Lokmat Sakhi >Food > Navratri 2025 Fast Special Recipe : फक्त १५ मिनिटात करा उपवासाचा पराठा, रेसिपी सोपी आणि पचायला हलकी

Navratri 2025 Fast Special Recipe : फक्त १५ मिनिटात करा उपवासाचा पराठा, रेसिपी सोपी आणि पचायला हलकी

navratri fasting recipes: quick upvas paratha recipe: navratri 2025 food ideas: नवरात्रीत उपवास करत असाल तर कोणतीही पूर्वतयारी न करता अवघ्या १५ मिनिटांत होणारा इंस्टंट पराठा आपण ट्राय करु शकतो.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2025 11:15 IST2025-09-19T11:14:50+5:302025-09-19T11:15:46+5:30

navratri fasting recipes: quick upvas paratha recipe: navratri 2025 food ideas: नवरात्रीत उपवास करत असाल तर कोणतीही पूर्वतयारी न करता अवघ्या १५ मिनिटांत होणारा इंस्टंट पराठा आपण ट्राय करु शकतो.

Navratri 2025 Fast Special Recipe: Make fasting paratha in just 15 minutes, recipe is simple and easy to digest | Navratri 2025 Fast Special Recipe : फक्त १५ मिनिटात करा उपवासाचा पराठा, रेसिपी सोपी आणि पचायला हलकी

Navratri 2025 Fast Special Recipe : फक्त १५ मिनिटात करा उपवासाचा पराठा, रेसिपी सोपी आणि पचायला हलकी

शारदीय नवरात्रौत्सव म्हटलं की, अनेकांचे नऊ दिवस उपवास असतात. या काळात मोजकेच पदार्थ खाल्ले जातात. साबुदाणा खिचडी, वडे, बटाटा किंवा रताळू.(navratri fasting recipes) हे पदार्थ घरोघरी खाल्ले जातात. पण यांने अपचनाचा किंवा पित्ताचा त्रास देखील होतो.(quick upvas paratha recipe) अनेकांना तर रोज रोज तेच पदार्थ खाण्याचा देखील कंटाळा येतो.(navratri 2025 food ideas) अनेकदा आपली नवीन काहीतरी खाण्याची इच्छा देखील होते.(vrat special recipes) पण उपवासाला नेमकं काय खावं हे देखील कळत नाही. पण अशावेळी कोणतीही पूर्वतयारी न करता अवघ्या १५ मिनिटांत होणारा इंस्टंट पराठा आपण ट्राय करु शकतो. या पारंपरिक उपवासाच्या पदार्थाला आपण वेगळा ट्विस्ट देऊ शकतो.(easy fasting recipes) 
हा पराठा तयार करण्यासाठी आपल्याला फारसा वेळ लागणार नाही. आपण अगदी कमी साहित्यात तयार होणारा हा पोटभरीचा पदार्थ आहे. ज्यामुळे आपल्याला दिवसभर भूक देखील लागणार नाही. यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. 

डोशाचं पीठ उरलं तर करा झटपट ५ पदार्थ, एकाच पीठात चमचमीत पदार्थ-नाश्ता गरमागरम

साहित्य 

उकडलेला बटाटा - १
हिरव्या मिरच्या - ४ ते ५
जिरे - १ चमचा 
मीठ - चवीनुसार 
राजगिरा पीठ - १ वाटी 
पाणी 
तूप 


 

कृती 

1. सगळ्यात आधी आपल्याला बटाटा उकडून घ्यावा लागेल. थंड झाल्यानंतर त्याचे साल काढून घ्या. एका ताटात बटाटा किसून घ्या. नंतर खलबत्ता किंवा मिक्सरमध्ये हिरवी मिरची, जिरे आणि मीठ घालून त्याची पेस्ट तयार करा. 

2. आता आपल्याला एका भांड्यात किसलेला बटाटा, हिरवी मिरचीचे वाटण, राजगिरी पीठ आणि चवीनुसार मीठ घाला. त्यात थोडे पाणी घालून पीठासारखे मळून घ्या. 

3. यानंतर पीठाचे गोळे करुन चपाती लाटतो तसे लाटून घ्या. आता तवा गरम करुन त्यावर तूप पसरवा. मंद आचेवर दोन्ही बाजूने पराठा खमंग भाजून घ्या. 


Web Title: Navratri 2025 Fast Special Recipe: Make fasting paratha in just 15 minutes, recipe is simple and easy to digest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.