Join us

नाश्त्याला करा हेल्दी सोया उत्तप्पा, प्रोटीन भरपूर-चव मस्त आणि कमी वेळात झटपट पदार्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2025 09:05 IST

Soya keema uttapam: Protein-rich breakfast: Healthy uttapam recipe: सकाळच्या नाश्त्यात आपल्याला हटके काही ट्राय करायचे असेल तर सोया उत्तप्पा करु शकतो.

सकाळचा नाश्ता हा हेल्दी आणि पोटभर असावा असं आपल्याला नेहमी म्हटलं जातं.(Protein-rich breakfast) नाश्ता हा पोटभर असला तर आपल्याला दिवसभर काम करण्याची एनर्जी मिळते.(Healthy uttapam recipe) साधरणत: आपल्या घरात सकाळच्या नाश्त्याला पोहे, उपमासारखे अनेक पदार्थ खातो. तेच तेच पदार्थ बनवून खाण्याचा देखील कंटाळा येतो. (High-protein uttapam)दाक्षिणात्य भागात सकाळच्या नाश्त्यात इडली-डोसा- अप्पे- उत्तप्पा सारखे पदार्थ चवीने खाल्ले जातात.(How to make soya keema uttapam at home) त्यातील सगळ्यात झटपट आणि पौष्टिक पदार्थ हा उत्तप्पा समजला जातो. कांदा-टोमॅटो आणि भाज्या घालून तयार केला जातो.(Healthy protein-packed uttapam recipe) यावर कधीकधी बटाट्याचे सारण देखील घातले जाते. पण आपल्याला हटके काही ट्राय करायचे असेल तर सोया उत्तप्पा करु शकतो. सोयाबीन ही शरीरासाठी पौष्टिक मानली जाते. यामध्ये फायबर आणि जीवनसत्त्वाचे प्रमाण अधिक असते.(Best healthy breakfast recipes with soya) ज्यामुळे हृदय निरोगी राहते. वजन देखील कमी करण्यास मदत करते. सोया उत्तप्पा कसा करायचा पाहूया रेसिपी. 

१ कप नाचणीचे करा गोल- फुललेले अप्पे; १० मिनिटांत होईल झटपट-चविष्ट नाश्ता

साहित्य 

सोयाबीन - १ कप तेल जिरे - १ चमचा चिरलेला कांदा - १ कप कढीपत्ता - ५ ते ६ आले पेस्ट - १ चमचा बारीक चिरलेले गाजर - १ कप बारीक चिरलेली शिमला मिरची - १ कप हळद - १ चमचा लाल तिखट - १ चमचा गरम मसाला - १ चमचा मीठ - चवीनुसार पाणी उत्तप्पाचे बॅटक तूप किंवा बटर 

कृती 

1. सगळ्यात आधी सोयाबीन भिजत घाला. त्यानंतर त्यातील पाणी काढण्यासाठी सोयाबीन हाताने दाबून घ्या. 

2. मिक्सरतच्या भांड्यात सोयाबीन बारीक वाटून घ्या. आता एका पॅनमध्ये तेल गरम करा. 

3. तेलामध्ये जिरे, कांदा, कढीपत्ता आणि आल्याची पेस्ट घालून चांगले परतवून घ्या. कांदा लालसर होईपर्यंत परतवा. 

4. आता यामध्ये गाजर, शिमला मिरची, हळद आणि इतर मसाले घाला. वरुन थोडे पाणी शिंपडा.

5. मिश्रण चांगले शिजून द्या. त्यानंतर पॅन गरम करुन त्यावर उत्तप्पाचे बॅटर पसरवा. 

6. त्यावर तयार मिश्रण पसरवा, वरुन चमचाभर तूप घाला. उत्तप्पा एका बाजूने शिजल्यावर वरुन दुसऱ्या बाजूनही व्यवस्थित शिजवून घ्या. 

7. खायला अगदी टेस्टी, पौष्टिक आणि चविष्ट होईल सोया उत्तप्पा. 

 

 

टॅग्स :अन्नपाककृती