Join us

कपभर मुरमुऱ्यांचा करा इन्स्टंट मेदू वडा! चविष्ट आणि पौष्टिक ब्रेकफास्ट फक्त १५ मिनिटांत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2025 18:57 IST

Murmura Vada Recipe : Easy & Quick Murmura Recipes : How To Make Murmura Vada At Home : फक्त एक वाटी मुरमुऱ्यांचे करा साऊथ स्पेशल मेदू वडे काही मिनिटांत तयार...पाहा सोपी रेसिपी...

मुरमुरे हा एक हलका - फुलका, कुरकुरीत स्नॅक्सचा प्रकार आहे. मुरमुरे लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडतात.  टी टाईम स्नॅक्ससाठी मुरमुऱ्यांपासून तयार केलेले अनेक पदार्थ खाल्ले जातात. मुरमुऱ्यांचे लाडू, चिवडा, भेळ, भडंग हे पदार्थ भरपूर प्रमाणात खाल्ले जातात. टी टाईम स्नॅक्स किंवा मधल्या (Murmura Vada Recipe) वेळेत भूक लागली असेल तर अशावेळी आपण मुरमुऱ्यांचे हलके - फुलके स्नॅक्स (murmura snacks recipe) खाऊ शकतो. मुरमुऱ्यांमध्ये भरपूर प्रमाणात कर्बोदक, प्रथिन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह असते. या मुरमुऱ्यांमध्ये आरोग्यास अपायकारक वाईट फॅट्स व कोलेस्ट्रॉल नसते. त्यामुळे मुरमुऱ्यांपासून बनवलेले पदार्थ खाणे (Easy & Quick Murmura Recipes) शरीराला फायदेशीर ठरते(How To Make Murmura Vada At Home).

चविष्ट मुरमुरे फक्त भेळ किंवा नाश्त्यापुरतेच खाण्यासाठी मर्यादित नाहीत, तर त्यापासून अगदी झटपट आणि पौष्टिक वडेही करता येतात. हे वडे बाहेरून कुरकुरीत तर आतून मऊ - लुसलुशीत लागतात, असे चविष्ट वडे मुलांना आणि मोठ्यांना सगळ्यांनाच आवडतात. खास करून शाळेच्या डब्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या नाश्त्यासाठी हे मुरमुऱ्याचे वडे अगदी सर्वोत्तम पर्याय ठरतात. फक्त एक वाटी मुरमुऱ्यांपासून हे चविष्ट वडे काही मिनिटांत तयार करता येतात, त्यामुळे वेळ कमी असेल तरी पौष्टिक आणि चटपटीत काहीतरी खायचं असेल तर साऊथ स्पेशल मुरमुरा वडा एका करुन पाहा.  

साहित्य :- 

१. मुरमुरे - २ कप २. पाणी - गरजेनुसार ३. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ मिरच्या४. आल्याचा तुकडा - १ छोटा तुकडा ५. कडीपत्ता - ७ ते ८ पाने६. जिरे - १ टेबलस्पून ७. मीठ - चवीनुसार ८. काळीमिरी पूड - १/२ टेबलस्पून ९. तांदुळाचे पीठ - १/२ कप १०. दही - ३ टेबलस्पून ११. कोथिंबीर - १ टेबलस्पून (बारीक चिरलेली)१२. तेल - तळण्यासाठी

Maharashtrian Alu Vadi Recipe: अस्सल मराठी चवीची पारंपरिक अळूवडी करायची आहे? ‘हे’ घ्या परफेक्ट प्रमाण...

हिरव्यागार कच्च्या केळीची करा पौष्टिक टिक्की! चटपटीत, क्रिस्पी असा खास पोटभरीचा पदार्थ - पाहा रेसिपी...

कृती :- 

१. सगळ्यांतआधी एका मोठ्या बाऊलमध्ये मुरमुरे घेऊन त्यात थोडे पाणी घालून ते भिजवून मऊ करुन घ्यावे. आता या मुरमुऱ्यातील जास्तीचे पाणी काढून घेऊन त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, कडीपत्त्याची पाने, आणि किसलेले आलं घालावं.    २. त्यानंतर या मिश्रणात जिरे, चवीनुसार मीठ, काळीमिरी पूड, तांदुळाचे पीठ, दही घालावे. आता हाताने हे मिश्रण कालवून एकजीव करून घ्यावे. हे मिश्रण हाताने हलकेच दाब देत मळून घ्यावे. 

पावसाळ्यातही परफेक्ट दही विरजण्यासाठी ५ टिप्स, घट्ट-गोडसर मस्त दही लागेल रोज...

३. हाताला थोडेसे तेल लावून या मिश्रणाचे छोटे - छोटे गोळे करून त्याला मेदू वड्यासारखा आकार द्यावा. ४. तयार वडे गरम तेलात खरपूस आणि हलकासा गोल्डन ब्राऊन रंग येईंपर्यंत छान तळून घ्यावे. 

इन्स्टंट आणि चवीला उत्तम असे आतून मऊ - लुसलुशीत आणि बाहेरुन कुरकुरीत मुरमुरा वडा खाण्यासाठी तयार आहे. आपण हिरवी चटणी किंवा सॉस सोबत हा खुसखुशीत मुरमुरा वडा खाऊ शकता.

टॅग्स :अन्नपाककृती