Join us

शेवग्याच्या शेंगांची पानं बहुगुणी! सुपरफूड पानांची करा पौष्टिक चटणी - चवीला उत्तम आयोग्यासाठी फायदेशीर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2025 14:15 IST

Moringa leaves Chutney : How To Make Moringa leaves Chutney : Moringa leaves Dry Chutney : शेवग्याच्या शेंगांच्या पानांची सुकी चटणी कशी करायची याची सोपी रेसिपी...

शेवग्याच्या शेंगांच्या पानांपासून शेंगांच्या सालींपर्यंत सगळंच आरोग्यासाठी पौष्टिक मानलं जात. आजकाल पौष्टिक आणि आरोग्यासाठी उत्तम म्हणून शेवग्याच्या शेंगांचे (Moringa leaves Chutney) तसेच पानांचे अनेक पदार्थ तयार करून खाल्ले जातात. शेवग्याच्या शेंगांच्या पानांची भाजी आपल्यापैकी अनेकांनी खाल्लीच असेल किंवा काहींच्या घरात हमखास (How To Make Moringa leaves Chutney) ही भाजी तयार केली जाते. परंतु आपण याच पानांची तोंडी लावायला म्हणून सुकी चटणी देखील करू शकतो(Moringa leaves Dry Chutney).

जेवणाच्या ताटात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तोंडी लावण्यासाठी दिले जातात. खरंतर, या तोंडी लावण्यासाठीच्या पदार्थांमुळेच आपले जेवण अगदी मस्तपैकी साग्रसंगीत पार पडते. आपल्या जेवणाच्या ताटात सुकी किंवा ओली चटणी तोंडी लावायला म्हणून दिली जाते. यात शेंगदाण्याची, लसणाची, खोबऱ्याची, कडीपत्त्याची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या असंख्य चटण्या असतात, याचबरोबर तुम्ही शेवग्याच्या शेंगांच्या पानांची देखील चटणी तयार करू शकता. चवीला उत्तम आणि आरोग्यासाठी पौष्टिक आणि फायदेशीर अशी शेवग्याच्या शेंगांच्या पानांची चटणी तर हवीच. शेवग्याच्या शेंगांच्या पानांची सुकी चटणी कशी करायची याची सोपी रेसिपी पाहूयात.   

  साहित्य :-

१. शेवग्याच्या शेंगांची पानं - २ कप २. तेल - २ टेबलस्पून ३. शेंगदाणे - १/२ कप ४. पिवळी चणा डाळ १/२ कप ५. पांढरी उडीद डाळ - १/२ कप ६. हिंग - चिमूटभर७. जिरे - १ टेबलस्पून ८. धणे - १ टेबलस्पून ९. लाल सुक्या मिरच्या - ४ ते ५ सुक्या मिरच्या१०. कडीपत्त्याची पानं - ७ ते १० पानं ११. मीठ - चवीनुसार १२. आमचूर पावडर - १/२ टेबलस्पून 

खरबुजाच्या बिया फायदेशीर ! १ भन्नाट ट्रिक, महागामोलाचे मगज बी विकत आणायची गरजच नाही...

मिक्सरशिवाय १० मिनिटांत करा आमरस - झटपट रस काढण्याची पाहा एक भन्नाट ट्रिक...

कृती :- 

१. सगळ्यांतआधी शेवग्याच्या शेंगांची पानं देठापासून वेगळी करून निवडून घ्यावी. त्यानंतर ही पानं स्वच्छ धुवून एका सुती कापडात गुंडाळून स्वच्छ पुसून घ्यावीत. मग फॅनखाली ठेवून १५ ते २० मिनिटे संपूर्णपणे वाळवून घ्यावीत. २. आता एका पॅनमध्ये थोडे तेल घेऊन त्यात शेंगदाणे, पिवळी चणा डाळ, पांढरी उडीद डाळ, चिमूटभर हिंग, जिरे, धणे, लाल सुक्या मिरच्या घालून सगळे जिन्नस परतून घ्यावेत. सगळे जिन्नस परतल्यानंतर थंड होण्यासाठी एका डिशमध्ये काढून घ्यावे. 

पदार्थ तळताना तेल काळं हाेतं, वास येतो? मिसळा एक पांढराशुभ्र पदार्थ - तेल खराब होणार नाही...

३. त्याच पॅनमध्ये वाळलेली शेवग्याच्या शेंगांची पानं आणि कडीपत्त्याची पानं एकत्रितपणे २ ते ३ मिनिट कुरकुरीतपणा येईपर्यंत भाजून घ्यावीत. ४. आता मिक्सरच्या एका भांड्यात तेलात भाजून घेतलेले मिश्रण आणि शेवग्याच्या शेंगांची पानं आणि कडीपत्त्याची पानं असे सगळे जिन्नस एकत्रित घालून चटणी वाटून घ्यावी. ५. चटणी वाटून झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ व आमचूर पावडर घालून चमच्याने सगळे जिन्नस एकत्रित करून तयार चटणी एअर टाईट कंटेनरमध्ये भरून स्टोअर करून ठेवावी. 

शेवग्याच्या शेंगांच्या पानांची चटणी खाण्यासाठी तयार आहे. आपण वरण - भात किंवा चपाती - भाकरी सोबत देखील ही चटणी खाऊ शकता. जेवताना तोंडी लावण्यासाठी म्हणून ही चटणी चविष्ट आणि पौष्टिक आहे.

टॅग्स :अन्नपाककृती