Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > शेवग्याच्या शेंगांचे लोणचे खा - चव मस्त आणि पोषण जबरदस्त! पाहा रेसिपी, करा लगेच

शेवग्याच्या शेंगांचे लोणचे खा - चव मस्त आणि पोषण जबरदस्त! पाहा रेसिपी, करा लगेच

Spiced moringa pod pickle: Traditional Maharashtrian shevga lonche: Best way to eat moringa for health: शेवग्याच्या शेंगाचे हे लोणचं कसं करायचं, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2026 09:30 IST2026-04-13T09:30:00+5:302026-04-13T09:30:02+5:30

Spiced moringa pod pickle: Traditional Maharashtrian shevga lonche: Best way to eat moringa for health: शेवग्याच्या शेंगाचे हे लोणचं कसं करायचं, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया.

Moringa pickle recipe step by step Drumstick pickle benefits and recipe Healthy homemade moringa pickle How to make drumstick pickle at Home Instant drumstick pickle recipe marathi | शेवग्याच्या शेंगांचे लोणचे खा - चव मस्त आणि पोषण जबरदस्त! पाहा रेसिपी, करा लगेच

शेवग्याच्या शेंगांचे लोणचे खा - चव मस्त आणि पोषण जबरदस्त! पाहा रेसिपी, करा लगेच

शेवग्याच्या शेंगा म्हटलं की आपल्याला आठवतो गरमागरम भातासोबत आमटी किंवा सुकी भाजी. शेवगा हा फक्त चवीसाठीच नाही तर संपूर्ण आरोग्यासाठी खजिना मानला जातो.(Spiced moringa pod pickle) शेवग्याच्या शेंगाचा वापर डाळ, सांबार, भाज्या किंवा सुपमध्ये सहज केला जातो. पण अनेकदा मुलं किंवा घरातील मोठी माणसं तीच तीच भाजी खाऊन कंटाळतात.(Traditional Maharashtrian shevga lonche) अशा वेळी शेवग्याचा एक वेगळा आणि चटपटीत अवतार म्हणजे 'शेवग्याच्या शेंगांचे लोणचे'. लोणचं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर आंबा किंवा लिंबू येतं, पण शेवग्याच्या शेंगांचे लोणचे कधी खाल्ले आहे का? (Best way to eat moringa for health) 
हे लोणचे चवीला जितके झणझणीत आणि चविष्ट लागते, तितकेच बनवायला सोपे आहे.(Spicy and tangy drumstick pickle) ऋतू कोणताही असो जेवणाची रंगत वाढवण्यासाठी हे लोणचे उत्तम पर्याय आहे. हे लोणचं कसं करायचं, यासाठी लागणारे साहित्य आणि कृती पाहूया. (Long lasting moringa pickle tips)

पैसा-प्रेम-प्रतिष्ठा हवी तर स्वत:ला लावा १० सवयी, यश तुमच्या पायाशी लोटांगण घालेल कायम

साहित्य 

२ वाट्या- शेवग्याची शेंग 
३ चमचे-  मेथी दाणे 
२ चमचे-  लाल तिखट
१/२ चमचा-  हळद
१ चमचा-  पिवळी मोहरी 
१ चमचा-  व्हिनेगर
१ चमचा-  मेथीचे दाणे
१/२ चमचा- बडीशेप
२ चमचे- हिंग 
आवश्यकतेनुसार - तेल 
मीठ 

कृती

1. सगळ्यात आधी शेवग्याच्या शेंगा स्वच्छ धुवून त्याचे वरचे साल काढून घ्या. त्याचे लहान तुकडे करा. यानंतर एका पातेल्यात पाणी गरम करा. त्यात शेवग्याच्या शेंगा ५ मिनिटे उकळवा. नंतर शेंगा बाजूला काढून ठेवा. 

2. कढईत तेल गरम करुन त्यात मेथी दाणे आणि मोहरी डाळ हलकी भाजून घ्या आणि त्याची पूड करा. उरलेले तेल कढईत कडकडीत गरम करा. तेल थोडे कोमट झाल्यावर त्यात हिंग, हळद, लाल तिखट आणि तयार केलेला मसाला टाका.

3. या मसाल्यात कोरड्या केलेल्या शेवग्याच्या शेंगा आणि चवीनुसार मीठ टाका. सर्व घटक व्यवस्थित एकत्र करा. लोणचे पूर्ण थंड झाल्यावर त्यात २ चमचे लिंबाचा रस किंवा व्हिनेगर घाला. यामुळे लोणच्याला छान आंबट चव येते आणि ते बराच काळ टिकते. हे लोणचे २ ते ३ दिवसात खाण्यासाठी तयार होते. 
 


Web Title : सहजन की फली का अचार: स्वादिष्ट और पौष्टिक - अभी बनाएं!

Web Summary : सांभर से आगे बढ़ें! यह मसालेदार, तीखा सहजन का अचार, सहजन का आनंद लेने का एक स्वादिष्ट और स्वस्थ तरीका है। मेथी, सरसों के बीज और मिर्च पाउडर जैसी सरल सामग्री के साथ बनाना आसान है, यह किसी भी भोजन के लिए एक स्वादिष्ट अतिरिक्त है और दिनों तक ताजा रहता है।

Web Title : Moringa Pod Pickle Recipe: Tasty and Nutritious - Make it Now!

Web Summary : Move beyond sambar! This spicy, tangy moringa pickle is a delicious and healthy way to enjoy drumsticks. Easy to make with simple ingredients like fenugreek, mustard seeds, and chili powder, it's a flavorful addition to any meal and stays fresh for days.