पावसाळा सुरु झाला की, वातावरणातील गारवा पाहून आपल्याला चटपटीत काही तरी खावेसे वाटते.(Monsoon corn pakoda recipe) गरमागरम चहा-कॉफीसह जीभेचे चोचले पुरवण्यासाठी आपण भजीचा बेत आखतो.(Corn bhajiya recipe) भजी म्हटलं की, आपल्या डोळ्यांसमोर कांदा भजी, बटाटा भजी, मूगाची भजी अशी भजींचे अनेक प्रकार पाहायला मिळतात.(Evening snack ideas for rainy season) भजी हा पारंपरिक आणि सगळ्यांचा आवडता नाश्त्याचा प्रकार आहे. पावसाळ्यात याची चव अधिक खुलते.(Monsoon snack corn fritters) विविध भाज्यांना बेसनाच्या पीठात घोळवून गरमा गरम तेलात तळून खमंग भजीचा आस्वाद घेता येतो.(How to make corn pakoda) पावसाळ्यात आपल्या सर्वत्र कणीस पाहायला मिळतात. भाजलेल्या कणसांवर चमचमीत मीठ आणि मसाला घालून त्याची चव वाढवता येते.(Easy monsoon snack corn bhajiya step-by-step) इतकेच नाही तर आपण त्याची कुरकुरीत कॉर्न भजी देखील बनवू शकतो. गरमागरम चहासोबत कुरकुरीत कॉर्न भजी कशी करायची पाहूया.(Crispy corn pakoda recipe for rainy evenings)
कोकणातील पारंपरिक पदार्थ तिळकूट गवार, भात-भाकरीसोबत चवीने खा, पाहा रेसिपी
साहित्य
मक्याचे दाणे - १ वाटी उभा चिरलेला कांदा - १ वाटी आल्याचे बारीक केलेले तुकडे - १ चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची - २ ते ३कढीपत्त्याची पाने हळद - १ चमचा लाल तिखट - १ चमचाजिरे पावडर - १ चमचाहिंग - १ चमचागरम मसाला - १ चमचामीठ - चवीनुसार बेसन - १ वाटी तांदळाचे पीठ - अर्धी वाटी कोथिंबीर पाणी तेल
कृती
1. सगळ्यात आधी मक्याचे दाणे उकडून घ्या. त्यानंतर कांदा उभा चिरुन घ्या.
2. उकडलेल्या मक्याच्या दाण्यांमध्ये उभा चिरलेला कांदा, आल्याचे तुकडे, हिरवी मिरची, कढीपत्त्याची पाने, हळद, लाल तिखट, जिरे पावडर, हिंग, गरम मसाला आणि मीठ घालून चांगले एकजीव करा.
3. आता त्यात बेसन आणि तांदळाचे पीठ घालून पुन्हा एकजीव करा. कोथिंबीर आणि थोडे पाणी घालून मिश्रण चांगले एकजीव करा.
4. गॅसवर तेल कडकडीत गरम झाल्यानंतर तयार मिश्रणाचे भजी करुन तळून घ्या. लालसर होईपर्यंत भजी तळा. तयार होतील गरमागरमा कुरकुरीत कॉर्न भजी.