Lokmat Sakhi >Food > Monsoon food : वाफाळत्या भातासोबत खा आंबट-गोड चवीचं वरण, पारंपरिक रेसिपी- पावसाळ्यातलं कम्फर्ट फूड

Monsoon food : वाफाळत्या भातासोबत खा आंबट-गोड चवीचं वरण, पारंपरिक रेसिपी- पावसाळ्यातलं कम्फर्ट फूड

comfort food ideas for rain : simple Indian food for rainy days: गरमागरम भातासोबत ही डाळ खाण्याची मज्जा काही औरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2025 09:35 IST2025-06-26T09:30:00+5:302025-06-26T09:35:02+5:30

comfort food ideas for rain : simple Indian food for rainy days: गरमागरम भातासोबत ही डाळ खाण्याची मज्जा काही औरच

monsoon comfort food recipes ow t make Gujrati style ambat goad daal varan recipe in marathi | Monsoon food : वाफाळत्या भातासोबत खा आंबट-गोड चवीचं वरण, पारंपरिक रेसिपी- पावसाळ्यातलं कम्फर्ट फूड

Monsoon food : वाफाळत्या भातासोबत खा आंबट-गोड चवीचं वरण, पारंपरिक रेसिपी- पावसाळ्यातलं कम्फर्ट फूड

गुजराती जेवणात आंबट-गोड चवीची खास ओळख आहे.(Ambat Goad daal) या चवीशिवाय त्यांचे जेवण अपूर्ण मानले जाते. गुजरातमध्ये असे अनेक पदार्थ आहे जे महाराष्ट्रातील अनेक भागात आवडीने खाल्ले जातात.(Gujarti Recipe) ढोकळा, थेपला, खांडवी, फाफडा, दाबेली यांसारखे अनेक पदार्थ महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आजही खाल्ले जातात. पण यातलाच एक पारंपरिक पदार्थ म्हणजे गुजराती आंबट गोड वरण.(Monsoon Food) ज्याला गुजराती दाल असंही म्हटलं जाते. 
ही डाळ चवीला अगदी वेगळी लागते. यामध्ये तूर डाळीचा वापर केला जातो.(sweet and sour toor dal) चिंच आणि गूळ घालून आंबट - गोड चव चाखली जाते. तसेच ओवा आणि हिंगाची फोडण देऊन हा पदार्थ आणखी चविष्ट बनवला जातो.(homestyle rainy day food) गरमागरम भातासोबत ही डाळ खाण्याची मज्जा काही औरच... हा पदार्थ करण्यासाठी लागणारे घटक आणि साहित्य पाहूया. (light meals for rainy weather)

गुलाबजाम तळताना फुटतात- कडक होतात? ६ सोप्या टिप्स, तोंडात टाकताच विरघळतील मस्त

साहित्य 

तुरीची डाळ - १ कप 
टोमॅटो - १ 
शेंगदाणे - अर्धा कप 
मीठ - चवीनुसार 
हळद - १ चमचा 
चिंचेचा कोळ - अर्धी वाटी 
गूळ - अर्धी वाटी 
तूप - १ चमचा 
मेथी दाणे - १ चमचा 
हिंग - १ चमचा
लवंग - ३ ते ४
जिरे - १ चमचा 
राई - १ चमचा
कढीपत्ता- ५ ते ६ 
लाल मिरची - २ ते ३
हिरवी मिरची - २ ते ३
कोथिंबीर - आवश्यकतेनुसार 



कृती 

1. सगळ्यात आधी तुरीची डाळ आणि शेंगदाणे वेगवेगळ्या पद्धतीने धुवून घ्या. त्यानंतर कुकरमध्ये किंवा पातेल्यात तुरीची डाळ, चिरलेला टोमॅटो, शेंगदाणे, मीठ, हळद आणि पाणी घालून छान शिजवून घ्या. 

2. डाळ शिजल्यानंतर त्यात चिंचेचा कोळ आणि गूळ घाला. आता रवीने टोपात फिरवून घ्या. ज्यापद्धतीने आपण ताक घुसळतो त्यापद्धतीने डाळ घुसळवा. ज्यामुळे डाळीचे दाणे राहणार नाही. तसेच चिंच आणि गूळ व्यवस्थित मिक्स होईल. 

3. आता कढईमध्ये तूप गरम करुन त्यात मेथीचे दाणे, लवंग, जिरे, राई घालून तडतडू द्या. त्यानंतर हिंग, कढीपत्ता, लाल मिरची, हिरवी मिरची घाला. घोटलेली डाळ घाला. उकळी आल्यानंतर कोथिंबीर घाला. वाफाळत्या भातासोबत खा गरमागरम गुजराती आंबट-गोड वरण
 

Web Title: monsoon comfort food recipes ow t make Gujrati style ambat goad daal varan recipe in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.