Lokmat Sakhi >Food > मुंबईकरांची आवडती कचोरी भेळ! हिरव्या चटणीसोबत खा- संध्याकाळचा नाश्ता होईल मस्त

मुंबईकरांची आवडती कचोरी भेळ! हिरव्या चटणीसोबत खा- संध्याकाळचा नाश्ता होईल मस्त

Kachori Bhel: Mumbai street food: Green chutney snack: दक्षिण मुंबईमध्ये कचोरी भेळ पदार्थ खूप फेमस आहे पण घरच्या घरी कसा बनवायचा पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2025 09:30 IST2025-09-08T09:30:00+5:302025-09-08T09:30:02+5:30

Kachori Bhel: Mumbai street food: Green chutney snack: दक्षिण मुंबईमध्ये कचोरी भेळ पदार्थ खूप फेमस आहे पण घरच्या घरी कसा बनवायचा पाहूया.

Mumbai style kachori bhel recipe How to make kachori bhel at Home Evening snack ideas with green chutney | मुंबईकरांची आवडती कचोरी भेळ! हिरव्या चटणीसोबत खा- संध्याकाळचा नाश्ता होईल मस्त

मुंबईकरांची आवडती कचोरी भेळ! हिरव्या चटणीसोबत खा- संध्याकाळचा नाश्ता होईल मस्त

मुंबई आणि स्ट्रीट फूड यांचं नातं अनोख आहे. पण मुंबईतल्या अनेक रस्त्यावर मिळणाऱ्या खाद्यपदार्थांविषयी आपल्यापैकी अनेकांना माहित आहे.(Mumbai Street Food) वडापाव, बटाटा वडा, भेलपुरी, पाणीपुरी, सॅण्डविच याची चव देखील तितकीच छान आहे.(Green chutney snack) चाटचे पदार्थ ऐकल्यावरच आपल्या तोंडाला पाणी सुटते. मग त्यात शेवपुरी असो किंवा पाणीपुरी. त्यापैकी एक असणारी कचोरी भेळ.(Kachori Bhel) 
कचोरी भेळ हा पदार्थ दोन पदार्थांना एकत्र करुन बनवण्यात आला आहे.(Evening snacks ideas) याची चव हिरव्या चटणीसोबत आणखी टेस्टी लागते. संध्याकाळी कॉलेजच्या कट्ट्यावर मित्रमैत्रिणींनी भेटायचं, ऑफिस सुटल्यानंतर भरकटलेली भूक भागवायची किंवा विकेंडला घरच्या मुलांना घेऊन जावं – कचोरी भेळ हा एक असा पर्याय आहे ज्याची चव कुठेही विसरली जात नाही.(Bhel puri variations) दक्षिण मुंबईमध्ये हा पदार्थ खूप फेमस आहे पण घरच्या घरी कसा बनवायचा पाहूया. 

इडलीचं पीठ काही केल्या फुगत नाही? 'अण्णाची' ही एक ट्रिक वापरा, कापसाहून मऊसुत-टम्म फुगेल इडली

साहित्य 

भाजलेले चणे - १ वाटी 
कोथिंबीर - १ वाटी 
पुदिना - १ वाटी 
हिरवी मिरची - ७ ते ८ 
आले - ४ तुकडे 
जिरे- १ चमचा 
काळे मीठ - चवीनुसार 
मीठ - चवीनुसार 
चाट मसाला - अर्धा चमचा 
आमचूर पावडर - अर्धा चमचा 
लिंबाचा रस - चवीनुसार 
कुरमुरे - आवडीनुसार 
चणे - आवडीनुसार
पापडी - आवडीनुसार
डाळ - आवडीनुसार
बारीक शेव - आवडीनुसार
छोटी कचोरी 
बारीक चिरलेला बटाटा - १ छोटी वाटी 
बारीक चिरेलला कांदा - १ छोटी वाटी 
बारीक चिरलेला टोमॅटो - १ छोटी वाटी 

पुरी-भजी, समोसे खाल्ले तरी वाढणार नाही कोलेस्टेरॉल! 'या' तेलात तळा, तब्येत राहील एकदम फिट


कृती 

1. सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यात भाजलेले चणे, कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, जिरे, आले, काळे मीठ, साधे मीठ, चाट मसाला, आमचूर पावडर आणि लिंबाचा रस घालून त्याची चटणी तयार करा. ही चटणी हवाबंद डब्यात ठेवल्यास १० दिवस राहते. हवी तेव्हा वापरता येते. 

2. आता एका भांड्यात कुरमुरे, चणे, पापडी, डाळ, बारीक शेव घाला. त्यात छोट्या कचोरीचे छोटे तुकडे करा. आता त्यात बटाटा, कांदा आणि टोमॅटो घालून एक जीव करा. 

3. वरुन त्यात तयार केलेली हिरवी चटणी, आमचूर पावडर, लिंबू आणि चाट मसाला घालून पुन्हा एकजीव करा. तयार होईल कचोरी भेळ. 


Web Title: Mumbai style kachori bhel recipe How to make kachori bhel at Home Evening snack ideas with green chutney

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.