. कडीपत्ता घाला आणि साबुदाणाही घाला. इतरही सारे पदार्थ घाला. गार झाल्यावरच पदार्थ मिक्स करायचे. त्यात मीठ घाला आणि लाल तिखट घाला. व्यवस्थित मिक्स करा आणि मग हवाबंद डब्यात काढून घ्या. चवीला फार मस्त लागतो. नक्की करुन पाहा.     

टॅग्स :नवरात्रीअन्ननवरात्री उपवास आणि पदार्थ २०२४पाककृतीकुकींग किचन टिप्स आणि ट्रिक्स.