Join us

सकाळी नाश्त्याला करा कुरकुरीत डाळवडा, पौष्टिक आणि हेल्दी रेसिपी, झटपट आणि पोटभर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2025 15:14 IST

Healthy breakfast ideas for weight loss: Crispy dal vada recipe: Healthy and tasty breakfast recipes: Dal vada for breakfast: Nutritious breakfast ideas: Easy dal vada recipe: Healthy breakfast recipes with dal: पाहूया झटपट बनणारा कुरकुरीत डाळवडा.

सकाळचा नाश्ता हा हेल्दी आणि पौष्टिक हवा असतो. या वेळी नेमकं काय बनवावं असा प्रश्न प्रत्येक महिलेला पडतो. (Healthy breakfast ideas for weight loss)रोज तेच मिळमिळत खाऊन अनेकांना कंटाळा येतो. दिवसाची सुरुवात इतक्या घाईत होते की, सुचतच नाही. सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि घरातील इतर कामांचे टेन्शन. (Crispy dal vada recipe)मुलांना सुट्टी लागल्यामुळे त्यांना दिवसभर बाहेर खेळायचे असते. अशावेळी त्यांच्या पोटात काही हेल्दी आणि पौष्टिक जायला हवे असे प्रत्येक पालकांना वाटते. (Healthy and tasty breakfast recipes) जर आपल्यालाही मुलांना पौष्टिक आणि हेल्दी खाऊ घालायचे असेल तर नाश्त्यात डाळवडा ट्राय करा. यामध्ये डाळीचे मिश्रण असते. जे मुलांच्या आरोग्यासाठी सगळ्यात चांगले आहे. तसेच यामुळे पचन देखील सुधारते. पाहूया झटपट बनणारा कुरकुरीत डाळवडा. (Dal vada for breakfast)

बेसन पीठ न वापरता करा कुरकुरीत -खुसखुशीत कोथिंबीर वडी, पहा रेसिपी- अपचनाचा त्रासही होणार नाही!

साहित्य हरभरा डाळ - १/२ कपसालीसहित मुगाची डाळ - १/२ कपकढीपत्ता हिरवी मिरची - ३ ते ४आले - १ इंच ओल्या नारळाचे तुकडे - ४ ते ५ लसूण - ४ ते ५बारीक रवा - २ ते ३ चमचेशेंगदाणे - २ ते ३ चमचेकाळीमिरी - ५ ते ६ धणे - १ चमचाजीरे - १ चमचाबडीशेप - १ चमचातळण्यासाठी तेल - आवश्यकतेनुसार रेड चिलीफेक्स- १ चमचाहळद - १ चमचामीठ- १ चमचालाल मिरची पावडर - १ चमचामीठ बारीक चिरलेला कांदा - अर्धी वाटी 

">

 

कृती

1. सगळ्यात आधी हरभरा डाळ आणि मुगाची डाळ वेगवेगळी २ ते ३ तास भिजत ठेवा. 

2. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात हरभरा डाळ, मुगाची डाळ, कढीपत्ता, हिरव्या मिरच्या, ओल्या खोबऱ्याचे तुकडे, आले आणि लसूण पाकळ्या व दोन चमचे पाणी घालून वाटून घ्या. 

3. आता पॅनवर शेंगदाणे भाजून घ्या. त्यात काळीमिरी, धणे, जीरे आणि बडीशेप घालून मंद आचेवर भाजून घ्या. 

4. मसाले थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात जाडसर वाटून घ्या. आता वाटलेल्या डाळीच्या पीठात रेड चिलिफेक्स, हळद, लाल मिरची पावडर, मीठ आणि बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, बारीक रवा घाला. 

5. त्यात तयार मसाला घालून मिश्रण चांगले एकजीव करुन घ्या. हाताला तेल लावून वडे तयार करा. 

6. मंद आचेवर वडे कुरकुरीत तयार करुन चटणीसोबत खा.  

 

टॅग्स :अन्नपाककृती