Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > ‘मूगडाळ कोळीवाडा’ हा तुम्ही खाल्लाच नाही अजून, घ्या रेसिपी - मूगभजी विसराल असा झणझणीत पदार्थ...

‘मूगडाळ कोळीवाडा’ हा तुम्ही खाल्लाच नाही अजून, घ्या रेसिपी - मूगभजी विसराल असा झणझणीत पदार्थ...

Moong Dal Koliwada : Yellow Moong Dal Koliwada Recipe : How To Make Moong Dal Koliwada : गरमागरम चहा, गप्पा आणि मूग डाळ कोळीवाडा! कुरकुरीत, झणझणीत तरीही पौष्टिक - एकदा खाल तर भजी विसरून जाल...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2026 14:54 IST2026-02-24T14:40:15+5:302026-02-24T14:54:14+5:30

Moong Dal Koliwada : Yellow Moong Dal Koliwada Recipe : How To Make Moong Dal Koliwada : गरमागरम चहा, गप्पा आणि मूग डाळ कोळीवाडा! कुरकुरीत, झणझणीत तरीही पौष्टिक - एकदा खाल तर भजी विसरून जाल...

Moong Dal Koliwada How To Make Moong Dal Koliwada Yellow Moong Dal Koliwada Recipe | ‘मूगडाळ कोळीवाडा’ हा तुम्ही खाल्लाच नाही अजून, घ्या रेसिपी - मूगभजी विसराल असा झणझणीत पदार्थ...

‘मूगडाळ कोळीवाडा’ हा तुम्ही खाल्लाच नाही अजून, घ्या रेसिपी - मूगभजी विसराल असा झणझणीत पदार्थ...

संध्याकाळच्या वाफाळत्या चहासोबत आपल्याला सगळ्यांनाच काहीतरी चटपटीत आणि कुरकुरीत खायला हवंच असतं. चहासोबत, आपण नेहमीच कांदा भजी किंवा बटाटा वडा खातो, पण नेहमी चहासोबतच तेच ते पदार्थ खाऊन आपल्याला अनेकदा कंटाळा येतो. अशावेळी चविष्ट, झटपट आणि पौष्टिक असा स्नॅक म्हणजे मूग डाळ कोळीवाडा...बाहेरून कुरकुरीत, खुसखुशीत आणि आतून मऊ असलेला हा पदार्थ चवीला जितका भन्नाट तितकाच आरोग्यदायीही आहे. खास मसाल्यांचा सुगंध आणि मूग डाळीची पौष्टिकता यामुळे ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचीच आवडती ठरते(How To Make Moong Dal Koliwada).

'कोळीवाडा' स्टाईल म्हटलं की डोळ्यासमोर येते ती म्हणजे लालभडक रंग, बाहेरून अतिशय कुरकुरीत आणि आतून मऊ अशी चविष्ट डिश! मूग डाळीचा कोळीवाडा हा तितकाच चवदार आणि प्रोटीनने युक्त असा पदार्थ आहे. मूग डाळ फक्त वरण किंवा खिचडीसाठीच नाही तर त्याचा असा चमचमीत, चटपटीत पदार्थ तयार होतो की (Moong Dal Koliwada) चव तर भन्नाटच लागते... घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने गरमागरम मूग डाळ कोळीवाडा (Yellow Moong Dal Koliwada Recipe) कसा तयार करायचा, त्यासाठी लागणारे साहित्य आणि परफेक्ट रेसिपी पाहूयात... 
  
साहित्य :- 

१. पिवळी मूग डाळ - २ कप (६ ते ७ तास पाण्यांत भिजवलेली)
२. आलं, लसूण, मिरचीची पेस्ट - १ टेबलस्पून 
३. मीठ - चवीनुसार
४. हळद - १/२ टेबलस्पून 
५. काळीमिरी पूड - १/२ टेबलस्पून 
६. लाल तिखट मसाला - १/२ टेबलस्पून
७. गरम मसाला - १/२ टेबलस्पून 
८. चाट मसाला - १/२ टेबलस्पून 
९. धणेपूड - १/२ टेबलस्पून
१०. पांढरे तीळ - १ टेबलस्पून 
११. तेल - तळण्यासाठी 
१२. पाणी - गरजेनुसार
१३. कोथिंबीर - २ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
१४. बेसन - २ ते ३ टेबलस्पून 
१५. तांदुळाचे पीठ - २ ते ३ टेबलस्पून 

पांढराशुभ्र ढोकळा आणि मधोमध हिरवीगार चटणी! अप्रतिम चवीच्या सँडविच ढोकळ्याची रेसिपी - पेटपूजा होईल बेस्ट... 


अश्विनी काळसेकरांच्या घरी केलं जातं शेवग्याच्या शेंगांचं पारंपरिक लोणचं! जेवणाची चव वाढवणारी सुपरहिट रेसिपी... 

कृती :- 

१. सर्वातआधी एका मोठ्या बाऊलमध्ये ६ ते ७ तास पाण्यात भिजवलेली पिवळी मूग डाळ घेऊन त्यात आलं, लसूण, मिरचीची पेस्ट घालावी. 
२. याच मिश्रणात मग चवीनुसार मीठ, हळद, काळीमिरी पूड, लाल तिखट मसाला, गरम मसाला, चाट मसाला, धणेपूड, पांढरे तीळ, बारीक चिरलेली कोथिंबीर, बेसन, तांदुळाचे पीठ, तेल व गरजेनुसार पाणी घालून सगळे जिन्नस चमच्याने कालवून एकजीव करून घ्यावेत. 

कोकणातल्या पारंपरिक चवीच्या सांडगी मिरचीची पाहा रेसिपी, वर्षभर टिकेल-ना बुरशी येते ना खमंगपणा जातो...

३. कढईत तेल घेऊन ते व्यवस्थित गरम करून घ्यावे. या गरम तेलात तयार मिश्रणाच्या छोट्या - छोट्या भाज्या सोडून हलका गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत खरपूस तळून घ्याव्यात. 

गरमागरम मूग डाळ कोळीवाडा खाण्यासाठी तयार आहे. हिरवी चटणी किंवा सॉससोबत ही मूग डाळ कोळीवाडा स्पेशल डिश खाण्यास अप्रतिमच लागते.

Web Title : मूंग दाल कोलीवाड़ा रेसिपी: एक मसालेदार, कुरकुरा नाश्ता जो आपको पसंद आएगा

Web Summary : पुराने स्नैक्स से ऊब गए हैं? मूंग दाल कोलीवाड़ा ट्राई करें! यह कुरकुरी, प्रोटीन से भरपूर डिश घर पर बनाना आसान है। यह पारंपरिक तले हुए स्नैक्स का स्वादिष्ट और स्वस्थ विकल्प है।

Web Title : Moong Dal Koliwada Recipe: A Spicy, Crispy Snack You'll Love

Web Summary : Tired of the same old snacks? Try Moong Dal Koliwada! This crispy, protein-packed dish is easy to make at home. It's a delicious and healthy alternative to traditional fried snacks.