आपल्या रोजच्या जेवणातील काही पदार्थ हे फारच पौष्टिक असतात. हे पदार्थ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते म्हणून अशा पदार्थांना 'सुपरफूड' देखील म्हटले जाते. या 'सुपरफूड' मध्ये शेवग्याच्या शेंगांचा (How To Make Moringa Leaves Dal At Home) समावेश होतो. शेवग्याच्या शेंगांपासून ते पानांपर्यंत सगळेच अत्यंत (Moringa Leaves Dal) पौष्टिक असते. शेवग्याच्या शेंगांचा पाला हा आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आणि आरोग्यवर्धक मानला जातो. शक्यतो शेवग्याच्या शेंगांच्या पाल्याची भाजी, चटणी किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ केले जातात(Moringa Leaves Dal Recipe).
शेवग्याच्या शेंगांच्या पानांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे विशेषतः व्हिटॅमिन 'सी' आणि 'ए' असतात. शेवग्याच्या पाल्याची भाजी करण्यासोबतच आपण त्याची पौष्टिक अशी डाळ देखील करू शकतो. डाळ तर आपण रोजच्या जेवणात आवर्जून करतोच, परंतु नेहमीच्याच डाळीला अधिक पौष्टिक करण्यासाठी आपण त्यात शेवग्याच्या पाला देखील घालू शकतो. यामुळे डाळीचा पौष्टिकपणा आणि चव दुपटीने वाढते. शेवग्याच्या पाल्याची भाजी तर हमखास प्रत्येक घरोघरी तयार केली जातेच, पण थोडं नेहमीपेक्षा वेगळं म्हणून शेवग्याच्या पाल्याची डाळ देखील करुन पाहा. शेवग्याच्या पाल्याची डाळ करण्याची सोपी रेसिपी पाहूयात.
साहित्य :-
१. तूरडाळ - १ कप २. हिंग - चिमूटभर३. हळद - १/२ टेबलस्पून ४. मेथीदाणे - १/२ टेबलस्पून ५. साजूक तूप - २ ते ३ टेबलस्पून ६. लसूण पाकळ्या - ५ ते ६ पाकळ्या (बारीक चिरलेल्या)७. कडीपत्ता - १० ते १२ पाने ८. हिरव्या मिरच्या - ३ ते ४ मिरच्या ९. लाल सुकी मिरची - २ ते ३ सुक्या मिरच्या १०. मोहरी - १/२ टेबलस्पून ११. जिरे - १/२ टेबलस्पून १२. कांदा - १/२ कप (बारीक चिरलेला)१३. टोमॅटो - १/२ कप (बारीक चिरलेला)१४. शेवग्याची पाने - १ कप १५. चिंचेचा कोळ - २ टेबलस्पून १६. मीठ - चवीनुसार१७. पाणी - गरजेनुसार
न वाफवता करा ८ दिवस टिकणारी कुरकुरीत कोथिंबीर वडी, करायला सोपी चवीला उत्तम - पाहा रेसिपी...
कृती :-
१. सगळ्यांतआधी एका भांड्यात तूरडाळ घेऊन ती स्वच्छ धुवून घ्यावी. त्यानंतर डाळीत गरजेनुसार पाणी ओतून त्यात हळद, मीठ, मेथी दाणे घालून डाळ कुकरला लावून शिजवून घ्यावी. डाळ व्यवस्थित शिजवून घ्यावी. २. आता शेवग्याची पाने पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत. ३. एका भांड्यात साजूक तूप घेऊन त्यात बारीक चिरलेला लसूण, हिरव्या व लाल सुक्या मिरच्या घालाव्यात. तसेच जिरे, मोहरी घालून खमंग अशी फोडणी तयार करुन घ्यावी.
लालचुटूक टोमॅटोचे भरीत एकदा खाऊन पाहा, चव लय भारी! पाहा टोमॅटोच्या भरीताची मस्त रेसिपी...
४. आता या तयार खमंग फोडणीत बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो व शेवग्याची पाने घालावीत. हे सगळे मिश्रण ५ ते १० मिनिटे मंद आचेवर व्यवस्थित शिजवून घ्यावे. मिश्रण व्यवस्थित शिजल्यानंतर त्यात शिजवूंन घेतलेली डाळ ओतावी. ५. या डाळीत गरजेनुसार पाणी घालावे आणि सगळे मिश्रण चमच्याने हलवून एकजीव करून घ्यावे. सगळ्यात शेवटी यात चिंचेचा कोळ व चवीनुसार मीठ घालावे. एक हलकी उकळी काढून घ्यावी.
शेवग्याच्या पानांची पौष्टिक डाळ खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम भात किंवा चपाती सोबत आपण ही डाळ खाऊ शकता.