नेहमीचा वरण-भात, भाजी-पोळी खाऊन कंटाळा आला की आपल्याला काहीतरी नवीन खाण्याची इच्छा होते.(kids tiffin recipe) बिर्याणी-पुलावसारखे पदार्थ तयार करताना जास्तीचा वेळ लागतो, त्यामुळे आपण बाहेरुन असे पदार्थ विकत आणून खातो.(Monsoon Food) आपल्यासह घरातील अनेक माणसांना विविध पदार्थ चाखण्याची इच्छा होत असते. रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणात भरपूर प्रोटीन असणारा हलका आहार आपण खायला हवा.(Nutritious monsoon meals for children) यासाठी वरण-भात किंवा डाळ खिचडीचा पर्याय चांगला असतो. पण शरीराला भरपूर प्रमाणात प्रोटीन हवे असेल तर आपण सोया पुलावची रेसिपी ट्राय करु शकतो.(Soya chunks pulao for kids)
सोया पुलाव करण्यासाठी आपण यात आपल्या आवडीच्या भाज्या देखील घालू शकतो.(Monsoon comfort food for family) पावसाळ्यात हलका आणि पौष्टिक आहार हवा असेल तर हा पर्याय सोपा आहे. चविला मस्त आणि भरपूर प्रोटीन असणारा सोया पुलाव कसा करायचा पाहूया.(Healthy monsoon lunch idea)
Maharashtra food : झणझणीत कोल्हापुरी तिखट चटणी घरी करा १० मिनिटांत, अस्सल गावरान चव
साहित्य
सोया चंक्स - अर्धा कप
पाणी - आवश्यकतेनुसार
तूप - १ चमचा
खडा मसाला
जिरे - १ चमचा
चिरलेला कांदा - अर्धा कप
आले-मिरची-लसूण पेस्ट - १ चमचा
चिरलेला टोमॅटो - अर्धा कप
वाटाणे - १/४ कप
लाल तिखट - १ चमचा
हळद - अर्धा चमचा
धने पावडर - १ चमचा
जिरे पावडर - अर्धा चमचा
मीठ - चवीनुसार
भिजवलेला बासमती तांदूळ - १ कप
गरम पाणी - २ कप
कृती
1. सगळ्यात आधी एका पातेल्यात सोयाबिन भिजवून घ्या. भिजल्यानंतर हाताने दाबून त्यातील पाणी काढून घ्या.
2. गॅसवर पॅन ठेवून त्यात चमचाभर तूप घाला. त्यामध्ये आता तमालपत्र, दालचिनी, लवंग, मोठी वेलची, काळी मिरी आणि हिरवी वेलची, जिरे आणि कांदा घालून चांगले परतून घ्या.
3. यामध्ये आता आले-लसणाची पेस्ट, टोमॅटो, हिरवे वाटाणे, गाजर, बटाटा, फरसबी घालून चांगले परतवून घ्या. वरुन भिजवलेले सोया चंक्स घाला. लाल तिखट,हळद, जिरे-धने पावडर आणि मीठ घालून मसाला चांगला एकजीव करा.
4. यात भिजवलेले तांदूळ घालून पुन्हा एकजीव करा. २ कप गरम पाणी घालून काही वेळ झाकूण ठेवा. भात अर्धा शिजल्यानंतर आता दुसर्या गॅसच्या आचेवर तवा ठेवून त्यावर भाताचे पातेल ठेवा. वरुन झाकण लावून त्यात पाणी घाला. गॅस कमी फ्लेमवर ठेवावा. ज्यामुळे भात लवकर शिजण्यास मदत होईल. तसेच पुलाव सुटसुटीत, मोकळा आणि चिकट होणार नाही.