सकाळी नाश्त्याला काय बनवायचे असा प्रश्न गृहिणींना नेहमीच पडतो.(Healthy breakfast ideas) दिवसाची सुरुवात इतकी घाई गडबडीत असते की, नेमके काय बनवावे सुचत नाही. सकाळचा नाश्ता केल्याने आपल्या दिवसाची सुरुवात ऊर्जात्मक होते. (Easy Indian breakfast recipes)अनेकदा आपल्याकडून सकाळचा नाश्ता स्कीप केला जातो. पोहे, उपमा, इडली खाऊन आपल्यासह मुलांना देखील कंटाळा येतो.
मुलांना सुट्ट्या लागल्यामुळे त्यांना नुसते चटपटीत आणि चमचमीत पदार्थ खायला आवडतात.(How to make rice vada) सकाळच्या नाश्त्यात झटपट काय बनवावे सुचत नाही. तर मग काही मिनिटातच तयार होणारा चविष्ट पदार्थ नक्की करुन पाहा.(Morning snack recipes: Vegan rice vada recipe) विकतचे रिंग फ्राय आणण्यापेक्षा घरीच बनवूयात कपभर तांदळाच्या पीठापासून कुरकुरीत नाश्ता.
समर स्पेशल: कैरी आणि बोराची आंबटगोड चटणी! करायला अगदी सोपी, उन्हाळ्यात जेवणात हवीच हवी
साहित्य
पाणी - दीड कप
तांदळाचे पीठ - १ कप
मीठ - चवीनुसार
तेल - आवश्यकतेनुसार
उकडलेला बटाटा- पाव कप
कृती
1. सगळ्यात आधी गॅसवर पातेल ठेवून त्यात दीड कप पाणी, मीठ, तेल आणि तांदळाचे पीठ घालून उकड काढून घ्या.
2. उकड थोडी थंड झाल्यानंतर एका ताटात काढा, त्यात पाव कप उकडलेला बटाटा घालून पीठ मळून घ्या.
3. त्याचे लहान गोळे करुन त्याच्या मध्यभागी होल करा.
4. कढईत तेल तापवून त्यात तयार केलेला वडा तळून घ्या. हिरव्या चटणीसोबत खा गरमागरम कुरकुरीत वडा.