Lokmat Sakhi >Food > Navratri Special Fast Food 2025: उपवासाला करा साबुदाणा अप्पे आणि कढी, पौष्टिक - पोटभरीचा खास फराळी पदार्थ

Navratri Special Fast Food 2025: उपवासाला करा साबुदाणा अप्पे आणि कढी, पौष्टिक - पोटभरीचा खास फराळी पदार्थ

Navratri special recipes: fasting recipes for Navratri: sabudana appe recipe: उपवासाला साबुदाणा अप्पे आणि कढीची रेसिपी ट्राय करुन पाहा.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2025 09:30 IST2025-09-22T09:30:00+5:302025-09-22T09:30:02+5:30

Navratri special recipes: fasting recipes for Navratri: sabudana appe recipe: उपवासाला साबुदाणा अप्पे आणि कढीची रेसिपी ट्राय करुन पाहा.

Navratri Special Fast Food 2025 nutritious sabudana appe and kadhi for fast filling festive fasting recipes | Navratri Special Fast Food 2025: उपवासाला करा साबुदाणा अप्पे आणि कढी, पौष्टिक - पोटभरीचा खास फराळी पदार्थ

Navratri Special Fast Food 2025: उपवासाला करा साबुदाणा अप्पे आणि कढी, पौष्टिक - पोटभरीचा खास फराळी पदार्थ

नवरात्रौत्सव सुरु झाला की, सगळीकडे भक्तीमय वातावरण असतं. या नऊ दिवसात अनेकांचे उपवास असतात.(Navratri special recipes) त्यामुळे मोजकेच पदार्थ खाल्ले जातात. उपवास म्हटलं की साबुदाणा खिचडी, वडे, रताळू, भगर किंवा पराठे, शिंगाड्या-राजगिऱ्याचे थालीपीठ असो किंवा बटाट्याची भाजी असो.(fasting recipes for Navratri) हे पदार्थ हमखास खाल्ले जातात. पण दरवेळी तेच ते पदार्थ खाऊन आपल्याला देखील वैताग येतो. (sabudana appe recipe)
साबुदाणा हा उपवासातला सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ समजला जातो. पचायला हलका आणि ऊर्जा देणारा. पण अनेकदा साबुदाणा खिचडी करताना ती वातड होते.(kadhi recipe for fast) साबुदाणा कडक राहातो, ज्यामुळे खाण्याची इच्छा होत नाही. वडे केल्यानंतर ते तेलात फुटतात किंवा अधिक तेल पितात ज्यामुळे अपचनाचा त्रास होतो. पण तेच ते पदार्थ खाऊन कंटाळला असाल तर साबुदाणा अप्पे आणि कढीची रेसिपी ट्राय करुन पाहा. आंबट-गोड चवीचे कॉम्बिनेशन उत्तम लागते. तसेच पचायलाही हलके असते, पाहूया यासाठी लागणारे साहित्य आणि कृती. (healthy fasting dishes)

घरच्या घरी करा अण्णाकडे मिळते तशी खोबऱ्याची चटणी, १५ मिनिटांत होणारा खास साऊथ इंडियन पदार्थ

साहित्य 

साबुदाणा अप्पेसाठी 

भिजवलेला साबुदाणा - १ कप 
उकडलेले रताळू- २
भाजलेले शेंगदाणे - १/४ कप 
बारीक चिरलेली हिरवी मिरची - २
बारीक चिरलेली कोथिंबीर 
लिंबाचा रस- (हवा असल्यास)
तेल - आवश्यकतेनुसार 
मीठ - चवीनुसार 

कढीसाठी 

दही - अर्धा कप 
नारळाचा किस - १ चमचा 
पाणी - १ कप 
भाजलेले शेंगदाणे - १ चमचा 
कोथिंबीर 
तेल - १ चमचा 
जिरे - १/२ चमचा
कढीपत्त्याची पाने
साखर - १/२ चमचा

Morning Breakfast Idea : कपभर पीठाचे करा बाजरीचे धिरडे, झटपट पौष्टिक नाश्ता, वेटलॉससाठी उत्तम रेसिपी

 
कृती 

1. सगळ्यात आधी आपल्याला साबुदाणा भिजवून घ्यावा लागेल. त्यानंतर रताळे उकडून त्याचे साल काढून घ्या. शेंगदाणे भाजून त्याची सालं काढून घ्या. यानंतर एका मोठ्या ताटात भिजवलेला साबुदाणा आणि उकडलेले रताळू चांगले मॅश करा. त्यात भाजलेले शेंगदाणे, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ आणि हवं असल्यास लिंबाचा रस घालून चांगले पीठ मळून घ्या. 

2. तयार पीठाचे हाताने लहान गोळे करा.  अप्पे पात्र गरम करुन त्यात तेल पसरवून घ्या. तयार साबुदाण्याचे वडे अप्पे पात्रात व्यवस्थित फ्राय करुन घ्या. 

3. कढी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात दही, कोथिंबीर, सु्क्या खोबऱ्याचा किस आणि पाणी घालून त्याची बारीक पेस्ट तयार करा. आता कढई गरम करुन त्यात मिक्सरमधली पेस्ट, भाजलेले शेंगदाणे, मीठ, साखर, कोथिंबीर घालून उकळी आणा. फोडणी पात्रात तेल गरम करुन त्यात जिरं आणि कढीपत्ता घाला. फोडणी तडतडल्यानंतर कढीत घाला. 

4. आता तयार साबुदाणा अप्पे एका ताटात घेऊन त्यावर गरमागरम कढी पसरवा. उपवासाचा भन्नाट आणि हेल्दी पदार्थ साबुदाणा अप्पे आणि कढी सर्व्ह करा. 


 

Web Title: Navratri Special Fast Food 2025 nutritious sabudana appe and kadhi for fast filling festive fasting recipes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.