नारळी पौर्णिमा हा सण महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.(Narali Purnima Recipe) या दिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करतात. इतकंच नाही तर अनेक घरांमध्ये नारळाचे विविध पदार्थ देखील बनवले जातात.(Coconut jaggery barfi) नारळी भात, ओल्या नारळाची पुरणपोळी, नारळाचे लाडू आणि नारळाची वडी. या दिवशी रक्षाबंधन हा सण देखील साजरा केला जातो.(10-minute sweet recipe) बहिण आपल्या लाडक्या भावाला राखी बांधून मिठाई भरवून त्याचं तोंड गोड करते.(No grate coconut sweet)
नारळी पौर्णिमेच्या दिवशी नारळापासून तयार केलेल्या पदार्थांना विशेष असं महत्त्व असते. नारळाचे विविध पदार्थ करुन नैवेद्य अर्पण केला जातो. पण या दिवशी पारंपरिक पदार्थांना अधिक महत्त्व असतं. सगळ्यांचा आवडता आणि झटपट होणारा पदार्थ नारळाची बर्फी.(Indian festival sweets) ही बर्फी आपण कधीतरीच करतो. नारळ खवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागते. त्यामुळे आपण फारसा खटाटोप करत नाही. पण एक सोपी ट्रिक वापरून आपण नारळ न खवता गिल्ट फ्री बर्फी बनवू शकतो.(Traditional sweets) इतकच नाही तर यासाठी जास्त वेळ देखील लागणार नाही. कमी गोडाचा पदार्थ नारळाची बर्फी कशी बनवायची पाहूया, लागणारे साहित्य आणि कृती जाणून घ्या.
साहित्य
नारळ - २
तूप - १ चमचा
गूळ - १ कप
वेलची पूड - १ चमचा
ड्रायफ्रुट्स - आवश्यकतेनुसार
सुक्या नारळाचा किस
कृती
1. सगळ्यात आधी नारळ फोडून घ्या. नंतर त्याचे बारीक तुकडे करा. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये नारळाचे तुकडे थोडे थोडे घालून वाटून घ्या.
2. आता कढई गरम करुन त्यात चमचाभर तूप घाला. नारळाचा किस त्यात घालून हलका लाल रंग येईपर्यंत भाजून घ्या. रंग बदलल्यानंतर त्यात गूळ घालून चांगला वितळवून घ्या. गूळ वितळल्यानंतर नंतर त्यात वेलची पूड घालून चांगले मिक्स करुन घ्या. त्यात आवडीचे ड्रायफ्रुट्स घालून चांगले परतवून घ्या.
3. एका प्लेटमध्ये बटर पेपर ठेवून त्यात तयार नारळाचे सारण पसरवून घ्या. हाताने मिश्रण व्यवस्थित प्लेटमध्ये थापून घ्या. वरुन सुक्या नारळाचे किस पसरवून घ्या. चौकोनी तुकडे करुन घ्या. रेडी आहे गिल्ट फ्री ओल्या नारळाची बर्फी.