Join us

शेवग्याच्या पानांची चटणी म्हणजे सुपरफूड! रोज खा-हाडं होतील मजबूत -स्वस्तात मस्त औषध...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2025 18:33 IST

Moringa Leaves Chutney : Drumstick Leaves Chutney Recipe : How To Make Moringa Leaf Chutney : गरमागरम वाफाळता भात आणि त्यासोबत साजूक तूप व शेवग्याच्या पानांची चटणी खायला अधिकच टेस्टी लागते.

शेवग्याच्या शेंगांच्या पानांपासून शेवग्याच्या सालांपर्यंत सगळंच आरोग्यासाठी पौष्टिक मानलं जातं. आजकाल पौष्टिक आणि आरोग्यासाठी उत्तम म्हणून शेवग्याच्या शेंगांचे (Moringa leaves Chutney) तसेच पानांचे अनेक पदार्थ तयार करून खाल्ले जातात. शेवग्याच्या शेंगांची भाजी आपल्यापैकी अनेकांनी खाल्लीच असेल किंवा काहींच्या घरा‌त हमखास (How To Make Moringa leaves Chutney) ही भाजी तयार केली जाते. परंतु आपण याच पानांची तोडी लावायला म्हणून ओली चटणी देखील करू शकतो (Moringa leaves Chutney).

जेवणाच्या ताटात वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ तोंडी लावण्यासाठी दिले जातात. खरंतर, या तोंडी लावण्यासाठीच्या पदार्थांमुळेच आपले जेवण अगदी साग्रसंगीत  पार पडते. आपल्या जेवणाच्या ताटात सुकी किंवा ओली चटणी तोंडी लावायला म्हणून दिली जाते. यात शेंगदाण्याची, लसणाची, खोबऱ्याची, कडीपत्त्याची असा वेगवेगळ्या प्रकारच्या असंख्य चटण्या असतात, याचबरोबर तुम्ही शेवग्याच्या पानांची देखील चटणी तयार करू शकता. चवीलाही उत्तम आणि आरोग्यासाठी पौष्टिक आणि फायदेशीर अशी शेवग्याच्या शेंगांच्या पानांची चटणी तर जेवणात जरूर हवीच. शेवग्याच्या पानांची ओली चटणी कशी करायची याची सोपी रेसिपी पाहूयात. 

साहित्य :-

१. साजूक तूप - १ टेबलस्पून २. पांढरी उडीद डाळ - १ टेबलस्पून ३. चणा डाळ - १ टेबलस्पून४. कडीपत्त्याची पाने - १० ते १५ पाने ५. लसूण पाकळ्या - ५ ते ६ पाकळ्या ६.शेंगदाणे - ३ ते ४ टेबलस्पून ७. लाल सुक्या मिरच्या - ३ ते ४ मिरच्या ८. चिंच - २ ते ३ ९. हिंग - चिमूटभर१०. जिरे - १/२ टेबलस्पून ११. हिरव्या मिरच्या - २१३. मीठ - चवीनुसार १४. शेवग्याची पाने - १ कप 

आशा भोसलेंना आवडते 'माँ की दाल'! पराठा, भातासोबत खा पोटभर - अस्सल पारंपरिक रेसिपी...    

कमी लोणी अगदी उरलेल्या बेरीतूनही काढा सगळे साजूक तूप, पाहा ट्रिक! रवाळ - घरगुती तुपाची चव भारी... 

कृती :- 

१. सर्वात आधी शेवग्याची पाने निवडून ती पाण्याने व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यावीत. मग ही पाने कापडावर पसरवून ठेवून संपूर्णपणे वाळवून घ्यावीत. २. आता पॅनमध्ये थोडे साजूक तूप घेऊन ते हलकेच गरम करून घ्यावे. ३. साजूक तुपात पांढरी उडीद डाळ, चणा डाळ, कडीपत्त्याची पाने, लसूण पाकळ्या, शेंगदाणे, लाल सुक्या मिरच्या, हिरव्या मिरच्या घालून २ ते ३ मिनिटे भाजून घ्यावे. 

गूळ-ज्वारीचा केक खाऊन तर पाहा, फक्त १५ मिनिटांत करा मुलांसाठी पौष्टिक आणि चविष्ट केक....

४. मग यात चिंच, चिमूटभर हिंग, जिरे, चवीनुसार मीठ आणि सगळ्यात शेवटी शेवग्याची पाने घालावीत. हे मिश्रण ४ ते ५ मिनिटे व्यवस्थित भाजून घ्यावे. ५. पॅनमधील मिश्रण व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर हे मिश्रण एका भांड्यात काढून थोडे थंड होण्यासाठी ठेवावे. ६. मिश्रण थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून चटणी थोडी जाडसर भरड होईपर्यंत वाटून घ्यावी. 

मस्त चमचमीत आणि पौष्टिक अशी शेवग्याच्या पानांची चटणी खाण्यासाठी तयार आहे. गरमागरम वाफाळता भात आणि त्यासोबत साजूक तूप व शेवग्याच्या पानांची चटणी खायला अधिकच टेस्टी लागते.

टॅग्स :अन्नपाककृती