Join us
Daily Top 2Weekly Top 5

साजूक तूप, गरमागरम भात आणि वडा.. नागपूरी वडाभात म्हणजे निव्वळ सुख! अस्सल पारंपरिक रेसिपी, विदर्भातला खास पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2026 09:30 IST

Vidarbhatla khass padarth: Vada bhat kase banvayche: Nagpur chi shan Vada bhat: अनेकदा भात मऊ-मोकळा होत नाही किंवा वडा कडक होतो. चला तर बघूया या वडाभाताची कृती.

प्रांत बदलला की पदार्थांची चव देखील बदलते. मराठी खांद्यसंस्कृतीत प्रत्येक प्रांताची विशिष्ट अशी ओळख आहे. कोकणात घावणं, आंबोळी खाल्ली जाते, तसेच विदर्भात विशेषत: नागपूरमध्ये वडाभात खाल्ला जातो. साजूक तूप, पांढराशुभ्र भात आणि त्यासोबत गरमागरम, कुरकुरीत वडा. (Vidarbhatla khass padarth)वडाभात म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो म्हणजे हरभऱ्याच्या डाळीचा खमंग वडा आणि सुटसुटीत वाफाळलेला भात. सण-समारंभ असो वा लग्नाची पंगत, नागपुरात वडाभाताशिवाय जेवण पूर्ण होत नाही. हा पदार्थ दिसायला साधा असला तरी चवीला अप्रतिम लागतो.(Vada bhat kase banvayche) पण अनेकदा भात मऊ-मोकळा होत नाही किंवा वडा कडक होतो. चला तर बघूया या वडाभाताची कृती.(Nagpur chi shan Vada bhat)

रोज सायंकाळी 'हे ' प्यायल्याशिवाय मला काही सुचत नाही! करीना कपूर सांगते तिच्या व्यसनाची डेंजर गोष्ट

वडे बनवण्यासाठी :

अर्धी वाटी- मिश्र डाळी एकत्र करूनअर्धी वाटी- मिश्र कडधान्य एकत्र करून१ मध्यम- तुकडा आलं७ ते ८- लसूण पाकळ्या६- हिरव्या मिरच्या१० ते १२- कढीपत्ता पाने१ मोठी वाटी- चिरलेली कोथिंबीर१ चमचा- हळद१ चमचा- आमचूर पावडर१ चमचा- मीठदीड चमचा- चाट मसाला१ चमचा- धने पावडर१ चमचा- जिरे पावडर२ वाट्या- तेलमीठ- चवीनुसार

फोडणीसाठी :

१ चमचा - जिरं१ चमचा - मोहरी८ ते १० - कढीपत्ता पाने१ चमचा - हिंग१ चमचा - हळद४ - सुक्या लाल मिरच्या२ कप- शिजवलेला भाज  

कृती 

1. सगळ्यात आधी सर्व कडधान्ये आणि डाळी एका बाऊलमध्ये ५ ते ६ तासांसाठी भिजवून घ्या. आता आले, लसूण, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता वाटून त्याची पेस्ट तयार करा. 

2. भिजवलेल्या डाळींना मिक्सरमध्ये वाटून त्याची जाडसर पेस्ट करा. त्यात हळद, आमचूर पावडर, मीठ, आले लसणाचे वाटण, कोथिंबीर, चाट मसाला, धने पावडर, जिरे पावडर घालून सर्व मिश्रण एकजीव करा. 

3. मिश्रणाचे वडे तयार करा. इडली पात्राला तेलाने ग्रीस करुन घ्या आणि त्यात वडे वाफवून घ्या. यानंतर पॅनमध्ये तेल गरम करुन वडे शॅलो फ्राय करुन घ्या. वडे व्यवस्थित तळल्यानंतर काढून घ्या. 

4. पॅनमध्ये तेल गरम करुन त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, हिंग, लाल मिरच्या, हळदची फोडणी तयार करा. ताटात शिजवलेला भात पसरवून घ्या. त्यात शिजवलेल्या वड्याचे तुकडे घाला आणि वरुन तयार फोडणी घाला. तयार होईल गरमागरम नागपूर स्पेशल वडाभात. 

English
हिंदी सारांश
Web Title : Nagpuri Vada Bhat: A Vidarbha Special Dish with Authentic Recipe

Web Summary : Nagpuri Vada Bhat, a Vidarbha specialty, features crispy vada served with ghee-laden rice. This dish, made with lentils and spices, is a Nagpur staple for celebrations. The recipe involves soaking lentils, grinding them into a paste, and frying the vada for a flavorful experience.
टॅग्स :अन्नपाककृती