Lokmat Sakhi >Food > सकाळचा नाश्ता होईल झक्कास! मैद्याऐवजी करा हेल्दी मूग डाळीचा पिझ्झा बेस, वजनही राहिल आटोक्यात- पाहा रेसिपी

सकाळचा नाश्ता होईल झक्कास! मैद्याऐवजी करा हेल्दी मूग डाळीचा पिझ्झा बेस, वजनही राहिल आटोक्यात- पाहा रेसिपी

Moong dal pizza base recipe: Healthy breakfast ideas: Weight loss breakfast recipes: सकाळच्या नाश्त्यात काही चटपटीत खायचे, करा मुगडाळीचा पिझ्झा, पाहा रेसिपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2025 10:25 IST2025-05-23T10:00:00+5:302025-05-23T10:25:31+5:30

Moong dal pizza base recipe: Healthy breakfast ideas: Weight loss breakfast recipes: सकाळच्या नाश्त्यात काही चटपटीत खायचे, करा मुगडाळीचा पिझ्झा, पाहा रेसिपी

morning breakfast idea how to make moong daal pizza base weight loss recipe | सकाळचा नाश्ता होईल झक्कास! मैद्याऐवजी करा हेल्दी मूग डाळीचा पिझ्झा बेस, वजनही राहिल आटोक्यात- पाहा रेसिपी

सकाळचा नाश्ता होईल झक्कास! मैद्याऐवजी करा हेल्दी मूग डाळीचा पिझ्झा बेस, वजनही राहिल आटोक्यात- पाहा रेसिपी

हल्ली मुलांना पिझ्झा-बर्गर खायला अधिक आवडतो.(Moong dal pizza base recipe) भारतात लहानांपासून मोठ्यांपर्यंत अनेकांना पिझ्झा आवडतो.(Healthy breakfast ideas) महागड्या कॅफेमध्ये मिळणारा पिझ्झा स्ट्रीट फूड म्हणून ओळखला जाऊ लागला आहे. इतकेच नाही तर रस्त्याच्या कडेला देखील चार्ट कॉर्नरकडे पिझ्झाची गाडी पाहायला मिळते. (Weight loss breakfast recipes)
मैद्याचा बेस त्यावर शिमला मिरची, कॉर्न, कांदा आणि पनीर.(Protein-rich breakfast recipes) वरुन किसलेले चीज. परंतु, मैदा आणि इतर पदार्थांमुळे आपले वजन भरभर वाढू लागते.(Moong dal breakfast pizza) आता पिझ्झा तर खायचा आहे पण तो हेल्दी असावा असं अनेकांना वाटतं.(How to make moong dal batter) सकाळच्या नाश्त्यात आपल्याला देखील हेल्दी आणि पौष्टिक रेसिपी बनवायची असेल तर मैद्याऐवजी मूग डाळीचा पिझ्झा बेस बनवू शकतो. कसा बनवायचा पाहूया. 

अगदी शेवटी, शिजल्यानंतरच घाला ‘या’ ४ भाज्यांमध्ये मीठ, नाहीतर भाजी होते बेचव-उडते पोषण

साहित्य

मूग डाळ - १०० ग्रॅम  
रवा - २ चमचे 
बेकिंग सोडा - अर्धा चमचा 
मीठ - चवीनुसार 
शिमला मिरची - १ कप 
चिरलेला कांदा - १ कप 
चिरलेला टोमॅटो - १ कप 
उकडलेला मका - अर्धा कप 
पनीरचे तुकडे - अर्धी वाटी 
चीज - १ क्यूब 


कृती 

1. सगळ्यात आधी मुगाची डाळ भिजवून वाटून घ्या. त्यानंतर त्यामध्ये रवा, बेकिंग सोडा आणि मीठ घालून चांगले मिक्स करा. 

2. मुग डाळीचे मिश्रण १० मिनिटांसाठी झाकूण ठेवा.  

3. गॅसवर पॅन गरम करुन त्यावर थोडे तेल पसरवा. त्यावर मुगाच्या डाळीचे मिश्रण घाला. पिझ्झा बेस हा जास्त जाड आणि बारीक नसायला हवा, याची काळजी घ्या. 

4. आता बेस उलटा करुन घ्या. त्यावर शेजवान सॉस, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, मका आणि पनीर घालून व्यवस्थित पसरवून घ्या. 

5. वरुन चीज किसून घ्या. ऑरगॅनो आणि चिली फ्लेक्स घालून झाकूण ठेवा. बेस व्यवस्थित शिजल्यानंतर प्लेटमध्ये काढा. 

6. तयार होईल हेल्दी आणि पौष्टिक मूग डाळीचा पिझ्झा 
 

Web Title: morning breakfast idea how to make moong daal pizza base weight loss recipe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.